खुशखबर, अखेर १० हजार पेक्षा जास्त सुरक्षा रक्षकांची भरती जाहिरात प्रसिद्ध, अर्ज सुरु। Security Guard Bharti
Security Guard Bharti 2024
Security Guard Bharti Registration 2024
Security Guard Bharti 2024: Good news!! Finally, the recruitment of security guards has started, even though they are on contract. The Maharashtra State Security Corporation is starting the registration process for 10,000 security guards from December 9, 2024. The last date for registration is December 20, 2024. The list of candidates has been published on the corporation’s website according to the date. As per the date in the list, candidates must be present at Ganesh Hall, Armed Police Headquarters, Marol, Mumbai at 10 am for verification of criteria. Candidates will not be allowed to enter after 3 pm. Candidates should be present at their own expense for verification of criteria, as no facilities will be provided by the corporation. Also, candidates should not bring their relatives with them, as only candidates will be allowed entry. If it is not possible to come on the given date, candidates can appear on the next working day on the list, but the last date is December 20, 2024. If absent on that day, they will not be considered for further process.
Security Guard Bharti 2024: खुशखबर !! अखेर सुरक्षा रक्षकांची कंत्राटी का होईना पण भरतीला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळच्या वतीने तब्बल १०,००० सुरक्षा रक्षकांची नोंदणी पप्रक्रिया ९ डिसेंबर २०२४ पासून सुरु करण्यात येत आहे. नोंदणीची अखेरची तारीख २० डिसेंबर २०२४ आहे..महामंडळाच्या संकेतस्थळावर उमेदवारांची दिनांकानुसार यादी प्रसिद्ध केली आहे. यादीतील दिनांकानुसार उमेदवारांनी सकाळी 10 वाजता गणेश हॉल, सशस्त्र पोलीस मुख्यालय, मरोळ, मुंबई येथे निकष पडताळणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. निकष पडताळणीसाठी उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहावे, कारण महामंडळाकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार नाहीत. तसेच, उमेदवारांनी आपल्या नातेवाईकांना सोबत आणू नये, कारण फक्त उमेदवारांनाच प्रवेश दिला जाईल. दिलेल्या तारखेला येणे शक्य नसल्यास, उमेदवारांना यादीतील दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी हजर राहता येईल, मात्र अंतिम तारीख 20 डिसेंबर 2024 आहे. त्या दिवशी अनुपस्थित राहिल्यास पुढील प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
निकष पडताळणीसाठी आवश्यक सूचना आणि अटी – Instructions and Conditions Required for Suraksha Rakshak criteria verification
- उमेदवारांनी निवासाची व्यवस्था स्वतः करावी. निकष पडताळणीसाठी दिलेल्या दिनांक व वेळेस हजर रहावे. त्यापुर्वी कोणीही भरतीसाठी दिलेल्या केंद्राच्या ठिकाणी येऊ नये. सदर ठिकाणी वेळेच्या आधी आल्यास तेथे प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ज्या उमेदवारांना मोबाईलवर संदेश प्राप्त झालेला आहे. किंवा वेबसाईटवर प्रसिध्द यादीत ज्यांचे नावे आहे, त्यांनीच सदर ठिकाणी हजर राहवे व इतरांना प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी १०/१२ वी पास गुणपत्रिका व प्रमाणपत्र, जन्म दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडण्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड अधिवास प्रमाणपत्र / वाहन चालवण्याचा परवाना (असल्यास) / मुळ प्रती सोबत आणावेत. तसेच सोबत पोलीस भरती मध्ये मैदानी व लेखी परिक्षेस हजर राहील्याबाबतची (प्रवेश पत्र) कागदपत्राच्या मुळ व छायांकित प्रती सोबत आणाव्यात.
- जे उमेदवार यापुर्वी महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत आहेत / किंवा कार्यरत होते. व त्यांची सेवा कसुरीमुळे समाप्त करण्यात आली आहे. किंवा करार खंडीत करण्यात आला आहे. किंवा या पुर्वी प्रशिक्षणास पाठवण्यात आले होते. परंतु राजीनामा, गैरहजर किंवा भगोडा या कारणामुळे प्रशिक्षण सोडून गेलेले किंवा प्रशिक्षण पुर्ण केलेले असून महामंडळाच्या नेमणूक प्रतिक्षाधीन यादीवर आहेत.
- असे उमेदवार सन- २०२१ च्या पोलीस भरतीस हजर राहलेले आहेत. त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश मिळाला किंवा वेबसाईटवर प्रसिध्द यादीत त्यांचे नावे असले तरी, त्यांनी भरती नोंदणीसाठी हजर राहू नये. हजर राहील्यास त्यांना अपात्र ठरवण्यात येईल. तसेच दिशा भुल करुन महामंडळात पुन्हा नेमणूक मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल
List Of Documents Required For Maharashtra Suraksha Rakshak Bharti
- उमेदवारांनी १०/१२ वी पास गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- जन्म दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडण्याचा दाखला
- आधार कार्ड
- पॅन कार्ड अधिवास प्रमाणपत्र
- वाहन चालवण्याचा परवाना (असल्यास) / मुळ प्रती सोबत आणावेत.
- तसेच सोबत पोलीस भरती मध्ये मैदानी व लेखी परिक्षेस हजर राहील्याबाबतची (प्रवेश पत्र) कागदपत्राच्या मुळ व छायांकित प्रती सोबत आणाव्यात.
MSSC Suraksha Rakshak Bharti
How To Register For Maharashtra Suraksha Rakshak Bharti 2024
- उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देण्यात आलेला https://mssc.co.in/application/index.php ही लिंक ओपन करुन तेथे दिलेला फॉर्म ऑनलाईन व्यवस्थीत भरणे आवश्यक आहे.
- तसेच सदर लिंक ओपन केल्यानंतर (Privacy Policy) यावर क्लिक करुन तेथील दिलेल्या सुचना प्रमाणे फॉर्म काळजीपुर्वक भरण्यात यावा.
- तसेच फॉर्म मध्ये दिलेल्या जागी स्वतः चे अलीकडील काळातील रंगीत छायाचीत्र व सही अपलोड करावी, तसेच मुद्दा क्र. ७ मध्ये नमुद सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या जागी अपलोड करावी.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतरच फॉर्म सबमीट करण्यात यावा. तसेच नोंदणीच्या दिवशी येतांना फॉर्मची प्रिंट काढून सोबत आणावी. तसेच सर्व संबंधीत मुळ कागदपत्रे सोबत आणावी.
- उमेदवार नोंदणीसाठी हजर राहतांना दिलेल्या लिंकवर फॉर्म भरलेला नसल्यास व येतांना त्याची प्रिंट व मुळ कागदपत्रे सोबत न आणल्यास त्यास अपात्र समजण्यात येईल, व त्याची नोंदणी होणार नाही, याची नोंद घ्यावी.
- ज्या उमेदवारांनी यापुर्वी ऑनलाईन पध्दतीने भरती नोंदणीचा फॉर्म भरला असेल, परंतु त्यांना प्रतिक्षाधीन (Waiting) ठेवण्यात आलेले आहे. अशा उमेदवारांनी नोंदणीच्या ठिकाणी येऊन आपले अपुर्ण असलेल्या कागदपत्राची पुर्तता केल्यास त्यांची नोंदणी केली जाईल, याची नोंद घ्यावी.
- भरती प्रकिये मध्ये पात्र झाल्यानंतर उमेदवाराला प्रशिक्षणासाठी हजर राहण्यासाठी त्यांचे नोंदणीच्या वेळी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश देण्यात येतील. महामंडळाने दिलेल्या दिनांक व वेळेस संबंधित प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी हजर राहताना खालील बाबीची पुर्तता करावी लागेल.
Suraksha Rakshak Training Period
अ) उमेदवाराचा नियुक्ती पुर्व मुलभुत प्रशिक्षणाचा कालावधी ४५ दिवसाचा असेल व महामंडळाने ठरविलेल्या महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या प्रशिक्षण केंद्रात त्यास प्रशिक्षणास पाठविण्यात येईल त्या ठिकाणी त्यास वेळेस हजर राहावे लागेल.
उमेदवारास प्रशिक्षणासाठी हजर होण्याचा संदेश आल्यास प्रशिक्षण केंद्रावर हजर होताना प्रशिक्षणास सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. भरती नोंदणी झाल्यानंतर सदरच्या कागदपत्राची पुर्तता करण्यात यावी. जरी उमेदवार भरती नोंदणीसाठी पात्र ठरला तरी एखाद्या उमेदवारा विरुध्द गुन्हा नोंद असल्याबाबत किंवा इतर आक्षेपार्ह चारित्र्य पडताळणी अहवाल असल्यास सदर उमदेवारास प्रशिक्षण संधी देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.
Security Guard (Contractual) Criteria Verification – 2024 Date-wise List of Candidates.
Suraksha Rakshak Training Fee Details
प्रशिक्षण शुल्क तपशील | रक्कम (₹) | परताव्याबाबत माहिती |
---|---|---|
सुरक्षा अनामत रक्कम (एकूण) | ₹15,000 | — |
Non-Refundable रक्कम | ₹10,000 | परत दिली जाणार नाही. |
Refundable रक्कम | ₹5,000 | नियुक्ती तात्काळ स्वीकारल्यानंतर व करार कालावधी पूर्ण झाल्यानंतर परत केली जाईल. |
Security Guard Bharti 2024 PDF
Security Guard Recruitment 2024
चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने विविध उद्योगांमध्ये कामगार व सुरक्षारक्षकांची नेहमी मागणी असते. मात्र, या जागा भरताना गार्ड बोर्डातील नियमावलींचा रोजगार देण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. यामुळे शासनस्तरावरील अडचणी सोडवत रोजगार प्रक्रियेची गती वाढवून ही प्रक्रिया सुलभ पद्धतीने राबवावी, अशी सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांना केली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यावेळी कामगार संघटनांचे नेते, कामगार प्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आ. किशोर जोरगेवार म्हणाले, गार्ड बोर्डमध्ये नोंदणीकृत कामगारांना रोजगार मिळवून देणे, ही गार्ड बोर्डची जबाबदारी आहे. कामगारांच्या अडचणींना समजून घेत त्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. सातत्यपूर्ण मागणी नंतर सीएटीपीएस येथील सुरक्षारक्षकांच्या भरती प्रक्रियेबाबत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी गतीने व्हावी, यासाठी आमदार जोरगेवार यांनी ही बैठक बोलावली होती. गार्ड बोर्डाच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली. ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे सुचविले. सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीसाठी आवश्यक नोंदणी प्रक्रियेसाठी दोन ते तीन दिवसांत संबंधित कंत्राटदारांशी संपर्क साधून नोंदणी लिंक सुरू करावे. लिंक सुरू झाल्यानंतर नोंदणी करून शारीरिक चाचणी पूर्ण करावी, अशीही सूचना आमदार जोरगेवार यांनी केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगांमध्ये सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे. मात्र, नियुक्त करण्याची प्रक्रिया जाचक असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरक्षारक्षासाठी पात्र उमेदवारांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न मिटवि- ण्यासाठी नियुक्तीची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी बेरोजगार उमेदवारांनी केली होती.
Suraksha Rakshak Bharti 2024
राज्यातील २९ जिल्हयामधील प्राथमिक आरोग्य केंद्रांकरीता कंत्राटी पध्दतीने बाहययंत्रणेव्दारे (आउट सोर्सिंग) सुरक्षा रक्षक सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली असून अनुक्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद रायगड, नाशिक, कोल्हापूर, जळगांव व नंदूरबार या ५ जिल्हयांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पध्दतीने बाहययंत्रणेद्वारे सुरक्षा रक्षक नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वरील शासन निर्णय हे प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पध्दतीने बाहययंत्रणेद्यारे सुरक्षा रक्षक नेमण्यास मान्यता देण्याबाबतचे आहेत. कंत्राटी पध्दतीने बाहययंत्रणेद्यारे सुरक्षा रक्षक नेमण्याच्या प्रक्रियेमध्ये एकसूत्रता राहावी यासाठी सर्व राज्यामध्ये एकाच स्तरावर निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. या साठी आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
राज्यभरातील ३४ जिल्हयांमध्ये १९०६ कार्यरत प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रति प्राथमिक आरोग्य केंद्र जास्तीत जास्त ३ सुरक्षा रक्षकांच्या सेवा बाहययंत्रणेव्दारे ३ वर्षाकरीता घेण्याकरीता सुरक्षारक्षकांचे प्रति महा ठोक वेतन रुपये १६०००/- प्रमाणे वार्षीक रुपये १०९.७८ कोटी अंदाजीत खर्चास दिनांक२५.०१.२०२४ च्या शासन निर्णय व दिनांक १२.०२.२०२४ शासन शुध्दीपत्रकमधील अटी व शर्तीच्या अधीन राहुन सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०७१११२१४४१५७१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
Download Suraksha Rakshak GR
Security Guard Bharti 2024
Security Guard Bharti 2024: The Department of Medical Education and Medicines has decided to recruit security guards on contract basis in 17 medical colleges and affiliated hospitals of the state from the perspective of security of resident doctors, teachers, nurses, officers, employees, patients and their relatives as well as hospital equipment etc. To get all the further updates regarding this recruitment on time, click here and download the official mobile app of Mahabharti in your mobile immediately.
Security Guard Bharti 2024: निवासी डॉक्टर, अध्यापक, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्याचबरोबर रुग्णालयातील यंत्रसामुग्री आदींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्यातील १७ वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
१७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणार ८३१ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील ‘परिशिष्ट अ’मध्ये नमूद १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयात प्रवेशित विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच संस्थेमधील प्राध्यापक / सह प्राध्यापक, कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार दोन सुरक्षा अधिकारी, एक सहाय्यक सुरक्षा रक्षक अधिकारी, दोन सुरक्षा निरीक्षक, १३ सुरक्षा पर्यवेक्षक आणि ८१३ सुरक्षा रक्षक अशी एकूण ८३१ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्व सुरक्षा रक्षक महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित – पुणे, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ – मुंबई, रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळ, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळ यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक भरण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून सर्व भत्त्यांसह ३० कोटी ५४ लाख ९७ हजार ९१३ रुपये वार्षिक खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
Newasa Security Guard Bharti 2023
Security Guard Bharti 2023: Good News For those Who are Searching Suraksha Rakshak Bharti 2023 !! Shivswarajya Suraksha Pvt. at Nevasa Taluka Yoddha Career Academy, Nevasa (Saundla-Nagpur Shiwar) is going to hire 600 Security Guard Posts. Mega recruitment of security guards is being done from 3 May 2023 to 8 May 2023. Candidates can apply before last date and Know More details about Newasa Security Guard Bharti 2023 at below
नेवासा तालुक्यातील योद्धा करिअर अकॅडमी,नेवासा (सौंदळा-नागपूर शिवार) येथे शिवस्वराज्य सुरक्षा प्रा. लि. च्या मार्फत दि. ३ मे २०२३ ते ८ मे २०२३ रोजी सुरक्षा रक्षकांची मेगा भरती करण्यात येत असल्याची माहिती भरती अधिकारी शुभम पाटीदार यांनी दिली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शिवस्वराज्य सुरक्षा प्रा. लि. च्या मार्फत बेरोजगार तरुणांना स्थायी रोजगार देण्यासाठी थेट भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती योद्धा करिअर अकॅडमी नेवासा येथे दि.३ मे २०२३ ते ८ मे २०२३ रोजी केली जाणार आहे.
Physical Criteria For Security Guard Bharti 2023
सुरक्षा रक्षक आणि पर्यवेक्षक च्या ७०० जागा साठीच्या निवडी करिता शारीरिक निकष ऊंची १६५ सेंमी पेक्षा जास्त आहे, छाती ८० ते ८५ सेंमी, आणि वय दरम्यान असावे १८ ते ४० वर्षे, आणि वजन दरम्यान असावे ५० ते ९) किलो आणि १०वी शिक्षण ही पात्रता आहे.
निवडलेले उमेदवार मेट्रोस्टेशन, विमानतळ, पुरातत्व विभाग, बहुराष्ट्रीय कंपनी, राष्ट्रीयत्व बँक इत्यादींमध्ये पोस्ट केले जातील. निवडलेल्या २१ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर केवळ निवडक उमेदवारांना पीएफ, मेडिकल, फॅमिली मेडिकल, फॅमिली मोफत पीएफ, पेंशन, विधवा पेन्शन इ सुविधा मिळेल.
मासिक वेतन महाराष्ट्र गार्ड बोर्डच्या अनुसार १५ हजार ते १९ हजार रुपये ८ तास ड्यूटी आणि १९ हजार ते २२ हजार रुपये १२ तास ड्युटीचा पगार राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
भरती करिता भरती अधिकारी शुभम पाटीदार यांचेशी 7999885926 , 8888669598 या क्रमाकांवर संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.
Security Guard Bharti 2023
Security Guard Bharti 2023 : Wage hike has been implemented board wise. Nandatai Madhavrao Bhosale, general secretary of the Maharashtra State Security Guard and General Workers’ Union, went on a hunger strike in March to demand an increase in the salaries of security guards. Benefit to private security guards too – This decision will also make it possible to increase the salary of security guards in private security companies.
सुरक्षारक्षक मंडळातील नोंदीत रक्षकांच्या वेतन व भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील १२ मंडळांसाठी वेतनवाढ व लेव्हीच्या रकमेत वाढ जाहीर केली आहे. याचा ५० हजारापेक्षा जास्त सुरक्षारक्षकांना लाभ होणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
प्रत्येक मंडळनिहाय वेतनवाढ लागू केली आहे. सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढीसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या सरचिटणीस नंदाताई माधवराव भोसले यांनी मार्चमध्ये उपोषण केले होते. खासगी सुरक्षारक्षकांनाही लाभ – या निर्णयामुळे खासगी सुरक्षारक्षक कंपन्यांमधील सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढ करणेही शक्य होईल. यामुळे खासगी सुरक्षा कंपन्यांमधील ७ ते ८ लाख सुरक्षारक्षकांच्या वेतनवाढीचा मार्गही सुकर होणार आहे.
Security Guard Bharti 2022 – Result
Security Guard Bharti 2022 : The Marks obtained in field examination, educational qualification and marks and other information has been available of Aggregate Bridge of Amravati District Security Guard Board-2021. Candidates submit their objections at the mentioned email address or address before the 10th of October 2022. Further details are as follows:-
Security Guard Board Recruitment 2022 – सुरक्षा रक्षक भरती निकाल
अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०२१ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, मैदानी परीक्षेस उपस्थित झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईल वरती मैदानी परीक्षेत मिळालेले गुण, शैक्षणिक अहर्ता व गुण व इतर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेद्वारांनी www.sgbregistration.in या संकेतस्थळावर जाऊन स्व:ताचे User ID आणि password टाकून प्रथम Login करावे , तद्नंतर My Account >> View Result वर click करून उमेदवारास पाठवलेले शाररीक व मैदानी परीक्षेत प्राप्त गुण, अर्जात नमूद केलेले शैक्षणिक अहर्ता, तपासून घ्यावे. त्यात उमेदवारास काही शंका/आक्षेप असल्यास [email protected] या इमेल आयडी वर, किंवा सचिव, अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, परांजपे कॉलनी, डॉ. पुंडकर प्लॉट, आर. टि. ओ. कार्यालय मागे, अमरावती – ४४४६०२ या पत्तावर दिनांक १०/१०/२०२२ पर्यंत पोहचतील असे पाठवावेत.
Security Guard Board Bharti 2022
त्यानंतर प्राप्त अर्जावर कोणती हि दखल घेतली जाणार नाही. सदर समुच्चय पुल तयार करणे हि थेट भरती नाही. त्यामुळे समुच्चय पुलासाठी पात्र उमेदवारांना नोकरीतील हमी देता येत नाही. मात्र ज्या प्रमाणात अस्थापानांकडून मागणी उपलब्ध होईल, त्यानुसार समुच्चय पुलावरील उमेदवारांना कामासाठी वितरीत केले जाईल. सदर समुच्चय पुल तयार करणेचे काम पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आले असून उमेदवारांनी कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती एजंट/दलाल यांच्याशी आर्थिक व्यवहार आणि संपर्क करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे.
Security Guard Recruitment 2022
Security Guard Bharti 2022 : The deadline for online submission of the Character Verification Certificate and Health Test Certificate has been extended till 31st May, 2022 for the construction of Pune District Security Board’s Aggregate Bridge-2019. It should be noted that the certificate submitted thereafter will not be considered and no excuse will be considered after the expiry of the period. Further details are as follows:-
पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांना कळवण्यात येत आहे कि, आपले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि आरोग्य चाचणी प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करण्याची मुदत दिनांक ३१ मे २०२२ पर्यन्त वाढविण्यात आली आहे. त्यानंतर सादर केलेली प्रमाणपत्र ग्राह्य धरली जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच मुदत संपल्यावर कोणत्याही सबबीचा विचार केला जाणार नाही.
Security Guard Board Results (Cut Off Marks) Declared
Security Guard Bharti 2022: Following the advertisement of Pune District Security Guard Board for preparation of Aggregate Bridge-2019, reservation wise details (cut off) of the marks of eligible / eligible candidates have been published. Further details are as follows:-
पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांचा आरक्षणनिहाय तपशील (कट ऑफ) प्रसिद्ध केला आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
मंडळाच्या समुच्चय पुलावर घेण्यासाठी पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांचा आरक्षणनिहाय तपशील (कट ऑफ) पुढीलप्रमाणे.
उमेदवारांना सूचना :
१. उपरोक्त प्रमाणे समुच्चय पुलावर घेण्यासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांनी त्यांचा अर्जात केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने त्यांची पात्रता तपासण्याच्या आधीन राहून सुरक्षा रक्षक म्हणून मंडळात नोंदीत करून समुच्यय पुलावर घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
२. शारिरीक/ मैदानी परीक्षा प्राप्त गुण व शैक्षणिक गुण यांची बेरीज करून आलेल्या एकूण गुणांच्या आधारे, वरील प्रमाणे आरक्षण प्रवर्गानुसार कट ऑफ गुण जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवाराना सूचना करण्यात येते की ज्या उमेदवारांना त्यांच्या आरक्षण प्रवर्गा नुसार कट ऑफ गुणा एवढे वा जास्त गुण असतील त्यांना पुढील प्रक्रियेकरिता त्यांच्या नोंदीत भ्रमणध्वनी (Mobile) वर SMS पाठविण्यात येतील.
३. पात्र उमेदवारांना वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्राचे नमूने यांच्या वैयक्तिक login नुसार https://sgbregistration.in या पोर्टलवर १ एप्रिल २०२२ रोजी उपलब्ध करून दिले जातील.
४. पात्र उमेदवारांनी स्वत:चे वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्र दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यन्त https://sgbregistration.in या पोर्टल वर जमा (upload) करावीत.
५. वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्राच्या प्रत्यक्ष पडताळणीनंतर पात्र उमेदवारांनी B-Form साठी ऑनलाइन रु. १०० व इतर कर भरल्यानंतर मंडळाच्या प्रतीक्षा यादी वर सामील करून घेतले जाईल.
६. सदरचा निकाल म्हणजे कामाची हमी नसून विविध अस्थापना / फँक्टरी यांच्याकडून प्राप्त मागणीनुसार समुच्चय पूलातील नोंदीत सुरक्षा रक्षकांना काम उपलब्ध करून देण्यात येईल.
७. पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, पुणे. सूमुच्चय पुल निकाल २०१९ हा मंडळाने शासनास दिंनाक १२-०२-२०२१ रोजीच्या पत्राद्वारे प्रवर्ग निहाय आरक्षणाबाबत मागितलेल्या मार्गदर्शनाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
Mumbai Mahanagarpalika Security Guard Vacancy 2022
Security Guard Bharti 2022 : A decision will be taken soon to fill 1800 vacancies of security guards in Mumbai Municipal Corporation. These vacancies put a strain on the existing security guards. Sometimes they have to do double duty. Further details are as follows:-
मुंबई महापालिकेतील सुरक्षारक्षकांची 1800 रिक्त पदे (Security Guard Bharti 2022) भरण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डांमध्ये जलाशये, रुग्णालय, उद्यान, स्मशानभूमी अशा ठिकाणी सुरक्षारक्षकांची 1800 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे सध्या कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांवर कामाचा ताण असतो. काही वेळा त्यांना डबल डय़ुटी करावी लागते. सुरक्षारक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे पालिकेच्या उद्यान, मैदानात चोऱ्या आणि गर्दुल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षारक्षकांची ही पदे भरावीत यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार वरळी युवासेनेचे उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी रिक्त पदांचा आढावा घेऊन लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली. बैठकीला उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, उपआयुक्त प्रभात रहांगदळे, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे आदी उपस्थित होते.
सध्या कोरोना मुले मुंबई महापालिकेत अत्यावश्यक सेवेच्या विविध विभागांत भरती केली जात आहे. मात्र १४०० पदे रिक्त असलेल्या सुरक्षा विभागात भरती का केली जात नाही, असा सवाल कामगार संघटनांनी केला आहे.
सध्या सुरु असलेल्या करोनाच्या साथीत अधिक मनुष्यबळाची गरज असल्याने प्रशासनाने अग्निशमन दल जवान व सुरक्षा रक्षकांना तीन पाळ्यांमध्ये ड्युटी लावली आहे. त्यामुळे असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कामाचा ताण येत आहे. नेमणुकीच्या जागा अनेक आणि रक्षकांची संख्या कमी असल्याने असंख्य महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाविनाच गाडा हाकला जात आहे.
सध्या पालिकेत सुरक्षा रक्षकांची ३८०० मंजूर पदे असून त्यातील १४०० म्हणजे ३७ टक्के पदे रिक्त आहेत. मध्यंतरी सुरक्षा रक्षकांची काही पदे भरण्यात आली. त्या भरतीच्या प्रतीक्षा यादीवरील जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी दी म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पालिकेकडे केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रूग्णालये व इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची आवश्यकता असून त्यासाठी तातडीने या विभागात भरती करावी, असे बने यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत यांना पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे. हि बातमी सविस्तर महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित झालेली आहे.
Table of Contents
bharti out
Amaravati chi mirit list kevha lagnar aahe sir.
Amravati chi suraksha rakshak mirit list kevha lagnar aahe sir.