Savitribai Phule Scholarship Scheme
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत राज्य शासनाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत वाढ करून ५ वी ते ७वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना २५० रुपये, तर ८ वी ते १० वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ४०० रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ही सुधारित वाढ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दिली जाईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यासंदर्भात विधान परिषदेत सतीश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सध्याची शिष्यवृत्तीची रक्कम अतिशय तुटपुंजी असल्याची कबुली देत मंत्री शिरसाट म्हणाले, सध्या ५ वी ते ७ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दरमहा ६० रुपये देतो, ते आता दरमहा २५० रुपयांप्रमाणे देण्यात येतील, तर ८वी ते १० वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० रुपयांवरून ४०० रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव विभागाने तयार केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या आत हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचा आमचा विचार आहे, असेही शिरसाट म्हणाले.
पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त विभागाकडून मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही मान्यता मिळताच यावर्षीपासून सुधारित शिष्यवृत्ती लागू करण्यात येईल, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















