Telecom Sector Recruitment by foxconn
तैवानस्थित फॉक्सकॉन कंपनीने बंगळुरूजवळील देवनहळ्ळी येथे उभारलेल्या नव्या आयफोन असेंब्ली युनिटसाठी अवघ्या आठ–नऊ महिन्यांत सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांना रोजगार दिला आहे. भारतात आजवर कोणत्याही कारखान्याने केलेली ही सर्वात वेगवान भरती मानली जात असून, चीनबाहेर आपली पुरवठा साखळी विविध करण्याच्या ॲपलच्या कटिबद्धतेचे हे द्योतक आहे. विशेष म्हणजे सुमारे ३०० एकर परिसरात उभारलेली ही सुविधा प्रामुख्याने महिलांच्या माध्यमातून चालवली जात असून, त्यातील सुमारे ८० टक्के महिला १९ ते २४ वयोगटातील आहेत आणि बहुतेकांसाठी ही पहिलीच नोकरी आहे. या युनिटमध्ये एप्रिल–मे २०२५ पासून चाचणी उत्पादन सुरू झाले होते, ज्यामध्ये आयफोन १६ तयार करण्यात आले. सध्या येथे नव्या आयफोन १७ प्रो मॅक्स मॉडेलचे उत्पादन सुरू असून, कारखान्यात तयार होणाऱ्या ८० टक्क्यांहून अधिक आयफोनची निर्यात केली जात आहे.
मिनी टाउनशिप आकार घेत असून, पुढील वर्षी उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या कारखान्यात सुमारे ५० हजार कर्मचाऱ्यांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. परिसरात महिलांसाठी सहा मोठे वसतिगृह (डॉरमिटरी) ब्लॉक उभारण्यात येत असून, त्यापैकी अनेक आधीच कार्यान्वित झाले आहेत. येत्या काळात निवासी सुविधा, वैद्यकीय सेवा, शाळा व मनोरंजनाच्या सोयींसह हा कारखाना मिनी टाउनशिपचे स्वरूप घेऊ शकतो. महिला कर्मचाऱ्यांना दरमहा १८ हजार रुपये वेतन दिले जात असून, ब्लू-कॉलर नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी हे वेतन सर्वाधिक पातळीपैकी एक मानले जाते. यासोबतच मोफत निवास, प्रशिक्षण आदी सुविधाही पुरवण्यात येत आहेत.
देशातील सर्वात मोठा कारखाना ठरणार
फॉक्सकॉन या प्रकल्पात सुमारे २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. सुमारे २ लाख ५० हजार चौरस फूट उत्पादन क्षेत्रफळ असलेला हा कारखाना पूर्ण झाल्यानंतर उत्पादन आणि रोजगार या दोन्ही बाबतीत देशातील सर्वात मोठा कारखाना ठरू शकतो. तमिळनाडूतील फॉक्सकॉनच्या पहिल्या आयफोन युनिटपेक्षाही हा कारखाना मोठा असून, त्या ठिकाणी सध्या सुमारे ४१ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
आयफोन बनवणारी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने (foxconn) मोठी घोषणा केली आहे. फॉक्सकॉन कंपनी भारतात (India) 1200 कोटी रुपये खर्च करून 40 हजार रोजगार निर्माण करण्याच्या तयारीत आहे. फॉक्सकॉनचा भारतातील व्यवसाय 2024 पर्यंत 10 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाणार आहे. त्यामुळं रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. Foxconn ने त्याच्या कर्नाटक स्थित कंपनी Hon High Technology India Mega Development Private Limited मध्ये सुमारे 1,200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. Foxconn Singapore Pvt. या कंत्राटी आयफोन उत्पादन कंपनीच्या सिंगापूर युनिटने अलीकडेच 10 रुपये प्रति शेअर दराने Foxconn Hon Hi Technology India Mega Development Pvt Ltd चे 120.35 कोटी पेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले आहेत. कर्नाटक सरकारने गेल्या आठवड्यात एका निवेदनात म्हटले होते की फॉक्सकॉन डोड्डा बल्लापूरजवळ एक प्रचंड उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी 25000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. ज्यामुळं 40,000 रोजगार निर्माण होतील. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

चीन नंतर भारतातील दुसरा सर्वात मोठा प्लांट कर्नाटकमध्ये असलेले हे युनिट लवकरच फॉक्सकॉनचा चीननंतरचा दुसरा सर्वात मोठा प्लांट असेल. यातून 40000 थेट रोजगार निर्माण होणार आहेत. फॉक्सकॉनचा भारतातील व्यवसाय 2024 पर्यंत 10 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाणार आहे. अलीकडील गुंतवणुकीसह, फॉक्सकॉन सिंगापूरने कर्नाटक युनिटमध्ये एकूण 13,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. कर्नाटक सरकारने फॉक्सकॉनला राज्यातील आगामी मोबाइल उत्पादन युनिटसाठी 300 एकर जमीन दिली आहे. भारतात आतापर्यंत 1.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक फॉक्सकॉनने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आतापर्यंत भारतात 1.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. आम्ही येत्या वर्षात बरेच काही करु अशी माहिती सीईओ यंग लिऊ यांनी दिली.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















