ITI प्रशिक्षित विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीच्या संधी! – Skill Development Maharashtra 2023
Skill Development Training
Skill Development Training
Skill Development Training: India is known as a young country. Through the skill development department, the youth are getting employment along with education. The Director, Directorate of Vocational Education and Training said that if the students develop their skills by getting proper training through industrial training centers, they have a big salary opportunity abroad.
भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तरूणांना शिक्षणासोबत रोजगार प्राप्त होत आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन कौशल्य विकास केल्यास त्यांना परदेशात मोठ्या पगाराची संधी असल्याचे प्रतिपादन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांनी केले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्यातील 418 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासिकांचे उद्घाटन आज झाले. त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेत अभ्यासिका सुरू केली आहे. अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासाबरोबर इतर परीक्षा, स्पर्धा परीक्षा यांचे प्रशिक्षण गरीब विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका लाभदायक आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी अभ्यासिकेचा वापर व्हावा. जर्मनी, जपान या देशांमध्ये महाराष्ट्रातील 70 विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन नोकरी करीत आहेत. आणखी आयटीआय प्रशिक्षण घेणारे साडेतीन हजार विद्यार्थी परदेशी पाठवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याकरिता जपान, जर्मनी येथील भाषेचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचाही प्रयत्न शासन करणार आहे.
श्री. पाटील यांनी सांगितले की, अभ्यासिकेच्या माध्यमातून कौशल्य विकसित करण्यास मदत होणार आहे. ही अभ्यासिका संध्याकाळी सहा ते नऊ या काळात सुरू राहणार असून यासाठी स्वतंत्र कर्मचारी, सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. गरीब, होतकरू विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घेवून आपले भविष्य घडवावे, असेही आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी मार्फत जिल्हयातील शेतकरी/शेती व्यवसाय करणारे तसेच इतर बेरोजगारांना किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2022-2023 या योजनेअंतर्गत विविध कोर्सेसचे विनाशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण परभणी जिल्हयातील शेतकरी/शेती व्यवसाय करणारे तसेच इतर बेरोजगारांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,परभणी या कार्यालयामार्फत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 20222023 या योजनेअंतर्गत आगामी होणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणात एकूण 14 कोर्सेसमध्ये विनाशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कृषी क्षेत्रातील प्रत्येक कोर्ससाठी 60 व इतर कोर्ससाठी प्रत्येकी 30 असे एकूण 660 बेरोजगारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कौशल्य विकास कार्यक्रम सन 2022-2023 या योजनेअंतर्गत विविध कोर्सेसचे विनाशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण
Skill Development Training Program
तरी परभणी जिल्हयातील 18 ते 45 वयोगटातील महिला/पुरुष इत्यादींनी वरील कोर्सेसमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणात प्रवेश घेणेसाठी दि. 22/10/2022 पूर्वी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी या कार्यालयास संपर्क साधून आजच प्रशिक्षणासाठी आपला प्रवेश निश्चीत करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी, परभणी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संबधीत प्रशिक्षण संस्था किंवा सहायक आयुक्त, कौशल्य विकास विभाग यांचे (मो.क्र.9420788747), श्री सुमीत दिक्षीत (मो.क्र. 9890828797), श्री प्र.सु.रुद्रकंठवार (मो.क्र. 9860015383) या भ्रमणध्वनीवर किंवा 02452 220074 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
PDF जाहिरात – https://bit.ly/3yxHVRd
Skill Development Training 2022
Skill Development Training : Free Training Program for Preliminary competitive examination for tribal candidates under the Ministry of Skill Development and Entrepreneurship (MSDE). Free Training Session, Trainee Selection Process, and Interview will be held on the 25th of August 2022 at Skill Development Employment and Entrepreneurship Information and Guidance Centre. Further details are as follows:-
MSDE Free Training Program 2022
“राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथील पोस्ट ऑफिसजवळ आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत प्रशिक्षण सत्र, प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखती सोमवारी (ता.२५ ऑगस्ट) सकाळी दहा वाजता होणार आहेत.”अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख सां.ब मोहिते यांनी दिली.
- ते म्हणाले. “प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना एक हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल.
- प्रशिक्षणाचे हे १०४ वे सत्र आहे. उमेदवारांना साडेतीन महिने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते.
- दरम्यान हे प्रशिक्षण पूर्ण वेळ असून गणित, इंग्रजी, लिपिक योग्यता चाचणी, सामान्य ज्ञान हे विषय शिकवले जातात.
- उमेदवारांना स्वयंरोजगार माहिती मार्गदर्शन केले जाते.
- प्रशिक्षण पूर्ण झालेल्या शासकीय निमशासकीय व आस्थापनांमध्ये वर्ग तीन पदासाठी निवड होण्यास या प्रशिक्षणाचा लाभ होऊ शकतो.
MSDE Training Program – Eligibility Criteria
- १८ ते ३८ वयोगटातील इयत्ता दहावी उत्तीर्ण मुला-मुलींसाठी प्रशिक्षण आहे.
- प्रशिक्षण कालावधीमध्ये निवास व भोजनाची उमेदवारांना स्वतः व्यवस्था करावी लागेल.
- उमेदवारांनी सर्व मूळ शैक्षणिक पात्रतेच्या व सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीच्या दाखल्यासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9766434141 / 9325888322 येथे संपर्क साधावा.
“कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मंचर येथील पोस्ट ऑफिसजवळ आदिवासी उमेदवारांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये दोन हजार ७६६ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी एक हजार २०९ उमेदवारांना शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये रोजगार मिळालेला आहे. आदिवासी युवक व युवतींनी मोफत प्रशिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा.”
Skill Development Training : Minority youth, women will get skill development training – राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना स्थानिक व्यावसायिक आणि औद्योगिक गरजांनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी 20 कोटी रुपये खर्च होणार असून आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. यंदा पहिल्या टप्प्यात 11 हजार 764 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून राज्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल;अशी माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
बँकींग, हेल्थ केअर, लॉजिस्टीक्स अशी विविध प्रशिक्षणे
मुस्लिम ख्रिश्चन शीख, बौद्ध, पारशी, जैन आणि ज्यू समुदायातील 15 ते 45 वयोगटातील युवक आणि महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. बँकींग आणि टॅक्स असिस्टंट,;हेल्थ केअर,बांधकाम,;लॉजिस्टीक्स,;कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर,;ॲनिमेशन आणि मल्टीमीडिया (असिस्टंट कॅमेरामन);ऑटोमोबाईल,;मोटार मेकॅनिक हेवी व्हेईकल,;रोड रोलर ड्रायव्हर,;जेसीबी ड्रायव्हर यांसह स्थानिक व्यवसाय,;स्थानिक उद्योग यांच्या गरजांनुसार हे प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षण साधारण 300 ते 600 तासांचे असेल. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणीकृत संस्थांची निवड करुन त्यांच्यामार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संस्थांची निवड लवकरात लवकर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून ही प्रशिक्षणे सुरु करण्यात येतील. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे;असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात 11 हजार 764 उमेदवारांना प्रशिक्षण
जिल्ह्यांमधील अल्पसंख्याक समुदायातील 15 ते 45 वयोगटातील युवक आणि महिलांच्या लोकसंख्येच्या आधारे त्या-त्या जिल्ह्यांमधील प्रशिक्षणांच्या बॅच आणि उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक बॅचमध्ये साधारण 30 उमेदवार असतील. त्यानुसार मुंबई उपनगरात 50 बॅचमध्ये एक हजार 509 उमेदवार,;ठाणे जिल्ह्यात 35 बॅचमध्ये एक हजार 070 उमेदवार,;औरंगाबाद जिल्ह्यात 21 बॅचमध्ये 637 उमेदवार,पुणे जिल्ह्यात 20;बॅचमध्ये 618 उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात 19 बॅचमध्ये 573 उमेदवार,;नागपूर जिल्ह्यात 19 बॅचमध्ये 568 उमेदवार,नांदेड जिल्ह्यात 17 बॅचमध्ये 510 उमेदवार,;नाशिक जिल्ह्यात 16 बॅचमध्ये 482 उमेदवार,;अमरावती जिल्ह्यात 15 बॅचमध्ये 467 उमेदवार,;जळगाव जिल्ह्यात 14 बॅचमध्ये 428 उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात 14 बॅचमध्ये 414 उमेदवार,;अकोला जिल्ह्यात 13 बॅचमध्ये 407 उमेदवार,;परभणी जिल्ह्यात 10 बॅचमध्ये 298 उमेदवार,;यवतमाळ जिल्ह्यात 9 बॅचमध्ये 280 उमेदवार, ;सोलापूर जिल्ह्यात 9 बॅचमध्ये 278 उमेदवार,लातूर जिल्ह्यात 9 बॅचमध्ये 260 उमेदवार,;जालना जिल्ह्यात 8 बॅचमध्ये 251 उमेदवार,;कोल्हापूर जिल्ह्यात 7 बॅचमध्ये 231 उमेदवार,;बीड जिल्ह्यात 7 बॅचमध्ये 226 उमेदवार,;अहमदनगर जिल्ह्यात 7 बॅचमध्ये 217 उमेदवार,;चंद्रपूर जिल्ह्यात 7 बॅचमध्ये 211 उमेदवार,;रायगड जिल्ह्यात 6 बॅचमध्ये 194 उमेदवार, ;वाशिम जिल्ह्यात 6 बॅचमध्ये 187 उमेदवार,;हिंगोली जिल्ह्यात 6 बॅचमध्ये 182 उमेदवार,;सांगली जिल्ह्यात 6 बॅचमध्ये 179 उमेदवार,;रत्नागिरी जिल्ह्यात 5 बॅचमध्ये 152 उमेदवार, सातारा जिल्ह्यात 5 बॅचमध्ये 149 उमेदवार, धुळे जिल्ह्यात 4 बॅचमध्ये 123 उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात 4 बॅचमध्ये 120 उमेदवार,;वर्धा जिल्ह्यात 4 बॅचमध्ये 116 उमेदवार,;भंडारा जिल्ह्यात 3 बॅचमध्ये 89 उमेदवार,;नंदुरबार जिल्ह्यात 3 बॅचमध्ये 83 उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात 3 बॅचमध्ये 79 उमेदवार,;गडचिरोली जिल्ह्यात 2 बॅचमध्ये 75 उमेदवार,;पालघर जिल्ह्यात 2 बॅचमध्ये 69 उमेदवार तर सिंधुदूर्ग जिल्ह्यात 1 बॅचमध्ये 33 उमेदवार याप्रमाणे एकूण 11 हजार 764 उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक उमेदवाराला दर्जेदार प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रत्येकी सुमारे 17 हजार रुपये खर्च होणार आहे,;असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
प्रशिक्षण संपल्यानंतर उमेदवारांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत कार्यवाही करण्यात येईल. तसेच उमेदवारांना सेक्टर स्किल कौन्सील यांच्यामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.
सोर्स : महासंवाद
Table of Contents
I Uploaded all the Personal details on Maha swaynm rojgar site, not able submit, site not accepting details, guide me