ठाणे अग्निशामक विभाग भरपूर पदे रिक्त! – Thane Fire Department Recruitment 2024

Thane Fire Department Recruitment 2024

सध्या ठाणे वेगाने विकासाकडे वाटचाल करत आहे. ठाण्यात एकीकडे 50 माळ्याच्या पुढे गगनचुंबी इमारती उभारण्यास परवानगी दिल्याने त्या उभ्या राहत असताना त्यातच ठाण्याची (Thane Fire Department Vacancies 2024) अग्निसुरक्षा ‘राम’ भरोसे असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकाराखाली समोर आली आहे. आकृतिबंध आराखड्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील मंजूर पदापेक्षा अर्ध्याहून अधिक पदे रिक्त आहेत. यामध्ये मुख्य अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. असेच एकूण 835 पदांपैकी 626 पदे रिक्त असल्याने मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या ठाण्यात ही अवस्था असेल तर, राज्यातील इतर शहरांच्या अवस्थेबाबत न बोललेच बरे रे बाबा..! आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा हा मुद्दाही ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

ठाणे शहराची लोकसंख्या आता जवळपास 26 लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यातच महापालिका प्रशासनाकडून त्या 26 लाख ठाणेकरांच्या जीवितास धोका असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली मागविलेल्या माहितीत समोर आले आहे. मंजूर पदापेक्षा अर्ध्याहून अधिक पदे रिक्त आहेत. हे यावरून स्पष्ट दिसत आहे.

अग्निशमन विभागात 30 ऑक्टोबर 2023 अखेरपर्यंत आकृतीबंध मंजूर करीत असताना 835 पदांना मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात अग्निशमन विभागात सध्याच्या घडीला 209 पदे भरली गेली आहेत. तर 626 पदे आजही रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही मागील दोन वर्षात 150 च्या आसपास कर्मचारी वर्ग सेवा निवृत्त झाला आहे. त्यामुळे ही पोकळी देखील दर महिन्याला वाढताना दिसत आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यासह अग्निशमन विभागीय अधिकाऱ्याची 12 पदे मंजूर असताना त्यातील एकच पद भरले गेले असून 11 पदे आजही रिक्त आहेत. सहायक अग्निशमन केंद्र अधिकाऱ्याची 56 पदे मंजूर असतांना केवळ 6 पदे भरली गेली असून तब्बल 50 पदे आजही रिक्त आहेत. आग नियंत्रणात आणण्यात महत्त्वाची भूमिका असताना याची जवानांची 450 पदे मंजूर असताना केवळ 90 पदे भरली गेली असून 360 पदे रिक्त आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड