युवा प्रशिक्षणांतर्गत नियुक्त शिक्षणसेवकांना मानधन कधी मिळणार?? | Shikshak Sevak Bharti 2025
Shikshak Sevak Application Form 2025
Shikshak Sevak Bharti 2025 Update
Shikshak Sevak Bharti 2025: मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत तीन महिन्यांपासून नियुक्त केलेले शिक्षण सेवक मानधनापासून वंचित असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने लाडक्या बहिणींप्रमाणे लाडक्या शिक्षणसेवकांकडेही लक्ष घेऊन तत्काळ मानधन मिळवून देण्याची मागणी शिक्षकांनी तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देत केली. महायुती सरकारने निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली होती. या योजनेत राज्य सरकारच्या सर्व विभागांमध्ये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यभरात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारक विद्यार्थ्यांना ८ हजार तर पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने देण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांवरील रिक्त जागेवर शाळा व्यवस्थापन समितीच्या शिफारशीनुसार येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत २३६ शिक्षण सेवकांना सप्टेंबर २०२४ महिन्यात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या कालावधीत शैक्षणिक पात्रतेनुसार मानधन शासनाकडून अदा केले जाणार होते. मात्र, दोन ते तीन महिने उलटूनदेखील एक रुपयाही मानधन मिळाले नाही. तसेच सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी हादेखील कमी असून तो वाढवून मिळावा व मानधन लवकरात लवकर मिळावे या मागणीसाठी शिक्षण सेवकांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना निवेदन दिले. दोन महिन्यांपासून अध्यापन करूनही मिळणारे मानधन अद्याप न मिळाल्याने प्रशिक्षणार्थी नैराश्येच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे मानधनाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मानधनाची प्रक्रिया शासनस्तरावरून
• ‘शाळा व्यवस्थापन समितीच्या शिफारशीनुसार शिक्षण विभागाने या नियुक्त्या दिल्या आहेत. त्यांच्या मानधनाची प्रक्रिया शासनस्तरावरून परस्पर होणार आहे. त्यासाठीची सर्व माहिती आम्ही पाठवलेली आहे. संजय कुसाळकर, गटशिक्षणाधिकारी
Shikshak Sevak Bharti 2024
शिक्षक भरती बद्दल एक महत्वाचा नवीन अपडेट समोर आला आहे. राज्यात राबविल्या जात असलेल्या शिक्षकभरतीतून नियुक्त झालेल्या शिक्षणसेवकांना आता आणखी एक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास तीन वर्षे शिक्षणसेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना शिक्षक भारती ने निवेदन देऊन हे परिपत्रक रद्द करा, अशी मागणी केली असल्याची माहिती ‘शिक्षक भारती’चे नेते तथा राज्य सुनील गाडगे यांनी दिली. तीन वर्षांनी आपसूकच कायमस्वरूपी होणारी नोकरी टिकविणे आता कठीण जाणार असून, शिक्षणसेवकांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. हि शिक्षकसेवकांसाठी एक त्रासाची गोष्ट झाली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात नुकतीच जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, शिक्षकभरती पार पडली. यात १४ हजार उमेदवारांना शिक्षणसेवक वर्षांची नेमणूक देण्यात पाच हजार म्हणून तीन आली आहे, तर उमेदवार आजही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या आधी तीन वर्षे शिक्षणसेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना शिक्षक म्हणून कायम केले जायचे. परंतु आता मात्र तीन वर्षांनंतर त्यांना नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती दिली आणार नाही. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे त्यांची परीक्षा घेतली उत्तीर्ण झाले तरच जाईल. परीक्षेत त्यांना नोकरीत कायम केले जाणार आहे; अन्यथा या उमेदवारांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा गाडगे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सोमनाथ बोतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हा सचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, रुपाली बोरुडे, सोनाली अकोलकर, रुपाली कुरूमकर, आदींनी दिला.
Table of Contents