UGC चं कॅलेंडर प्रकाशित; बघा पुढील परीक्षा कधी !
UGC Exam Timetable 2020 - 2021
UGC Exam Timetable 2020 – 2021 – देशातील विविध विद्यापीठांमध्ये आणि विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये परीक्षा कधी घेतल्या जाणार? नवीन सत्र कधी सुरू होईल? प्रवेश प्रक्रिया कशी पूर्ण होईल? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) नवीन शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे.
हे कॅलेंडर मार्गदर्शक तत्त्वे म्हणून प्रसिद्ध केलं गेली आहे. यूजीसीने स्थापन केलेल्या दोन समित्यांच्या शिफारशींनुसार आणि त्यांनी सादर केलेल्या अहवालाचा आढावा घेतल्यानंतर हे वेळापत्रक तयार केलं गेलं आहे. करोना विषाणूच्या संक्रमणामुळे उद्भवलेली शैक्षणिक परिस्थिती मार्गी लावण्यासाठी काय करता येईल त्यासाठी या मार्गदर्शक सूचना आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांच्या उपस्थितीत हे कॅलेंडर आणि मार्गदर्शक तत्त्वे बुधवारी जाहीर करण्यात आली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कशा होतील परीक्षा?
सर्व टर्मिनल, एन्ड सेमिस्टर उपलब्ध साधनसामुग्रीनुसार ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने घेता येतील. विद्यापीठे परीक्षेच्या नवीन पद्धती अवलंबू शकतात. परीक्षेचा वेळ तीन तासांवरून कमी करत दोन तासांपर्यंत आणला जाऊ शकतो. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचं पूर्ण पालन व्हायलाच हवं. जुलै 2020 मध्ये विद्यापीठे या परीक्षा घेऊ शकतात.
२०१९-२० साठी नवीन कॅलेंडर
- सेमिस्टरची सुरूवात – १ जानेवारी २०२०
- वर्ग निलंबित – १६ मार्च २०२०
- ऑनलाईन वर्ग – १६ मार्च २०२० ते ३१ मे २०२०
- डेझर्टेशन, प्रकल्प काम, इंटर्नशिप इत्यादी. – १ जून ते १५ जून २०२०
- उन्हाळी सुट्टी – १६ जून ते ३० जून २०२०
- टर्मिनल सेमिस्टर / वार्षिक परीक्षा – १ जुलै ते १५ जुलै २०२०
- इंटरमिजिएट सेमिस्टर / वार्षिक परीक्षा – १५ जुलै ते ३१ जुलै २०२०
- टर्मिनल सेमिस्टर / वार्षिक निकाल – ३१ जुलै २०२०
- इंटरमिजिएट सेमिस्टर / वार्षिक निकाल – १४ ऑगस्ट २०२०
२०२०-२१ साठी नवीन कॅलेंडर
- वर्ग सुरू (द्वितीय व तृतीय वर्षासाठी) – १ ऑगस्ट २०२०
- प्रथम सत्र / वर्षाची नवीन बॅच सुरू – १ सप्टेंबर २०२०
- परीक्षा – १ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१
- सेमिस्टरचे वर्ग सुरू – २७ जानेवारी २०२१
- सेमिस्टर वर्ग समाप्त – २५ मे २०२१
- परीक्षा – २६ मे २०२१ ते २५ जून २०२१
- उन्हाळी सुट्टी – १ जुलै २०२१ ते ३० जुलै २०२१
- नवीन सत्र – २ ऑगस्ट २०२१ पासून
समितीच्या सूचनेनुसार नवीन प्रवेशासाठी सप्टेंबर २०२० पासून शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे निर्देश युजीसीने दिले आहेत. जे विद्यार्थी द्वितीय किंवा तृतीय वर्षाचे आहेत, त्यांचे नवीन सत्र ऑगस्ट २०२० पासून सुरू होईल.
Table of Contents
वर्ग क,ड. ची भरती का करत नाही हे?
वार्ड बॉय सफाईगार ड्राइवर यांची पण आरोग्य विभागात भरती करण्यात यावी यांची पण खूप आवश्यकता आहे आरोग्य विभागात.
B. Com F. Y.sem2
Exam honar ki nahi