राज्य मंडळाकडून इयत्ता दहावीच्या निकालाची तयारी

SSC Exam 2021 Update

Preparation of Class X Results from State Board

SSC Exam 2021 Update : The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has started the process of preparing the results after the state government announced the evaluation system for the results of Class X. Further details are as follows:-

राज्य मंडळाकडून इयत्ता दहावीच्या निकालाची तयारी. राज्य शासनाने दहावीच्या निकालाची मूल्यांकन पद्धती जाहीर केल्यानंतर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, शाळांनी राज्य मंडळाला कोणत्या स्वरूपात गुण पाठवावेत, यासंदर्भातील आराखडा दि. १ जून रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दहावीचा निकाल इयत्ता नववीमधील गुण आणि शाळास्तरावर इयत्ता दहावीत घेतलेल्या विविध परीक्षांच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याचे अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले. त्यानुसार राज्य मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.‌ प्रत्येक विद्यार्थ्याने विविध परीक्षांमध्ये प्राप्त केलेले गुण शाळांकडून राज्य मंडळ मागविणार आहे. विद्यार्थ्यांचे गुण शाळांनी कोणत्या स्वरूपात भरून पाठवावेत याबाबतचा आराखडा राज्य मंडळाकडून तयार केला जात आहे.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..


दहावी परीक्षा अर्ज भरण्यास 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

SSC Exam 2021 Update: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक प्रमाणे २५ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. यापूर्वीची मुदत सोमवारी ११ जानेवारी रोजी संपत होती.

नोंदणी कुठे करायची?

राज्य मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in यावर विद्यार्थी माध्यमिक शाळांमार्फत नोंदणी करू शकतात.

या तारखांव्यतिरिक्त बोर्डाने परिपत्रकात आणखी महत्त्वाची माहिती दिली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे. त्यासाठी Saral Data वरूनच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. तसेच यावर्षी नव्याने फॉर्म १७ द्वारे नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची २०२१ मधील परीक्षेसाठी अ्ज भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाणार आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यात येऊ नयेत, असेही बोर्डाने कळवले आहे.

SSC Exam 2021 Update – महत्त्वाच्या तारखा

  • नियमित विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत – १२ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१
  • पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत – १२ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१
  • माध्यमिक शाळांनी चलन डाऊनलोड करून त्याद्वारे बँकेत शुल्क भरण्याची मुदत – १२ जानेवारी २०२१ ते १ फेब्रुवारी २०२१
  • माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रि-लिस्ट जमा करण्याची मुदत – ४ फेब्रुवारी २०२१

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड