मोठी बातमी! २० जानेवारीपासून शिक्षक भरतीला सुरवात; जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका शाळांना शाळांना निर्देश

shikshak bharti 2025 maharashtra

शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आनंदाची बातमी, राज्यातील खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांसह नगरपालिका, महापालिका शाळांमधील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा २० जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यावेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यास प्रारंभ होणार आहे. राज्यातील खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांसह नगरपालिका, महापालिका शाळांमधील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा २० जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यावेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यास प्रारंभ होणार आहे. हि शिक्षक भरतीच प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया तातडीने सुरु करण्यासाठी पवित्र पोर्टल विकसीत करण्याचे काम तलिस्मा कार्पोरेट प्रा. लि. या कंपनीला दिले आहे. जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले असून २० जानेवारीपासून पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु होईल. म्हणजे लवकरच आपण या भरतीस अर्ज करू शकणार आहात. 

shikshak bharti 2025 maharashtra

तसेच आपल्याला माहीतच असेल, राज्य शासनाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य अभ्यासक्रम आराखडा यापूर्वीच मंजूर केला आहे. आता पहिल्यांदा आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असून या वर्गांची पाठ्यपुस्तक निर्मिती पूर्ण झाली आहे. जानेवारीअखेर त्या पुस्तकांची छपाई सुरु होईल. मराठी शाळांमध्ये आता ‘सीबीएसई’प्रमाणेच अभ्यासक्रम असणार असून त्यादृष्टीने नियोजन पूर्ण झाले आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पटसंख्या वाढावा, यासाठी पालकांचा कल लक्षात घेऊन सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु केले जाणार आहेत. दरम्यान, शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी पटसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक आवश्यक आहेत.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अजून एक म्हत्वचे म्हणजे, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच राबविला जाईल, असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार आता शालेय शिक्षण विभागाची कार्यवाही सुरु झाली आहे. जानेवारीअखेर जिल्हा परिषदांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु होईल. त्यानंतर फेब्रुवारी व मार्चमध्ये पात्र उमेदवारांकडून सेल्फ सर्टिफिकेट भरून घेतले जाईल आणि शेवटच्या टप्प्यात त्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यात गुणवत्तेनुसार संबंधित उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतरही शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागांची भरती करण्यासाठी दुसरा टप्पा राबविण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासाठी शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने विचारणा होत आहे. त्यामुळे पदभरतीची तातडी असल्याने व पहिल्या टप्प्यात तलिस्मा कार्पोरेट प्रा. लि. कंपनीने चांगले काम केल्याचे विचारात घेऊन याच कंपनीस एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल, त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या कंपनीला शासनाकडून ६८ लाख ८४ हजार १२० रुपये दिले जाणार आहेत.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड