शिक्षकांची नाव नोंदणी सुरु – वरिष्ठ, निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी करा नोंदणी | SCERT Maha Registration 2023
SCERT Maha Registration 2023 - training.scertmaha.ac.in
SCERT Maharashtra Registration 2023
SCERT Maha Registration 2023: Government of Maharashtra has entrusted the responsibility of planning and coordination of senior and selection category training to the State Educational Research and Training Council. This portal has been developed for online registration for the said training. The teachers of four groups namely Primary, Secondary, Higher Secondary and Adhyapak Vidyalaya Adhyapakacharya have to register on the said portal. The second phase of senior and selection category training has been started by the State Educational Research and Training Council i.e. Education Authority. Accordingly, it has been clarified on behalf of the Education Authority that the eligible trainees can register for the training between 29th May and 12th June.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाकडून वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थीना २९ मे ते १२ जूनदरम्यान नोंदणी करता येणार असल्याचे विद्या प्राधिकरणाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व अपडेट्स आम्ही या टेलिग्राम वर प्रकाशित करत राहू, तेव्हा लगेच जॉईन करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विद्या प्राधिकरणाचे संचालक शरद गोसावी यांनी निर्देशानुसार, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी विद्या प्राधिकरणाकडे आहे. यानुसार २०२१-२०२२ दरम्यान ऑनलाइन स्वरूपामध्ये एकूण ९४, ५४२ प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आता वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाइन प्रशिक्षणाचा द्वितीय टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार या प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय चार गटातील शिक्षक पात्र या मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य यांनी नोंदणी करता येणार आहे.
प्रशिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने
प्रशिक्षणाकरिता नोंदणी करण्यासाठी परिषदेच्या https:// training. scertmaha ac. in या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच परिषदेच्या www. maa. ac. in या संकेतस्थळावर सर्व तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झाल ल प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २९ मे, २०२३ ते १२ जून, २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. प्रशिक्षण लिंक नोंदणी दिनांक २९ मे, २०२३ रोजी दुपारी २ पासून सुरू होईल. प्रशिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने असणार आहे. याबाबत नोंदणीनंतर नोंदणी केलेल्या ई-मेलवर विद्या प्राधिकरणाकडून ई-मेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना शिक्षक संबंधितांना देण्यात येणार आहेत…
वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण
हे प्रशिक्षण १२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे
प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जाणीव जागृती करणे.
- जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम.
- शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
- नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्व विकास, छात्राध्यापक विकास, संस्था विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे.
- एकविसाव्या शतकातील कौशल्य छात्राध्यापक/ विद्यार्थी यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम करणे.
- शारीरिक व मानसिक स्वास्थ संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सक्षम करणे.
- मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.
पात्रता निकष
उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- १२ वर्षाची अर्हताकारी सेवा
- या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.
-
अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण
हे प्रशिक्षण २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे
प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये
- बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवविचार प्रवाहाच्या अंमल बजावणीसाठी सक्षम करणे.
- मूल्यमापन पध्दती आणि साधन तंत्रे यांच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी शिक्षकांना सक्षम करणे.
- शिक्षकांमध्ये प्रभावी शालेय व्यवस्थापन संघटन आणि प्रशासकीय कौशल्यासाठी आवश्यक शैक्षणिक कार्य संस्कृती विकसित करणे.
- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शालेय अभ्यासक्रम व शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमात होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे.
- मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.
- शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
- जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम
पात्रता निकष
उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- २४ वर्षाची अर्हताकारी सेवा
-
अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
क)
- प्राथमिक शिक्षकांसाठी – प्रशिक्षित पदवीधराची अर्हता मिळविली असली पाहिजे.
- प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी – पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.
- माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित – अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे.
प्रशिक्षण शुल्क
प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाइन अदा करावे. एकदा जमा केलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
शुल्क ₹२०००प्रती प्रशिक्षणार्थी
SCERT Maharashtra Teacher Training Registration 2023-24
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र शिक्षक प्रशिक्षण नोंदणी २०२३-२४
For Teachers with Shalarth ID – शालार्थ आयडी असलेल्या शिक्षकांसाठी
Registration for teachers not on Shalarth- शालार्थवर नसलेल्या शिक्षकांसाठी नोंदणी
Table of Contents
मी निवडश्रेणी ची training करीत आहे पण सर नोंदणी करतांना चूक झाली आहे असं वाटतं मी training र्ण केली आहे व exam ही दिली आहे pls हेल्प करा