UPSC EPFO परीक्षा केंद्रात बदल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात
UPSC EPFO Change Exam Center
UPSC EPFO Change Exam Center : UPSC EPFO Exam Centre Update: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत एनफोर्समेंट ऑफिसर किंवा अकाउंट्स ऑफिसर पदांसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची लिंक आज १५ डिसेंबर पासून अॅक्टिव्ह होत आहे. UPSC EPFO परीक्षा ९ मे २०२१ रोजी देशभरात विविध केंद्रांवर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचा पर्याय बदलण्याची इच्छा आहे, त्यांना ती संधी देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मात्र, उपलब्ध क्षमतेनुसारच उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या परीक्षा केंद्राचा पर्याय मिळेल, याची नोंद घ्यावी, असंही आयोगाने कळवलं आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन त्यांना परीक्षा केंद्रात बदल करण्याची मुभा देण्यात येत आहे. कोलकाता आणि जयपूरमधून मोठ्या प्रमाणावर मागणी आली आहे. उपलब्ध केंद्रे आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या एकूण केंद्रांची क्षमता लक्षात घेऊन त्यानुसारच उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार केंद्रे देण्याचा प्रयत्न आयोग करेल. आता देशभरात ७२ केंद्रांवर परीक्षा होईल.’
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उमेदवारांना आपला परीक्षा केंद्राचा पर्याय बदलण्यासाठी विंडो दोन टप्प्यात उघडण्यात येणार आहे. पहिला टप्पा १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२० पर्यंत असेल आणि दुसरा टप्पा २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत असेल.
परीक्षेचा पॅटर्न
UPSC ने सांगितलं आहे की देशभरात ७२ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. UPSC EPFO परीक्षेसाठी उमेदवारांना २ तासांचा वेळ दिला जाईल. परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असेल आणि परीक्षेत हिंदी आणि इंग्रजी अशा दोना भाषांमध्ये प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. परीक्षा आणि मुलाखतीचे बलाबत ७५:२५ असेल. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ४२१ पदे भरली जाणार आहेत.
सोर्स : म. टा.
UPSC EPFO Change Exam Center : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत एनफोर्समेंट ऑफिसर किंवा अकाउंट्स ऑफिसर पदांसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता, त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या उमेदवारांना परीक्षा केंद्रासाठी आपले पसंतीक्रम बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे. UPSC EPFO परीक्षा ९ मे २०२१ रोजी होणार आहे.
उमेदवारांना आपला परीक्षा केंद्राचा पर्याय बदलण्यासाठी विंडो दोन टप्प्यात उघडण्यात येणार आहे. पहिला टप्पा १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२० पर्यंत असेल आणि दुसरा टप्पा २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत असेल.
UPSC ने सांगितलं आहे की देशभरात ७२ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. UPSC EPFO परीक्षेसाठी उमेदवारांना २ तासांचा वेळ दिला जाईल. परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असेल आणि परीक्षेत हिंदी आणि इंग्रजी अशा दोना भाषांमध्ये प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. परीक्षा आणि मुलाखतीचे बलाबत ७५:२५ असेल. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ४२१ पदे भरली जाणार आहेत.
या भरती संदर्भात जानेवारी २०२० मध्ये नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते आणि नंतर करोना व्हायरसमुळे अनेक लोकांना स्थलांतर केले. परिणामी उमेदवारांनी परीक्षा केंद्र बदलून देण्याची विनंती केली होती.
: मागील UPSC अपडेट :
CET also for UPSC Training Center Admission: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या राज्यभरातील विविध ठिकाणच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांतील प्रवेशासाठी आता एकत्रित सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या राज्यभरातील विविध ठिकाणच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांतील प्रवेशासाठी आता एकत्रित सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे. एमएचटी – सीईटीच्या धर्तीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून राज्यातील सहा केंद्रांतील प्रवेशासाठीच्या परीक्षेसाठी आता एकच फार्म्युला असणार आहे. सामायिक परीक्षेत पूर्व परीक्षा, लेखी परीक्षा व मुलाखतीचा समावेश असला तरी त्या ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हव्या त्या केंद्रात प्रवेश घेता येणार आहे.
CET also for UPSC Training Center Admission
युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढवा, यासाठी राज्य सरकारने सुरवातीला मुंबईत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून युपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात येते. संस्थेमुळे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी युपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले. यामुळे सरकारने मुंबईतील संस्थेच्या धर्तीवर सुरवातीला नागपूर, कोल्हापूर व औरंगाबाद येथे व त्यानंतर अमरावती व नाशिक येथे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांची स्थापना केली. संस्था व केंद्रांच्या वतीने दरवर्षी प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा व त्यानंतर मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड केली जाते. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्रांच्या वतीने परीक्षा घेण्यात येते. यात सर्व केंद्रांचे प्रवेश व प्रशिक्षण एकाच कालावधीत होत नव्हते.
अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या व सोयीच्या केंद्रात प्रवेश मिळत नव्हता. सर्व केंद्रांसाठी विद्यार्थ्यांनी स्वतंत्र परीक्षा द्यावी लागत होती. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सर्वच प्रशिक्षण केंद्रांसाठी एकच सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याचा प्रस्ताव पुणे येथील उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी सरकारला जुन २०१९ मध्ये पाठवला होता. त्यावर सर्व केंद्रांच्या २६ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या आढावा बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर सरकारने शुक्रवारी (ता. २७) सर्व सहा प्रशिक्षण केंद्रांसह यापुढील काळात जिल्हास्तरावर स्थापन होणाऱ्या सर्व केंद्रांसाठी ऑनलाईन एकच लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात घेण्याचा निर्णय जाहिर घेतला. यात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचा समावेश असणार आहे. लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांनुसार व केंद्राच्या विकल्पानुसार विद्यार्त्यांची निवड करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
मुलाखतीसाठी आता पॅनेल
प्रवेश प्रक्रियेतील मुलाखतीसाठी स्वतंत्र पॅनेल तयार करण्याचे आदेश सरकारने यानिमित्ताने दिले आहे. विविध पदांच्या मुलाखतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पॅनेलवरील आधारित हे पॅनेल करण्याची सुचना सरकारने केली आहे. यासोबत प्रवेश परीक्षा शुल्कातही वाढ केली आहे. प्रवेश परीक्षेसाठी पूर्वी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून तीनशे तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून दीडशे रूपये शुल्क घेण्यात येत होते. यातून परीक्षेचा खर्च भागवणे शक्य नसल्याने त्यात वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता खुल्या प्रवर्गासाठी पाचशे तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अडीचशे शुल्क असणार आहे.
Table of Contents