दहावी परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात
SSC Exam 2021
SSC Exam 2021 : SSC exam 2021 process of online application forms begins from 23rd December – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया बुधवार २३ डिसेंबर २०२० पासून सुरु होत आहे. नियमित, पुनर्परीक्षार्थी, खासगी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षा देणार असलेले अशा सर्व प्रकारचे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने ही नोंदणी करू शकणार आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
नोंदणी कुठे करायची?
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्य मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in यावर विद्यार्थी माध्यमिक शाळांमार्फत नोंदणी करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा – SSC Exam 2021
- नियमित विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत – २३ डिसेंबर २०२० ते ११ जानेवारी २०२१
- पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत – १२ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१
- माध्यमिक शाळांनी चलन डाऊनलोड करून त्याद्वारे बँकेत शुल्क भरण्याची मुदत – २३ डिसेंबर २०२० ते १ फेब्रुवारी २०२१
- माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रि-लिस्ट जमा करण्याची मुदत – ४ फेब्रुवारी २०२१
या तारखांव्यतिरिक्त बोर्डाने परिपत्रकात आणखी महत्त्वाची माहिती दिली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे. त्यासाठी Saral Data वरूनच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. तसेच यावर्षी नव्याने फॉर्म १७ द्वारे नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची २०२१ मधील परीक्षेसाठी अ्ज भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाणार आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यात येऊ नयेत, असेही बोर्डाने कळवले आहे.
सोर्स : म. टा.
Table of Contents