शिक्षक भरतीसाठी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी मंजूर असलेल्या पदांची पडताळणी करण्याच्या संदर्भात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांना देण्यात आले आहेत, ज्याद्वारे ते पवित्र संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या जाहिरातींच्या कार्यवाहीसाठी आवश्यक पडताळणी करणार आहेत. शाळांमधील रिक्त पदांची स्थिती, त्यांचे मंजुरी प्रमाणपत्र आणि संबंधित शाळांमधील शिक्षकांची संख्या तपासली जाईल.

आता शिक्षकांची संख्या वाढलेली आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या पदांची संख्या घटलेली आहे. त्यामुळे, ज्या संस्थांमध्ये या घटनेची शक्यता आहे, त्या शाळांच्या जाहिराती पुन्हा तपासल्या जातील. शिक्षण आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार, जर कोणत्याही शाळेमध्ये पदे रिक्त नाहीत किंवा मंजूर नाहीत, तर त्या शाळेतील पदभरतीची प्रक्रिया रद्द केली जाईल आणि त्यावर कार्यवाही केली जाणार नाही.
शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात १५,०६३ पदे मुलाखतीशिवाय आणि २,७७१ पदे मुलाखतीसह एकूण १८,०३४ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली. यानंतर दुसऱ्या टप्यात नवीन जाहिरातींची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. हे सर्व कार्य २०२४-२५ शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यतांच्या आधारावर केले जात आहे, तथापि, यामध्ये पदांची संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, रिक्त पदांची आणि जाहीरातींची खातरजमा अत्यंत महत्त्वाची आहे.
शिक्षण आयुक्त यांनी स्पष्ट केले की, शाळांमधील पदभरतीसाठी जे संस्थांनी जाहिराती दिल्या आहेत, त्या शाळांच्या २०२४-२५ च्या संच मान्यतांच्या आधारावर रिक्त पदे पडताळूनच प्रक्रिया सुरू केली जाईल. यासाठी १५ एप्रिल २०२५ पर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे सर्व सुनिश्चित करण्याचे उद्दीष्ट म्हणजे, योग्य आणि पारदर्शक भरती प्रक्रिया सुरू करणे, ज्यामुळे शिक्षकांची नियुक्ती योग्य पद्धतीने होईल आणि शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















