SGBAU Exam Time table
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०२५ लेखी परीक्षेची वेळापत्रके जाहीर करण्यात आली आहेत; मात्र महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे १४ ते १६ जानेवारी २०२६ दरम्यान सुरू होणाऱ्या लेखी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यभरात महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानुसार येत्या १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे १४ ते १६ जानेवारीदरम्यानच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, सदर परीक्षांमध्ये जवळपास सर्वच शाखांमधील अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यानुसार १४ जानेवारी २०२६ रोजीच्या परीक्षा २७ जानेवारीपासून, १५ जानेवारी रोजीच्या परीक्षा २८ जानेवारी व १६ जानेवारी रोजीच्या परीक्षा २९ जानेवारी २०२६ पासून होणार आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून याबाबत माहिती देण्यात आली. यासंदर्भात सर्व प्राचार्य, केंद्राधिकारी, संबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्र यांना पत्राद्वारे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून, संबंधितांनी याची सर्व विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे अपेक्षित आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















