MSCE 5th & 8th Class शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर !

5th & 8th Std Scholarship Result

5th & 8th Std Scholarship Result 

Scholarship Result : The final results of the Class V and VIII examinations conducted by the Maharashtra State Examination Council in August 2021 and the merit lists of the scholarship holders have been announced on Friday. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑगस्ट २०२१ मध्ये घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीचे ५७ हजार ३३४, तर आठवीचे २३ हजार ९६२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील इयत्ता पाचवीचे १४ हजार २५० आणि आठवीचे १० हजार ७३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक असणार आहेत.

परीक्षा परिषदेच्या वतीने ही शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबई वगळता संपूर्ण राज्यात घेण्यात आली. परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल २४ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला, तर गुणपडताळणीसाठी २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाइनद्वारे मागविले होते.

परिषदेने दिलेल्या मुदतीत ऑनलाइन आलेल्या परिपूर्ण अर्जांवरून संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी केली. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार केला आहे. या निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.

“A copy of the final mark sheet of the scholarship examination has been made available on the Council’s website. Printed marks and certificates will be delivered to the schools soon. Also, the concerned students in the merit list are being recommended to the Office of the Director of Secondary and Higher Secondary Education for providing scholarship amount. Further correspondence regarding the scholarship amount should be sent to his office, “said H.I. Attar explained.

शिष्यवृत्ती परीक्षेची सांख्यिकीय माहिती : 

 • परीक्षेचे नाव : नोंदणी केलेले विद्यार्थी : उपस्थित विद्यार्थी : अनुपस्थित विद्यार्थी : पात्र विद्यार्थी : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी : पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार टक्केवारी)
 • इयत्ता पाचवी : ३,८८,५१५ : ३,३७,३७० : ३७,८७१ : ५७,३३४ : १४,२५० : १६.९९ टक्के
 • इयत्ता आठवी : २,४४,३१४ : २,१०,३३८ : २२,८१४ : २३,९६२ : १०,७३६ : ११.३९ टक्के
 • एकूण : ६,३२,८२९ : ६,३१,०१४ : ६०,६८५ : ८१,२९६ : २४,९८६ :१४.२० टक्के

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ : 

शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाचे संकेतस्थळ मंदावले 

The results of the scholarship examination were announced at 5 pm on Friday. After that the website was being opened to view the scholarship results and merit lists of the students. This website was being searched by many people at the same time.

So, even after opening the link of the website, I got to see the picture of students having to wait for a long time to see the result. “There is no problem with the website. Millions of people are browsing the website at the same time, so it may take some time to see the results, “said the State Examination Council.


MSCE Pune Scholarship Results 2021

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. 

MSCE 5th & 8th Class Result 2021 Check Your Online From Following Given Section. The Marksheet or Score Card of this result can be download from Following Section.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आला. पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता पाचवीचे १६.९९ टक्के आणि पूर्व माध्यमिक म्हणजेच इयत्ता आठवीचे ११.३९ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. एकूण १४.८४ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
इयत्ता पाचवी –

 • परीक्षेला उपस्थित विद्यार्थी – ३,३७,३७०
 • पात्र विद्यार्थी – ५७३३२
 • पात्रतेची टक्केवारी – १६.९९

इयत्ता आठवी –

 • परीक्षेला उपस्थित विद्यार्थी – २१०३३८
 • पात्र विद्यार्थी – २३९६२
 • पात्रतेची टक्केवारी – ११.३९

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगइनमध्ये २४ नोव्हेंबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरता ५० रुपये याप्रमाणे शुल्क आकारले जाईल.

अंतिम निकाल कधी?

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी, ग्रामीण इत्यादी दुरुस्तीसाठी ५ डिसेंबर पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज पाठवल्यास तो स्वीकारला जाणार नाही. या मुदतीत ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगइनमध्ये ३० दिवसांपर्यंत कळवण्यात येईल. हे सर्व अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

?Check Your Online Result Now?

MSCE 5th & 8th Class Result 2021

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) – 2021
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) – 2021
MSCE Pune Scholarship Result 2021
MSCE Pune Scholarship Result 2021

Scholarship Result  : मुंबई वगळता इतर जिल्ह्यात १२ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई जिल्ह्यातील परीक्षेचे नियोजन अद्याप झाले नसले, तरी राज्य परीक्षा परिषदेने निकालाची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठीची अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. दोन सप्टेंबरपर्यंत त्यासाठीच्या त्रुटी व आक्षेप नोंदविता येणार आहेत. त्यानंतर अंतिम उत्तरसूचीसह निकालप्रत तयार करण्याची कार्यवाही सुरू होणार असल्याचे परिषदेने सांगितले.

वर्षभरापासून या परीक्षेची तयारी केल्यानंतर पुढील वर्गात प्रवेशित झाल्यावरही मागील अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा दिल्याने विद्यार्थ्यांची खरी ‘कसोटी’ पाहिली गेली. त्यामुळे या परीक्षेचा निकाल आणि गुणवत्ता यादी केव्हा जाहीर होते. याकडे विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांचे लक्ष लागले आहे. करोना संसर्गामुळे परीक्षा लांबल्याने यंदा या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यास उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित केले जाणार नाही. पात्र किंवा अपात्र या स्वरूपात निकाल जाहीर होईल. त्यानुसार प्रत्येक पेपरमध्ये ४० टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरतील. या पात्र विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेनुसार व प्रचलित निकषांच्या आधारे जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्ती संच संख्येच्या मर्यादेत गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.


5th & 8th Std Scholarship Result Declared : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर केला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १६ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा; तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इयत्ता आठवी) अंतरिम (तात्पुरता) निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉग इनमधून; तसेच पालक व विद्यार्थ्यांना हा निकाल परिषदेच्या http://www.mscepune.in/ वेबसाइटवर पाहता येणार आहे. मात्र, निकाल जाहीर झाल्यापासून या लिंकवर काही तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल समजू शकलेला नाही.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगइनमध्ये २० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी, ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी २० ऑक्टोबरपर्यंत संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

संकेतस्थळावर तांत्रिक अडचण

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून काही तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळावरील निकालाची लिंक उघडत नाही. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येत नसल्याची तक्रार केली.


Scholarship Result : 5th & 8th Std Scholarship Result is Still Awaited – फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.

Scholarship Result : राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. याचबरोबर नव्याने सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात या परीक्षा नेमक्या कधी होणार याबाबतही कोणतीही सूचना न आल्याने पालकांचा संभ्रम वाढला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २० लाखांहून अधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका ऑफलाइन तपासून निकाल जाहीर केला. मात्र ओएमआर शीटवर परीक्षा घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल परीक्षा परिषदेला जाहीर करता आलेला नाही. यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे. पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिली स्पर्धा परीक्षा म्हणून ओळखली जाते. या परीक्षेसाठी विद्यार्थी खूप परिश्रम करतात. या परीक्षेचे मूल्यांकन सोपे व्हावे या उद्देशाने संगणकीय प्रणालीचा वापर केला जातो. असे असतानाही परीक्षा परिषदेने अद्याप हा निकाल का जाहीर केला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

तंत्रज्ञ परगावी गेल्याने…!

काही पालकांनी परिषदेच्या पुणे येथील कार्यालयात फोन केला असता तंत्रज्ञ परगावी गेल्याने उत्तरपत्रिका मूल्यांकन झाले नाही किंवा लवकरच निकाल लागेल अशी विविध प्रकारची उत्तरे मिळत आहेत. तसेच, शाळांमध्येही याबाबत कोणतीही माहिती नसल्याने मुख्याध्यापकही यावर काहीच सांगू शकत नाहीत. यामुळे पालकांचा संभ्रम वाढत आहे.

याचबरोबर सध्या पाचवी व आठवीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतही कोणतीही सूचना परीक्षा परिषदेने जाहीर केलेली नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे शिक्षणमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे. याबाबत परिषदेचे संचालक तुकाराम सुपे यांच्याशी मोबाइल तसेच मेसेजद्वारे संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

सोर्स : म. टा.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. TANVI NARAYAN PASHTE says

  Reject dakhava

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड