पवित्र पोर्टलद्वारे कोणत्या संस्थांमध्ये होणार शिक्षण सेवकांची भरती? येथे करा अर्ज | Shikshak Sevak Bharti 2026

Shikshak Sevak Bharti 2026 Update

Shikshak Sevak Bharti 2026: राज्यातील डी.एड. आणि बी.एड. पात्र उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या ‘पवित्र’ पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेला ६ ऑगस्ट २०२६ पासून अधिकृत सुरुवात झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यालये तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील एकूण ३० हजार २०९ शिक्षक व शिक्षणसेवक पदे या भरतीतून भरली जाणार आहेत.

या मेगाभरतीसाठी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेले १ लाख ७० हजार १०८ उमेदवार सहभागी होत आहेत. त्यामुळे उपलब्ध पदांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक जागेसाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम नोंदवण्याची संधी

पवित्र पोर्टलवर पात्र उमेदवारांसाठी पदनिहाय पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया ६ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. उमेदवारांना आपल्या पात्रतेनुसार उपलब्ध पदे आणि संबंधित संस्थांची निवड करून पसंतीक्रम नोंदवता येणार आहे. ११ ऑगस्ट २०२६ ही पसंतीक्रम नोंदविण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी पोर्टलवर लॉगिन करून आपला पसंतीक्रम काळजीपूर्वक नोंदविणे आवश्यक आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

मुलाखतीशिवाय होणार थेट गुणवत्ता यादी

पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या पदांसाठी थेट गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी पसंतीक्रम भरताना उपलब्ध पदे, विषय, संस्था आणि आपली पात्रता यांचा योग्य विचार करणे महत्त्वाचे ठरणार आहे. गुणवत्ता यादी तयार करताना संबंधित पदासाठीची पात्रता आणि उमेदवारांचे चाचणीतील गुण विचारात घेतले जाणार आहेत.

जिल्हा परिषदांच्या सर्वाधिक जागा

या भरतीमध्ये विविध व्यवस्थापनांच्या शाळांमधील रिक्त पदांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सर्वाधिक १३ हजार ३५१ पदे उपलब्ध आहेत. यानंतर महापालिका, नगरपालिका, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यालये आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदांचा समावेश आहे.

टीएआयटी-२०२५च्या गुणांवर आधारित भरती

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या या शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-२०२५ मधील प्राप्त गुणांचा आधार घेण्यात येत आहे. या गुणांच्या आधारे राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. संबंधित व्यवस्थापनातील उपलब्ध रिक्त पदे आणि त्या पदांसाठीचे शिल्लक आरक्षण विचारात घेऊन भरती प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.

कोणत्या संस्थांमध्ये होणार भरती?

या मेगाभरतीमध्ये राज्यातील विविध प्रकारच्या शाळांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदांच्या शाळा
महानगरपालिकांच्या शाळा
नगरपालिका शाळा
आदिवासी विकास विभागाच्या शाळा
शासकीय विद्यालये
खासगी व्यवस्थापनाच्या शाळा
१.७० लाख उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा

या भरतीसाठी १,७०,१०८ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण केली आहे. उपलब्ध ३०,२०९ पदांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या मोठी असल्याने निवड प्रक्रियेत मोठी स्पर्धा राहणार आहे.

 

संस्था / विभागाचे नावRecruitment PDF

The Arya Shikshan Sanstha Washim Bharti 2026

📄 PDF Download

Vikas Vidya Mandal, Virvel Bharti 2026

📄 PDF Download

Shri Shivseva Mandal Shirur Bharti 2026

📄 PDF Download

Shri Wakeshwar Shikshan Prasarak Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Lokshikshan Mandal Kolhapur Bharti 2026

📄 PDF Download

Anusaya Shikshan Prasarak Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Adarsh Shikshan Sanstha Bharti 2026

📄 PDF Download

Aarthikdrustya Mahaswargiya Samaj Shikshan Santha Bharti 2026

📄 PDF Download

Bhartiya Shikashan Santha Chandrapur Bharti 2026

📄 PDF Download

Gramin Shikshan Sanstha Palghar Bharti 2026

📄 PDF Download

Shri Mhasoba Shikshan Prasarak Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Shri Hanuman Shikshan Prasarak Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Shri Gurudev Goroba Smarak Samiti Bharti 2026

📄 PDF Download

Mayani Bhag Shikshan Prasarak Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Rajdharma Shikshan Prasarak Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Shramjeevi Shikshan Prasarak Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Kisan Vidyaprasarak Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Gramonnati Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Gramin Vikas Pratishthan Bharti 2026

📄 PDF Download

Nagar Parishad Pavani Bharti 2026

📄 PDF Download

Mahatma Gandhi Gramvikas Seva Kendra Bharti 2026

📄 PDF Download

Sangli Shikshak Sevak Bharti 2026

📄 PDF Download

Saraswati Gramin Shikshan Sanstha Bharti 2026

📄 PDF Download

Adivasi Jangal Kamgar Shikshan Sanstha Bharti 2026

📄 PDF Download

Manorama Bahuuddeshiya Vikas Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Shubhadip Bahuddeshiya Shikshan Prasarak Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Yogesh Manav Vikas Pratishthan Bharti 2026

📄 PDF Download

Indira Gramen Vikas Shikshan Sanstha Bharti 2026

📄 PDF Download

Rashtriya Adarsh Vidyalaya Shikshan Mandal Ramtek Bharti 2026

📄 PDF Download

Shri. Ambamata Shikshan & Sanskrutik Prasarak Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Lok Shikshan Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Ramavilas Shikshan Sanstha Wardha Bharti 2026

📄 PDF Download

Yogesh Manav Vikas Pratishthan Bharti 2026

📄 PDF Download

Ramavilas Shikshan Sanstha Bharti 2026

📄 PDF Download

Mahatma Phule Samata Shikshan Sanstha Bharti 2026

📄 PDF Download

Amar Education Society Bharti 2026

📄 PDF Download

Shri Saibaba Shetkari Shikshan Sanstha Bharti 2026

📄 PDF Download

Maharashtra Aarogya Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Prerna Shikshan Sanstha Bharti 2026

📄 PDF Download

Mahatma Phule Vidyaniketan Sanstha Bharti 2026

📄 PDF Download

Dnyan Prabodhini Navnagar Vidyalaya Bharti 2026

📄 PDF Download

Shri Sant Tukaram Shikshan Prasarak Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Shrirangdas Swami Shikshan Vikas Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Krushna Sahyogi Tantra Shikshan Sanstha Bharti 2026

📄 PDF Download

Jai Shivray Pratishthan Bharti 2026

📄 PDF Download

Pragati Shikshan Sanstha Bharti 2026

📄 PDF Download

Satyaniketan Rajur Bharti 2026

📄 PDF Download

Janata Shikshan Prasarak Mandal Bharti 2026

📄 PDF Download

Shriram Vivek Vardhini Mandal Bharti 2026

📄 PDF Download

दीर्घकाळापासून शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या डी.एड. आणि बी.एड. धारक उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची संधी मानली जात आहे. आता उमेदवारांचे लक्ष पसंतीक्रमाची अंतिम तारीख, गुणवत्ता यादी आणि त्यानंतरच्या नियुक्ती प्रक्रियेकडे लागले आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाचे

भरतीची सुरुवात: ६ ऑगस्ट २०२६
एकूण पदे: ३०,२०९
स्व-प्रमाणपत्र पूर्ण उमेदवार: १,७०,१०८
पसंतीक्रमाची अंतिम तारीख: ११ ऑगस्ट २०२६
आधार: TAIT-२०२५ गुण
शिक्षण स्तर: इयत्ता १ ली ते १२ वी
भरतीचे माध्यम: पवित्र पोर्टल

त्यामुळे पात्र उमेदवारांनी ११ ऑगस्टपूर्वी पवित्र पोर्टलवर आपला पसंतीक्रम काळजीपूर्वक नोंदवून प्रक्रिया पूर्ण करावी.


“राज्यातील शिक्षण सेवकांचा तीन वर्षांचा कालावधी रद्द करावा. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यास अभ्यास समिती गठित करावी. या समितीचा अहवाल येईपर्यंत शिक्षण सेवकांचे मानधन वाढवून किमान कालावधी कमी करावा,” अशी मागणी शिक्षण सेवक समन्वय समितीतर्फे करण्यात आली. राज्यातील शिक्षण सेवकांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक शिक्षण सेवक पद रद्द करावे, या मागणीसाठी शिक्षण सेवकांची लवकरच राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेणार असल्याची माहिती समन्वय समितीचे जावेद तांबोळी, प्रणव शेटे, रोहित दाभोळे, राधिका जगदाळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. जावेद तांबोळी म्हणाले, “सरकारने सर्वांत मोठी शिक्षक भरती करून २१ हजारांहून अधिक शिक्षकांची पदे भरून शाळेला आणि विद्यार्थ्यांना शिक्षक दिले आहेत. अनेक वर्षे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अभियोग्यता धारकांना नोकरी मिळाल्याचा आनंद आहे. मात्र शिक्षण सेवकांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. काही शिक्षण सेवकांना अन्य जिल्ह्यात जाऊन अल्पशा मानधनावर काम करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेव्हा, ‘समान काम समान वेतन’ तत्त्वानुसार हे पद रद्द करावे.” या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

“डी. एड., बी. एड.सह शिक्षक पात्रतेच्या विविध परीक्षा उतीर्ण होऊन, स्वतःची गुणवत्ता सिद्ध करूनही पुन्हा तीन वर्षे प्रोवेशन कालावधी लावणे अशोभनीय आहे,” असे प्रणव शेटे म्हणाले. “सन २०१९ आणि २०२४ मध्ये झालेल्या शिक्षक भरतीत शिक्षकांचे वय सरासरी ३५ वर्षे आहे. त्यामुळे त्यांना कमाल २३ वर्षे अल्पसेवा काळ मिळतो. त्यातही तीन वर्षे शिक्ष णसेवक म्हणून काम करणे हे अन्यायकारक आहे,” असे संतोष मगर म्हणाले. शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिक्षण सेवक हे पद रद्द का व्हावे, याबद्दल लक्षवेधी मांडली. अन्य राज्यांत शिक्षकांना थेट नियुक्त्या दिल्या जातात. केवळ महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच राज्यांत शिक्षण सेवक कालावधी आहे. यावेळी जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने उपस्थित होते. त्यांनी शिक्षण सेवकांच्या मागण्या योग्य असून त्यांना समान वेतन, समान काम, समान पेन्शन द्यावी, शिक्षण सेवक पद रद्द होईपर्यंत ४० हजार रुपये मानधन द्यावे. त्यांच्या पाठीशी शिक्षक संघटना ताकदीने उभ्या राहतील, अशी ग्वाही दिली. यावेळी शिक्षण सेवक उपस्थित होते.


 

Shikshak Sevak Bharti 2025: मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत तीन महिन्यांपासून नियुक्त केलेले शिक्षण सेवक मानधनापासून वंचित असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने लाडक्या बहिणींप्रमाणे लाडक्या शिक्षणसेवकांकडेही लक्ष घेऊन तत्काळ मानधन मिळवून देण्याची मागणी शिक्षकांनी तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देत केली. महायुती सरकारने निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली होती. या योजनेत राज्य सरकारच्या सर्व विभागांमध्ये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यभरात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारक विद्यार्थ्यांना ८ हजार तर पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने देण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांवरील रिक्त जागेवर शाळा व्यवस्थापन समितीच्या शिफारशीनुसार येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत २३६ शिक्षण सेवकांना सप्टेंबर २०२४ महिन्यात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या कालावधीत शैक्षणिक पात्रतेनुसार मानधन शासनाकडून अदा केले जाणार होते. मात्र, दोन ते तीन महिने उलटूनदेखील एक रुपयाही मानधन मिळाले नाही. तसेच सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी हादेखील कमी असून तो वाढवून मिळावा व मानधन लवकरात लवकर मिळावे या मागणीसाठी शिक्षण सेवकांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना निवेदन दिले. दोन महिन्यांपासून अध्यापन करूनही मिळणारे मानधन अद्याप न मिळाल्याने प्रशिक्षणार्थी नैराश्येच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे मानधनाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मानधनाची प्रक्रिया शासनस्तरावरून
• ‘शाळा व्यवस्थापन समितीच्या शिफारशीनुसार शिक्षण विभागाने या नियुक्त्या दिल्या आहेत. त्यांच्या मानधनाची प्रक्रिया शासनस्तरावरून परस्पर होणार आहे. त्यासाठीची सर्व माहिती आम्ही पाठवलेली आहे. संजय कुसाळकर, गटशिक्षणाधिकारी


Shikshak Sevak Bharti 2024

शिक्षक भरती बद्दल एक महत्वाचा नवीन अपडेट समोर आला आहे. राज्यात राबविल्या जात असलेल्या शिक्षकभरतीतून नियुक्त झालेल्या शिक्षणसेवकांना आता आणखी एक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास तीन वर्षे शिक्षणसेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना शिक्षक भारती ने निवेदन देऊन हे परिपत्रक रद्द करा, अशी मागणी केली असल्याची माहिती ‘शिक्षक भारती’चे नेते तथा राज्य सुनील गाडगे यांनी दिली. तीन वर्षांनी आपसूकच कायमस्वरूपी होणारी नोकरी टिकविणे आता कठीण जाणार असून, शिक्षणसेवकांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. हि शिक्षकसेवकांसाठी एक त्रासाची गोष्ट झाली आहे.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Shikshak Sevak Bharti 2024

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात नुकतीच जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, शिक्षकभरती पार पडली. यात १४ हजार उमेदवारांना शिक्षणसेवक वर्षांची नेमणूक देण्यात पाच हजार म्हणून तीन आली आहे, तर उमेदवार आजही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या आधी तीन वर्षे शिक्षणसेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना शिक्षक म्हणून कायम केले जायचे. परंतु आता मात्र तीन वर्षांनंतर त्यांना नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती दिली आणार नाही. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे त्यांची परीक्षा घेतली उत्तीर्ण झाले तरच जाईल. परीक्षेत त्यांना नोकरीत कायम केले जाणार आहे; अन्यथा या उमेदवारांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा गाडगे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सोमनाथ बोतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हा सचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, रुपाली बोरुडे, सोनाली अकोलकर, रुपाली कुरूमकर, आदींनी दिला.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड