हजारो लोकांना मिळणार रोजगाराच्या संधी. केंद्राची नवीन रणनीती!

Sarkari Naukri 2025 Openings

सध्या रोजगार हा एक मोठा ज्वलंत प्रश्न आहे. एकीकडे रोजगाराचे साधन नसल्याने दरवर्षी रोजी-रोटीसाठी स्थलांतर करण्याची वेळ पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांवर येते. हे नागरिक पोटापाण्यासाठी काही महिने शहराची वाट धरतात. केंद्र सरकारच्या माध्यमातून वाढवण येथे उभारण्यात येणाऱ्या बंदरामुळे हजारो स्थानिकांना रोजगाराचे साधन निर्माण होणार आहे (Sarkari Naukri 2025 Openings) . त्यामुळे जिल्ह्यातील स्थलांतरासह विकासाची समस्या दूर होणार आहे. या प्रकल्पामुळे अनेक लहान-मोठ्या जोड व्यवसायाची साधने उपलब्ध होणार आहे. पालघर जिल्हा हा भविष्यात विकासाच्या दिशेने कूच करणार आहे. यासाठी भरती प्रक्रिया, कौशल्य प्रशिक्षण सुरू झाले आहे. पालघर जिल्ह्यात काही प्रमाणात डायमेकर व्यवसाय आहे. त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी आहे. आता वाढवण बंदर प्रकल्पात बहुउद्देशीय व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र उभारणीला सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या प्रकल्पासाठी व्ही.पी.एल. आणि जहाज महासंचालनालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. स्थानिक युवकांना कौशल्ये प्रदान करण्यापासून डाई उत्पादकासाठी ब्रॅण्डिंग, वित्तपुरवठा, प्रगत प्रशिक्षण पुरविण्यापर्यंत उपक्रम आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी संधी उपलब्ध करणार आहे. तसेच, या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

 

Sarkari Naukri 2025 Openings

डहाणू आणि पालघर तालुक्याच्या निवडक गावांसाठी एकात्मिक कृषी, बागायती योजना तयार करत ती अमलात आणली जाणार आहे. मच्छीमारांसाठी नुकसानभरपाई धोरण, दोन बंदरांच्या बांधकामासाठी सुमारे ३०० कोटींचा निधी दिला जाणार आहे. टिकाऊ आणि पर्यावरणपूरक साधनांचा समावेश केला जाणार आहे. या बंदरामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान लोकांचे होणार नाही. जास्तीत जास्त रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न केला जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एकीकडे पालघर जिल्ह्यात रोजगाराची साधने अत्यल्प असल्याने मुंबई, ठाणे गाठावे लागते. त्यातच स्थलांतराची गंभीर समस्या आहे. त्यामुळे वाढवण बंदराचा प्रकल्प हजारो रोजगाराची निर्मिती करणार आहे. त्याचा फायदा स्थानिकांना होणार असून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. नागरिकांचे जीवनमान, राहणीमान उंचावण्यास मदत ठरणार आहे; मात्र या कौशल्य प्रशिक्षणातून किती जणांना रोजगार मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी वाढवण बंदर उभारणीपूर्वी मागणी केली होती. येथील स्थानिकांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे, हा जेएनपीएचा स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे पालघर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेलादेखील चालना मिळेल व स्थानिकांचे जीवनमान उंचावेल.

वाढवण बंदर परिसरातील लोकांसाठी विविध उपक्रम जेएनपीए राबवणार आहे. वाढवण बंदर भरणीला सुरुवात करण्यापूर्वी येथील तरुणांना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम जवाहरलाल नेहरू बंदर परिसरात राबविण्यात आला आहे.

– वाढवण बंदरामुळे १२ लाख रोजगाराच्या संधी
– समुदाय विकास, आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न
– स्थानिकांसाठी कौशल्य विकास उपक्रम
– पालघर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी
– स्थानिक व्यवसायाला उभारी मिळणार


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड