४००० ITI धारकांना रोजगार संधी
Satara ITI jobs 2020
सध्या कोरोना मुळे अनेक परप्रांतियांनी महाराष्ट्रात न थांबता स्वतःच्या जन्मभूमीकडे धाव घेतली आहे. उत्तरप्रेदश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड आदी राज्यातील परप्रांतीय गावाकडे रवाना झाले. त्यामुळे गेले अनेक वर्ष येथील MIDC मध्ये काम करणाऱ्या परप्रांतीयांच्या जाण्यामुळे उद्योग-व्यवसायात मनुष्यबळाची चणचण भासू लागली आहे.
सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळून उद्योग सुरू करण्यास सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यामुळे उद्योग सुरू करण्याच्या उद्योजक तयारीत आहेत. मात्र कामगारांची अडचण जाणवू लागली आहे. त्यासाठी पर्याय म्हणून जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थातून (ITI) बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना या उद्योगांमध्ये काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने सध्या हालचाली सुरू आहेत.
सातारा जिल्ह्यात तालुकानिहाय एक यानुसार अकरा शासकीय आयटीआय तर सहा खासगी आयटीआय आहेत. पाटण, कऱ्हाड व फलटण येथे ते आहे. दरवर्षी सुमारे साडे चार हजार विद्यार्थी आयटीआयमध्ये प्रवेश घेतात. तर सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिकून बाहेर पडतात. आज आखेर प्रशिक्षण घेवून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. त्यातील काहीजण पुण्या- मुंबईत नोकरी करत आहेत. काहींनी स्वतःचा व्यवसाय, उद्योग सुरू केला आहे. काहीजण अद्यापही बेरोजगार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील आयटीआयधारकांची पुणे, पिंपरी चिंचवड मधील कंपन्यात नोकरीला सर्वाधिक पसंती असते. तेथील राहणीमान, जीवनशैली याचे त्यांना आकर्षण असते. त्या कंपन्यांत मिळणारा पगारही त्या तुलनेत असतो. त्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये काम करायचे झाल्यास पुण्याच्या तुलनेत कमी पगार मिळत असल्याने अनेक जण येथे काम करण्यास अनुत्सुक असतात. मात्र कोरोनाचे आलेले संकटाचे संधीत रूपांतरीत करण्याची सध्या आयटीआयधारकांना मिळाली आहे. त्यामुळे त्यास कसा प्रतिसाद मिळणार ? याकडे लक्ष लागून आहे
यानिमित्ताने त्यांनाही कामाची संधी उपलब्ध होत आहे. त्यादृष्टीने आयटीआयने बेरोजगार विद्यार्थ्यांची यादी ही तयार केल्याचे समजते. संस्थांनी याबाबत संकेतस्थळावरून ज्यांना मनुष्यबळ आवश्यक आहे, त्यांनी त्या संकेतस्थळांवर संपर्क साधून मागणी केल्यास त्यानुसार कामगार पुरवण्याचे काम केले जाणार आहे. कऱ्हाडच्या एमआयडीसीतील सुमारे दोन हजारांहून अधिक परप्रांतीय कामगार त्यांच्या गावी परतले आहेत. त्यामुळे या एमआयडीसीत सुमारे दोन हजार कामगारांची आवश्यकता भासणार असल्याचे दिसून येते. येथे उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी हे कामगार तातडीने हवे आहेत. त्याबाबत कौशल्य व विकास उद्योजकता विकास विभागातील अधिकाऱ्यांशी एमआयडीसीतील उद्योजकांनी संपर्कही साधला आहे. त्यानुसार त्यांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले. एमआयडीसीत प्रामुख्याने टर्नर, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट व इलेक्ट्रिशियन या ट्रेडचे कामगारांची आवश्यकता असते. ती येथे मिळण्यास मदत होईल.
Sir mz २०१५ mdhe iti zl ata mi graduate kel ahe so plz mla job chi avshkta ahe ..
Sir iti diesul mechanic sati aahe ka
I am gradute i want job mo- 7039846076
He Private Companies madhle jobs aahet … MIDC Madhlya.
Ex army sati kahi mahiti day