ठाणे शिधा वाटप कार्यालयात ५० टक्के पदे रिक्त! Thane ration card office vacancies
Thane ration card office vacancies
विविध सरकारी योजनांसह आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका आवश्यक असते. असे असताना, ठाणे शिधावाटप कार्यालयात लिपिकांसह निरीक्षकांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे नवीन शिधापत्रिका कार्यालयात कामे करताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. बँका, शाळा, पासपोर्ट, विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर आजही कमी अधिक प्रमाणात होतो. आजही रेशनकार्डचे महत्त्व कमी झालेले नाही. तसेच सरकारी योजनांचा लाभघेण्यासाठी, आरोग्य योजनांचा लाभमिळविण्यासाठी शिधापत्रिका हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे आजही शिधापत्रिका घेण्यासाठी नागरिकांच्या कार्यालयाबाहेर लांबच लांब रांगा लागत आहेत.
लिपिकांची पाच ते सहा पदे अजूनही रिक्त
४१ फ या कार्यालयात लिपिकांची ११ पदे मंजूर असून सहा पदे रिक्त आहेत. तर, निरीक्षकांची ११ पैकी पाच पदे रिक्त आहेत. तर, ३६ फ मध्ये निरीक्षकांची पदे जरी समाधानकारक असले तरी, लिपिकांची पाच ते सहा पदे रिक्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लिपिकांचा महत्त्वाचा वाट असतो.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
निरीक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण
तर, मृत व्यक्तींची नावे वगळणे, ऑनलाइन रेशनिंग कार्ड, अन्नधान्याची तपासणी, मॉल, होलसेल मालाची दुकाने, पेट्रोलपंप आदी तपासणीचे काम निरीक्षकांचे आहे. मात्र, निरीक्षकांची पदेच रिक्त असल्यामुळे सध्याच्या घडीला कार्यरत असलेल्या निरीक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे.
कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अधिकाऱ्यांची दमछाक
ठाणे जिल्हाधिकारी 49 कार्यालयाच्या आवारात ३६ फ आणि ४१ फ अशी दोन शिधावाटप कार्यालय आहे. याठिकाणी ३६ फ या कार्यालय अंतर्गत ठाणे शहर तर, ४१ फ या कार्यालय अंतर्गत नवी मुंबईतील बाळे ते ठाण्यातील घोडबंदर असा भाग येतो. या दोन्ही कार्यालयातील २ कार्यालयीन कामकाज हाकताना कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. या दोन्ही कार्यालयात निरीक्षक आणि लिपिकांची मंजूर पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरण्यात यावीत अशी मागणी होत आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.