Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शिक्षकांचे मानधन इतक्या हजारांनी वाढले…! Shikshak Sevak Bharti 2023

Shikshak Sevak Bharti 2023, Shikshak Sevak Salary Increased

Shikshak Sevak Bharti 2023 New Salary Details

Shikshak Sevak Bharti 2023 – The government led by Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis presented the first resolution after coming to power in the state today. Deputy Chief Minister and Finance Minister Devendra Fadnavis presented the budget. At this time, the government has made many big announcements for the education sector. Check Shikshak Sevak Bharti 2023 New Salary Details at below

These include announcements ranging from hefty pay hikes for teaching staff to uniforms for students up to class VIII. Along with this, Finance Minister Devendra Fadnavis has announced that construction of medical colleges will be started at 14 places in the state.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसकल्प सादर केला. यावेळी सरकारे शैक्षणिक क्षेत्रासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात शिक्षक सेवकांना भरगोस पगारवाढीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्याच्या घोषणांचा समावेश आहे. अर्थमंत्र्यांनी शिक्षक सेवकांसाठी सरासरी १० हजार रुपयांची भरघोस मानधन वाढ करण्याची घोषणा केली आहे.  सर्व अपडेट्स आम्ही या टेलिग्राम वर प्रकाशित करत राहू, तेव्हा लगेच जॉईन करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शालेय शिक्षण विभागासाठी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात एकूण रूपये ७३,०२५ कोटी ५४ लाख ५८ हजार रुपये (त्र्याहत्तर हजार पंचवीस कोटी चौपन्न लाख अठ्ठावन्न हजार) इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आली आहे. यापैकी कार्यक्रमावरील खर्चासाठी दोन हजार ७०७ कोटी रूपये तर अनिवार्य खर्चासाठी ७० हजार ३१८ कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचा अर्थसंकल्प उपयुक्त ठरणार असल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. विभागासाठी भरीव तरतूद केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यात आली असून यासाठी 40 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना 7500 रूपये इतकी भरघोस वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यासाठी 75 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात देखील भरघोस वाढ करण्यात आली आहे. यात प्राथमिकचे 16 हजार, माध्यमिकचे 18 हजार तर उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षण सेवकांचे मानधन 20 हजार इतके करण्यात आले आहे.

माय मराठीच्या सेवेसाठी देखील या वर्षाच्या अर्थसंकल्पात 65 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबईत मराठी भाषा भवन, वाई येथे विश्वकोष कार्यालय, ऐरोली येथे मराठी भाषा उपकेंद्र आदी योजना राबविण्यात येणार असल्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

शिक्षकसेवकांचे मानधन वाढवले

पगारवाढीच्या प्रतिक्षेत असेलेल्या राज्यातील शिक्षक सेवकांना राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी शिक्षक सेवकांसाठी सरासरी १० हजार रुपयांची भरघोस मानधन वाढ करण्याची घोषणा केली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षक सेवकांचे मानधन ६००० रुपयांवरून १६००० रुपये होणार आहे. माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन ८००० रुपयांवरून १८००० रुपये करण्यात येणार आहे, तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन ९००० रुपयांवरून वाढवून २०००० रुपये करण्यात येणार आहे.


Shikshak Sevak Bharti 2023 – The state government has taken a big decision for the teachers in the state. All the posts of center heads will be filled in the state. School Education Minister Deepak Kesarkar has also announced that he will pay Rs 16,000 to teachers and servants. Chief Minister Eknath Shinde inaugurated the 17th session of primary teachers in Ratnagiri. On this occasion, Chief Minister Shinde was present as the chief inaugurator.

Shikshak Sevak Bharti 2023 – राज्यातील शिक्षकांसाठी (Teachers) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात केंद्रप्रमुखांच्या सगळ्या जागा भरल्या जातील. तसेच शिक्षक सेवकांना 16 हजार रुपये वेतन देणार आहोत, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत सुरु असलेल्या प्राथमिक शिक्षक 17 व्या अधिवेशनाचा शुभारंभ (Maharashtra Primary Teachers Association 17th Session) केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते. त्याच्या हस्ते अधिवेशानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दीपक केसरकर बोलत होते. त्यावेळी ही मोठी घोषणा केली. त्याचवेळी ते म्हणाले, यापुढे शिक्षकांच्या गाडीवर TR लिहिण्याबाबत परवानगी देण्याचा विचार सुरु आहे.

केसरकर यांनी पुढे सांगितले की, यापुढे खुल्या गटाच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. तशी घोषणा शिक्षक अधिवेशनात केली. शिक्षकांवरील भार कमी करण्यात येणार आहे. शिक्षकांची अशैक्षणिक कामे वगळण्याचा जीआर काढला आहे. आता डॉक्टरांच्या गाडीवर DR असते त्याप्रमाणे शिक्षकांच्या गाड्यांवर TR असे लिहिण्याची परवानगी लवकरच देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी संकेत दिलेत.

राज्य सरकार शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी प्रयत्नशील असेल. मुलांसाठी असलेल्या टॉयलेट्सची सफाई यापुढे ग्रामपंचायत करणार आहे. टॉयलेट्स आणि कंपाउंडसाठी 590 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षक समितीचे स्थान आमच्या हृदयात आहे, असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत, आई वडिलानंतर गुरुजींचे स्थान आदराचे आहे. कुंभार जसा मातीला आकार देतो त्याच पद्धतीचे शिक्षक काम करत आहेत. डॉक्टर जीवदान देतो तर शिक्षक खऱ्या अर्थाने जीवनाला आकार देतात. शिक्षकांना वेळेवर शाळेत पोहोचण्यासाठी त्यांच्या गाडीवर TR लावण्याबाबत विचार सुरु आहे. मी साधा कार्यकर्ता आहे. बोलायचं म्हणून बोलत नाही. मी जे बोलतो ते करुन दाखवतो. राज्यातील सर्व मुलामुलींना समान आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणार आहोत. कितीही टेक्नॉलॉजी आली तरीही शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. 30 हजार शिक्षकांची रिक्त पदे आपण भरत आहे. केंद्र प्रमुख पदे देखील भरणार आहोत. दुर्गम भागातील असल्यामुळे प्रत्येक घटकांची जाण आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

धाडसी निर्णय घेणार सरकार आज राज्यात बसले आहे. जुनी पेन्शनचा विषय गांभीर्याने काम करत आहोत. कुठल्याही विषयाला बगल देण्याचे काम आम्ही करत नाही. अडीज वर्षातील थांबवलेले निर्णय आम्ही धाडसाने सुरु केले. मी काल कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता आहे. उद्याही कार्यकरताच असेन, असे ते म्हणाले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड