दिवाळीनंतर होणार 10 वी – 12 वीची पुरवणी परीक्षा
Supplementary Exam of 10th and 12th Students
Supplementary Exam of 10th and 12th Students : कोरोनामुळे रखडलेली दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या स्तरावर सुरू आहे. परीक्षा केंद्रांची संख्या कमी करून तालुक्याच्या ठिकाणी एकाच केंद्रात सोशल डिस्टन्स राखून ही परीक्षा घेण्याचा विचार सुरू आहे.
दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्यात सुमारे एक लाख ८० हजार विद्यार्थी पात्र आहेत. फेब्रुवारी, मार्चमध्ये झालेल्या परीक्षेत हे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या कपाळावरील ‘नापास’ हा शिक्का पुसला जावा, यासाठी तत्कालीन भाजप सरकारने पुरवणी परीक्षेला सुरवात केली. जूनमध्ये परीक्षांचे निकाल लागल्यावर जुलै किंवा ऑगस्टमध्ये तातडीने ही परीक्षा घेतली जायची.
Supplementary Exam of 10th and 12th Students
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशाचा मार्ग यामुळे खुला व्हायचा. एटीकेटी विद्यार्थ्यांना दोन परीक्षांची संधी दिली जात होती. कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या नियमित परीक्षा तसेच फेरपरीक्षेचे वेळापत्रक कोलमडले. कोरोनामुळे सोशल डिस्टन्स राखून परीक्षा घेणे कठीण आहे. विद्यार्थ्यांची संख्याच मोठी असल्याने राज्य मंडळासमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे जुलै, ऑगस्टमध्ये होणारी परीक्षा पुढे गेली.
दहावी, बारावीची फेरपरीक्षा होणार
एका तालुक्याला दहावी आणि बारावीसाठी प्रत्येकी एकच केंद्र बनवून तेथे ही परीक्षा घेतली जाईल. पूर्वी एका वर्गात २५ विद्यार्थ्यांना बसवून परीक्षा घेतली जात होती. आता ही बैठक व्यवस्था शक्य नाही. त्यामुळे स्वतंत्र केंद्र करूनच ही परीक्षा होईल. नियमित परीक्षांच्या निकालानंतरही अकरावीचे वर्ग अद्याप सुरू झालेले नाहीत. बारावीनंतरच्या वरिष्ठ महाविद्यालयाची स्थितीही अशीच आहे. या पार्श्वभूमीवर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
कोल्हापूर विभागांतर्गत जिल्ह्यासह सांगली, सातारा यांचा समावेश होतो. यंदा बारावीचा निकाल ९३ टक्के, तर दहावीचा निकाल ९७ टक्के लागला. त्यामुळे कोल्हापूर विभागात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. तिन्ही जिल्ह्यांत मिळून दोन्ही परीक्षांचे साधारण २५ हजार विद्यार्थी परीक्षा देतील. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे.
“पुरवणी परीक्षेसंदर्भात राज्य मंडळाच्या स्तरावर विचार सुरू आहे. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही. केंद्रांची संख्या कमी करून मोठ्या केंद्रावर स्वतंत्रपणे या परीक्षा घेण्याबाबत चर्चा सुरू आहे.”
सोर्स : सकाळ