23 एप्रिलनंतर होईल दहावी- बारावीच्या परीक्षा
SSC HSC Re-Exam 2020
दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच ! 23 एप्रिलनंतर होईल परीक्षा
SSC HSC Re-Exam 2020 : दहावी आणि बारावीच्या विषयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्यप्राय मानले जात आहे. दुसरीकडे बहुपर्यायी प्रश्नपत्रिकांद्वारे परीक्षा घेणेही विद्यार्थीहिताचे नाही. तर मे महिन्यातील उन्हाळा आणि जूनमधील पावसाळ्याचा अनुभव पाहता ही परीक्षा ऑफलाईनच घेतली जाणार असून 23 एप्रिलनंतर परीक्षा घेण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरु आहे.
ऑनलाइन परीक्षा अशक्य
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असते. दुसरीकडे त्यांच्या विषयांची संख्याही खूप असल्याने ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्य आहे. परीक्षेचे वेळापत्रक ठरविण्यासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे.
दरवर्षी दहावी- बारावीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी- मार्चपासून सुरु होते. मात्र, यंदा कोरोनामुळे 15 जूनऐवजी 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. तत्पूर्वी, ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. मात्र, त्यातून विद्यार्थ्यांना एकतर्फीच शिक्षण मिळाले. आता 23 एप्रिलपर्यंत हे वर्ग सुरु राहणार असून त्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु झाले आहे. दरम्यान, जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत, त्यांच्यासाठी गुगल मिटद्वारे ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. 23 एप्रिलपर्यंत किमान 70 टक्क्यांपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्यादृष्टीने शिक्षकांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंतच्या 25 हजार 866 पैकी साडेनऊ हजार शाळा सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे 59 लाख 27 हजार 456 पैकी सुमारे चार लाखांपर्यंत विद्यार्थी शाळेत येत आहेत. त्यात दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे आता एक ते दीड महिना उशिराने दहावी- बारावीची परीक्षा घेण्याचे नियोजन युध्दपातळीवर सुरु झाले असून जानेवारीत बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर होईल, असेही सांगण्यात आले.
सोर्स : सकाळ
SSC HSC Re-Exam 2020 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेला आज शुक्रवार २० नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने परीक्षा केंद्रावर थर्मल गनद्वारे तपासणी, सॅनिटायझर, मास्कचा वापर आवश्यक करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी गुरुवारी दिली.
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेस करोनामुळे विलंब झाला. जुलै-ऑगस्टमध्ये होणारी परीक्षा तीन महिने उशिराने होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मंडळाने विविध उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा केंद्रावर थर्मल गन, सॅनिटायझरसह पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांना मास्क खरेदीसाठी मंडळाने निधी खर्च केला आहे. परीक्षेच्या पूर्व संध्येला शहरातील अनेक परीक्षा केंद्रांनी वर्गखोल्या सॅनिटाइझ करून घेतल्या. याच बरोबर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पेपरला अर्धा ते एक तास अगोदर यायचे आहे; तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी करुन वर्गखोलीत प्रवेश देण्यात येणार आहे.
सकाळी १०:३० ते १:३० यावेळेत पेपर होणार असून, केंद्रात येतांना मास्क बंधनकारक आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसवण्यात येणार असून, एका परीक्षा कक्षात १२ किंवा १३ परीक्षार्थींची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. राज्यातून इयत्ता दहावीचे ४२ हजार ६३४ विद्यार्थी ३५५ केंद्रांवर, तर बारावीचे ६७ हजार ६०३ विद्यार्थी ३१७ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.
SSC HSC Re-Exam 2020 : दहावी-बारावी अनुत्तीर्णांसाठी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये फेरपरीक्षा; विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरणासाठी हेल्पलाईन
राज्य शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येत आहे. या फेरपरीक्षेसंदर्भात विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाकडून 19 नोव्हेंबरपासून विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत होणार आहे.
परीक्षेच्या भीतीने विद्यार्थी मानसिक तणाव व दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच विद्यार्थी, पालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर ऑनलाईन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सहज मदत उपलब्ध व्हावी यासाठी राज्य मंडळाच्या कार्यालयात 19 नोव्हेंबरपासून हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई विभागीय मंडळाच्या हेल्पलाईनचे दूरध्वनी क्रमांक 27881075/27893756 असे आहेत. ही हेल्पलाईन सेवा 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
फेरपरीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास त्यांना हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मार्गदर्शन व मदत घेता येणार आहे. विद्यार्थी व पालकांनी परीक्षेसंदर्भात परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था, वेळापत्रक, हॉलतिकीट तसेच प्रश्नपत्रिकेशी संबंधित प्रश्न आदीबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये; मात्र यासंबंधात काही शंका असल्यास मुंबई विभागीय मंडळ कार्यालयाच्या हेल्पलाईन क्रमाकांवर विचारणा करावी, अशी माहिती राज्य मंडळाचे मुंबई विभागीय सचिव संदीप संगवे यांनी परिपत्रकाद्वारे दिली.
समुपदेशकांचे नाव व भ्रमणध्वनी
अशोक सरोदे- 9322527076, एस. एन. शिपूरकर- 9819016270, व्ही. एन. जाधव- 9868874623, बी. के. हयाळीज- 9423947266, श्रीकांत शिनगारे- 9869634765, स्नेहा चव्हाण- 7506302353, अखलाक शेख- 9967329370, अनिलकुमार गाढे- 9969038020, चंद्रकांत मुंढ- 8169699204, शैलजा मुळये- 9820646115 यांच्याशी संपर्क साधावा.
सोर्स: सकाळ
SSC HSC Re-Exam 2020 : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबर फेरपरीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. या परीक्षा दिवाळीनंतरच होण्याची शक्यता शिक्षणमंत्र्यांनी बोलून दाखवली.
SSC HSC Re-Exam 2020: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या श्रेणीसुधार तसेच पुनर्परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार नाहीत. राज्यातील कोविड – १९ स्थिती पाहता या परीक्षा आता दिवाळीनंतरच होणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या पुनर्परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. ‘या परीक्षा सर्वसाधारण स्थितीत ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जातात. परंतु यंदा राज्यावर करोनाचं सावट असल्याने या परीक्षा नोव्हेंबर किंवा कदाचित डिसेंबरपर्यंतही लांबणीवर पडतील,’ असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, दरवर्षी दहावी आणि बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तत्काळ फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी दिली गेल्या काही वर्षांपासून मिळत होते. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय घेतला होता. यानुसार दहावी, बारावीचा निकाल साधारणपणे मे महिन्यात जाहीर झाल्यानंतर तत्काळ जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली जात होती, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नव्हते. पण यंदा परीक्षांचे निकालच मुळात जुलै मध्ये लागल्याने या फेरपरीक्षाही झाल्या नाहीत. यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष वाचवण्याची संधी मिळालेली नाही.
कोविड-१९ संसर्ग स्थितीमुळे यंदा दहावी-बारावीच्या मूल्यांकन प्रक्रियेस आणि पर्यायाने निकालास विलंब झाला. लॉकडाऊनमुळे दहावीची भूगोल विषयाची परीक्षा देखील रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले. कोविड-१९ संसर्गग्रस्त रुग्णांची संख्या अद्यापही कमी झालेली नाही. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना करोना संसर्गाचा फटका बसला आहे. या सगळ्याचा परिणाम परीक्षांवर होत आहे. करोनामुळे अनेक शाळांच्या इमारतींचे रुपांतर क्वारंटाइन सेंटरमध्ये करण्यात आले आहे. परिणामी तूर्त तरी कोणत्याही परीक्षा घेण्याची राज्य सरकारची मानसिकता नाही. याचाच परिणाम म्हणून दहावी, बारावी फेरपरीक्षा लांबणीवर पडल्या आहेत.
सोर्स : म. टा.
Table of Contents
Govrment job
Pls job here