स्थानिक श्रीनाथ विद्यालयात सोमवारी दुपारी सुरक्षा कर्मचारी व सुपरवायझर भरतीच्या नावाखाली बोलाविलेल्या शेकडो युवकांकडून शंभर रुपये प्रवेश शुल्क वसूल करणाऱ्या नदीम आणि शिवनाथ या दोघांची स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. मात्र, या प्रकरणाची पोलिसांत लेखी तक्रार करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्याने ती तक्रार मागे घेतल्याने वादावर पडदा पडला. तक्रारीनुसार ९ ते १२ सप्टेंबरदरम्यान कॅपिटल सिक्युरिटी या संकेतस्थळाच्या नावाने कोणताही विस्तृत पत्ता व ठावठिकाणा न देता सुरक्षा जवानांची भरतीची जाहिरात स्थानिक मीडियात आठ दिवसांपूर्वी झळकली. ती भरती तुफान व्हायरल झाली. भारत कौशल्य विकास योजना असे नाव या जाहिरातीस देण्यात आले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

CPF ग्रुप नावाने आशिया खंडातील मोठा ग्रुप असेही जाहिरातीत नमूद आहे. विशेष असे की, भरतीत सहभागी होणाऱ्या तरुण, तरुणींना नाशिक पोलिस दलात नोकरी देण्याची बतावणी जाहिरातीतून करण्यात आली, याबाबत तहसील अधिकारी वा जिल्हाधिकारी कार्यालयाला कुठलीही माहिती नाही. भरती आयोजित करणारे युवक भरतीस आलेल्या बेरोजगार युवकांकडून गेटवरच शंभर रुपये व नोंदणी फी साडेतीनशे रुपये वसूल करीत होते आणि त्यांना शिस्तभंगाच्या सबबीखाली छडीचे फटकेसुद्धा मारीत होते. आलेल्या बहुतांश युवकांना या आयोजकांनी घेतलेली रक्कम तक्रारीनंतर पोलिस स्टेशन आवारात परत केली. यावरून ही संपूर्ण भरतीप्रक्रिया केवळ बनाव असून, युवकांकडून पैसे उकळण्यासाठी राबविल्या गेल्याचा आरोप करण्यात आला. मात्र त्यानंतर तक्रारकर्ता पदाधिकारी बॅकफूटवर आल्याने मुसळ केरात गेले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















