महत्त्वाचे – उपजिल्हा रुग्णालयात सेवक भरती करणार
Sub-District Hospital Bharti 2021
Sub-District Hospital Bharti 2021 : शिराळा उपजिल्हा रुग्णालयातील सेवक भरतीबाबत आरोग्य मंत्र्यांशी लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल व आमदार निधीतून एक नवीन रुग्णवाहिका देणार आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड व इतर आजारांवरील तपासण्यांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार नाईक म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन झाल्यानंतर काही कालावधित कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे येथील सेवक भरती रखडली. आता याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. उपजिल्हा रुग्णालयासाठी आमदार निधीतून एक रुग्णवाहिका देणार आहे. रुग्ण नसल्याने येथे सुरू केलेले कोविड सेंटर बंद केले आहे. पण येथील ग्रामीण रुग्णालयात कोविडसह इतर सर्व तपासण्या व उपचार करण्यात हयगय करू नये, अशी सूचना त्यांनी केली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वैद्यकीय अधिकारी एक जागा रिक्त असून, त्याबाबत व कोविड लसीकरण मोहीम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरध्वनीवरून आमदार नाईक यांनी चर्चा केली. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन, डॉ. विनायक धस, डॉ. गायत्री यमगर, डॉ. मनोज महिंद, डॉ. अनिरुद्ध काकडे यांच्यासह तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
फोटो-०२ शिराळा१फोटो ओळी : शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या बैठकीत आढावा घेताना आमदार मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे उपस्थित होते.
सोर्स : लोकमत