भूमि अभिलेख विभागाकडून शेतसारा अथवा बिनशेती कर (एनए टॅक्स GRAS-Government Receipt Accounting System) भरण्याची सुविधा दि. १ ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे शेतसारा भरण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात जावे लागणार नाही. शेतीकर, बिनशेती कर, शिक्षण उपकर, रोजगार हमी उपकर, ग्रामपंचायत उपकर, जिल्हा परिषद उपकर आदी करदेखील नागरिकांना या सुविधेमुळे घरबसल्या भरता येणार आहे. त्यासाठी भूमि अभिलेख विभागाने ‘एनआयसी’च्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. शेतसारा व बिनशेतीच्या जमिनींचे संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यापुढे रेडी रेकनर भरण्याचे काम सुरू आहे.
ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर राज्यात ही सुविधा मिळणार आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली. इंग्रजांच्या काळापासून जमिनींवर शेतसारा कराची आकारणी केली जाते. पूर्वी शेतसारा हा महसूल देणारा महत्त्वाचा कर होता. जस जशी प्रगती होत गेली. तसे नव-नव्या करांची आकारणी सुरू झाली. मात्र, जमिनींवर आकारल्या जाणाऱ्या या कराची वसुली आजही सुरू आहे.
घरबसल्या ऑनलाइन सात-बारा उतारा मिळत असल्याने तलाठी कार्यालयात जावे लागत नाही. त्यामुळे हा कर वसूल होत नाही. त्यातून थकबाकीही वाढत जाते. न भरल्यास जमिनींच्या सात-बारा उताऱ्यावर बोजा चढविला जातो. त्यामुळे शेतसारा भरणे आवश्यक असते.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















