सातबारा उतारा: मालकी हक्क बदलण्याची प्रक्रिया आणि कायदेशीर कारणे कोणती आणि काय आहे प्रोसेस! | Satbara Utara: New Ownership Rules!
Satbara Utara: New Ownership Rules!
आपल्याला माहीतच असेल सातबारा हा एक महत्वाचा डॉक्युमेंट आहे. सातबारा उतारा म्हणजे जमिनीवरील मालकी हक्काचे अधिकृत प्रमाणपत्र. शेतकरी, भूमिपुत्र किंवा जमीनधारक यांच्यासाठी सातबारा उतारा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, वारस नोंदी, भूसंपादन किंवा न्यायालयीन वाटप या सर्व गोष्टी सातबारा उताऱ्यावर नोंदवलेल्या असतात. मात्र, अनेक वेळा चुकीच्या नोंदी, फसवणूक किंवा कायदेशीर अडचणींमुळे जमिनीचा मालकी हक्क बदलत नाही किंवा चुकीच्या व्यक्तीच्या नावाने नोंद होतो. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर नाव कसे बदलते आणि त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया काय असते, चला तर आपण बघूया या साठी काय पद्धती आहे तर…
- भूसंपादन: सरकारी प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया
सर्वप्रथम भूसंपादन ही एक प्रमुख प्रक्रिया आहे जिथे सरकारी प्रकल्पांसाठी, जसे की रस्ते बांधणी, धरणे, विमानतळ, औद्योगिक वसाहती इत्यादींसाठी सरकार जमीन संपादित करते. हे संपादन ‘भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्व्यवस्थापन अधिनियम 2013’ अंतर्गत केले जाते. या प्रक्रियेत मूळ मालकाचे नाव सातबारा उताऱ्यावरून काढले जाते आणि त्या जागेवर संबंधित सरकारी प्रकल्पाचे नाव नमूद केले जाते. मोबदल्यात बाजारभावानुसार भरपाई दिली जाते. हा बदल कायदेशीरदृष्ट्या वैध आणि अधिकृत असतो. - खरेदी-विक्री व्यवहार: अधिकृत नोंदणीची प्रक्रिया
जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याकडून जमीन खरेदी करते, तेव्हा अधिकृत खरेदीखत तयार केले जाते आणि नोंदणी कार्यालयात नोंदवले जाते. या नोंदणीच्या आधारे महसूल विभागातील तलाठी किंवा कर्मचारी सातबारा उताऱ्यावर फेरफार करतात. नवीन मालकाचे नाव अधिकृतरित्या सातबारा उताऱ्यावर नोंदवले जाते. ही प्रक्रिया महसूल मंडळ अधिकाऱ्याच्या मंजुरीनंतरच लागू होते, त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप होऊ शकत नाही. - वारस नोंदी: वारसांना मिळणारा हक्क
मालकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांनी मालकी हक्क मिळवण्यासाठी 90 दिवसांच्या आत तलाठ्याकडे अर्ज करावा लागतो. या अर्जासोबत मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक असते. महसूल यंत्रणा योग्य तपासणी करून मयत व्यक्तीच्या जागी वारसांची नोंद सातबारा उताऱ्यावर करते. ही प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण केल्यानंतरच ती वैध ठरते. - न्यायालयीन वाटप: मालकी हक्कांचे न्यायिक निपटारा
काहीवेळा जमिनीचे हक्क एकाहून अधिक व्यक्तींकडे असतात आणि त्यात मतभेद होतात. अशा वेळी तहसीलदार प्रकरण बंद करून संबंधितांना सिव्हिल कोर्टात जावे लागते. सीपीसी कायद्याच्या कलम 54 अंतर्गत न्यायालय निर्णय घेते आणि त्या निर्णयाच्या आधारे महसूल विभाग जमिनीचे वाटप करतो. न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो आणि त्या आधारे सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंदवला जातो. - सक्षम अधिकाऱ्यांचा आदेश: नोंदीत सुधारणा प्रक्रिया
कधी कधी चुकीच्या दस्तावेजांवर फेरफार होऊन एखाद्या व्यक्तीचे नाव सातबारा उताऱ्यावर चुकीने चढवले जाते. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्ती महसूल विभागाकडे तक्रार करू शकतो. सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशाने फेरफार तपासला जातो आणि योग्य निर्णय घेऊन सुधारणा केली जाते. ही प्रक्रिया केवळ अधिकृत दस्तावेजांच्या आधारे केली जाते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सातबारा उतारा: नोंदींची नियमित तपासणी का आवश्यक?
जमिनीवरील मालकी हक्काचे सर्वाधिक प्रमाण सातबारा उताऱ्यावरच असते. त्यामुळे जमिनीच्या नोंदी नियमितपणे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सातबारा, फेरफार उतारे, खरेदीखत, वारस नोंदी यांची तपासणी केल्यास फसवणूक किंवा चुकीची नोंद टाळता येऊ शकते. महसूल विभागाशी संपर्क ठेऊन शंका निरसन करणेही गरजेचे आहे.