SSC CGL 2024 परीक्षा 9 सप्टेंबरपासून होणार, अर्जामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया 10 ऑगस्टपासून!
SSC CGL Exam Date Announced
मित्रांनो, SSC CGL परीक्षा 2024 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी हि एक मोठी बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) विविध केंद्रीय मंत्रालये, विभागे आणि संस्थांमध्ये पदवीधर पात्रतेच्या रिक्त पदांवर थेट भरतीसाठी आयोजित केली जाणारी संयुक्त पदवी स्तर (CGL) परीक्षा 2024 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाने गुरुवारी, 8 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या परीक्षेचा पहिला टप्पा टियर 1, 9 ते 26 सप्टेंबर दरम्यान आयोजित केला जाईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तथापि, SSC ने CGL परीक्षा 2024 च्या टियर 1 मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना जारी केले जाणारे प्रवेशपत्र डाउनलोडसाठी उपलब्ध करून देण्याची तारीख अधिसूचनेत नमूद केलेली नाही. पूर्व परीक्षांच्या पॅटर्ननुसार, SSC CGL 2024 टियर 1 साठी प्रवेशपत्र परीक्षा सुरू होण्याच्या तारखेच्या 3-4 दिवस आधी जारी करू शकते. अधिकृत अद्यतनांसाठी उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित होणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तसेच महत्वाचे म्हणजे , SSC ने CGLE 2024 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पूर्वी सबमिट केलेल्या त्यांच्या ऑनलाइन अर्जामध्ये सुधारणा किंवा बदल करण्याची संधी दिली आहे. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना त्यांच्या सबमिट केलेल्या अर्जामध्ये सुधारणा किंवा बदल करायचा आहे, ते आयोगाद्वारे 10 ऑगस्टच्या सकाळी 1 वाजल्यापासून 11 ऑगस्टच्या रात्री 11 वाजेपर्यंत उघडण्यात येणाऱ्या अर्ज सुधारणा विंडोच्या माध्यमातून यासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की SSC ने या कालावधीनंतर कोणत्याही प्रकारच्या बदलाची परवानगी दिली जाणार नाही, असे जाहीर केले आहे.