शिक्षण मंडळाच्या रिक्त पदांवर भरतीचा निर्णय; लवकरच ३०० जागांसाठी लवकरच जाहिरात येणार | State Board of Education Bharti

State Board of Education Bharti

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयासह नऊ विभागीय कार्यालयांमध्ये लवकरच सुमारे ३०० पदांची भरती होणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सुवर्णसंधी मिळणार आहे.या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, यासाठीचा प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

सध्या मंडळाच्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि नाशिक या नऊ विभागीय कार्यालयांत दहावी-बारावी परीक्षा आणि अन्य शैक्षणिक कामकाज केले जाते. २०१९ साली याच मंडळात २६६ कनिष्ठ लिपिक भरले गेले होते. मात्र, गेल्या सहा वर्षांत मोठ्या संख्येने कर्मचारी निवृत्त झाल्याने अनेक पदे रिक्त झाली आहेत. परिणामी कार्यभार कमी कर्मचाऱ्यांवर असल्याने कामाचा ताण वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर, परीक्षा प्रक्रिया व अन्य कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी क्लर्कच्या २८६ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या ११ अशा एकूण २९७ पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, “मंडळ हे स्वायत्त असून, त्याच्या उत्पन्नातूनच पगार, पेन्शन व सुविधा पुरवल्या जातात. मात्र, भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय मान्यता आवश्यक असल्यामुळे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच ही भरती पूर्णत्वास जाईल.”

ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यास, राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असून बेरोजगार उमेदवारांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड