डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी परीक्षेला सुरूवात !-University Exams Begin!

University Exams Begin!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना शनिवारी (५ एप्रिलपासून) सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि जालना या चार जिल्ह्यांतील २३७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडत आहे.सुरुवातीचे तीन दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांचे पेपर्स – जसं की भारतीय राज्यघटना, पर्यावरण आणि संगणकशास्त्र घेतले जात आहेत. त्यानंतर ८ एप्रिलपासून कोर्सनिहाय विषयांची परीक्षा सुरू होणार आहे.

University Exams Begin!

‘कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ राबवले जात आहे
विद्यापीठाने यंदा ‘कॉपीमुक्त परीक्षा’ अभियान राबवलं असून, परीक्षेसाठी महसूल आणि पोलिस प्रशासनाची मदत घेण्यात आली आहे. परीक्षेच्या नियोजनासाठी १२ जणांची समन्वयक समिती नेमण्यात आली असून, भरारी पथकांद्वारे नियमित तपासणी केली जात आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

४७६ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रं निश्चित करण्यात आली आहेत. BA, B.Com, B.Sc इत्यादी प्रथम वर्षातील दुसऱ्या सत्राच्या परीक्षा होम सेंटरवर घेण्यात येत आहेत.

शहर व ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांचा तपशील

  • छत्रपती संभाजीनगर शहरात सर्वाधिक २० केंद्रं, तर ग्रामीण भागात ७३ केंद्रं
  • जालना शहर – ६ केंद्रं, ग्रामीण – ४५ केंद्रं
  • बीड शहर – ७, ग्रामीण – २५ केंद्रं
  • धाराशिव शहर – ६, ग्रामीण – ३५ केंद्रं

बहुतेक केंद्रांवर परीक्षा शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे सुरू असल्याचं चित्र पहायला मिळालं.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड