सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत “लिपिक” पदाची भरती; ऑनलाईन अर्ज करा !! | Sangli PTB Bharti 2025
Sangli PTB Online Bharti 2025
Sangli Zilla Prathamik Shikshak Sahakari Bank Bharti 2025
Sangli PTB Bharti 2025: – Sangli District Primary Teachers Cooperative Bank Applications are invited from eligible candidates for the various vacant posts of “Clerk”. There are a total of 20 vacancies available. The job location for this recruitment is Sangli. Application is to be done in online mode. Interested and eligible candidates can apply through the given link before the last date. Last date to apply is 17th of January 2025. For more details about Sangli District Primary Teachers Cooperative Bank Bharti 2025, visit our websitewww.MahaBharti.in.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि सांगली अंतर्गत “लिपिक” पदाची 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – लिपिक
- पद संख्या – 20
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
- 📆आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज शुल्क – रु. 725 /- (जी.एस.टी सह)
- नोकरी ठिकाण – सांगली
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2025
- अधिकृत वेबसाईट – https://subankassociation.in/Home/
Sangli District Primary Teachers Cooperative Bank Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
लिपिक | 20 |
Educational Qualification For Sangli District Primary Teachers Cooperative Bank Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | Graduation, Post Graduation, M.Sc from any of the recognized boards or Universities. |
How To Apply For Sangli District Primary Teachers Cooperative Bank Application 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.subankassociation.in Job 2025
|
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/qnHPE |
👉ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/nQmru |
✅ अधिकृत वेबसाईट | https://subankassociation.in/Home/ |
Sangli PTB Bharti: सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत गेल्या १० वर्षांत आकृतिबंध वाढवून भरमसाट नोकरभरती करणारे विरोधक आज साळसूदपणाचा आव आणून आकांडतांडव करत आहेत. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी आकृतिबंध न वाढवता केवळ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेवर नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली असल्याचे बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी सांगितले. या भरती (Sangli PTB Bharti )संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शिंदे म्हणाले, शिक्षक बँकेत २०१२-१३ मध्ये १५८ कर्मचारी कार्यरत होते. त्यावेळी बँकेचा व्यवसाय ३७५ कोटी होता. आज विरोधक असणारे त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी हा आकृतिबंध ४ ऑगस्ट २०२३ रोजीच्या सर्वसाधारण सभेत वाढवून तो १७६ चा केला. त्यामुळे मार्च २०१४ मध्ये बँकेत १७५ कर्मचारी कार्यरत होते. याच बँक बचाव कृती समितीने जुलै २०२२ अखेर ३१ कर्मचारी भरले. आज बँकेचा एकूण व्यवसाय १००० कोटी रूपयांच्यावर आहे. २०१२-१३ च्या तुलनेत बँकेचा व्यवसाय अडीच पट वाढला, मात्र बँकेत फक्त १५५ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतर बँकेने उमदी व पंढरपूर या दोन नवीन शाखा सुरु केल्या आहेत. तेथे जवळपास १० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज आहे. तसेच बँकेचा व्यवसाय एक हजार कोटींच्या जवळपास गेला आहे.
अशा स्थितीतही कोणताही कर्मचारी आकृतिबंध न वाढविता जे कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेवर शासनाच्या नियमानुसार त्रयस्थ संस्थेमार्फत ऑनलाइन पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. सदरची भरती प्रक्रिया चालू असताना याला स्थगिती मिळावी म्हणून याच विरोधकांनी सहकार न्यायालयात दावा दाखल केला. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. यानंतर त्यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे अर्ज केला. यावर अपर निबंधक, सहकार आयुक्त कार्यालयाने बँकेचे नाव घालून जाहिरात द्यावी व नव्याने भरती प्रक्रिया पार पाडावी, असे आदेश दिले आहेत. मात्र, विरोधक भरतीला स्थगिती मिळाल्याचे आकांडतांडव करत असल्याचा आरोप विनायक शिंदे यांनी केला. यावेळी बँकेच्या उपाध्यक्षा अनिता काटे, संचालक उपस्थित होते.
बँक लुटणारेच बँक बचाव समितीत
विनायक शिंदे म्हणाले, आजपर्यंत सत्तेत राहून शिक्षक बैंक लुटणारेच आता बँक बचाव कृती समिती स्थापन करून आरोप करत सुटले आहेत. २०२०-२१ च्या तुलनेत २०२४ मध्ये जवळपास ५२ कोटी जादा कर्ज वाटप असूनही बँकेला दोन कोटी कमी व्याज मिळाले. या माध्यमातून आम्ही सभासदांचा फायदाच केला आहे. शिवाय, इतर खर्चात १ कोटी रुपयांची कपात केली. बँकेच्या इतिहासात सर्वांत कमी मार्जिनमध्ये बँक विद्यमान संचालक मंडळाने चालविली आहे. बँकेची सत्ता कायमस्वरूपी आपल्या ताब्यात राहील याचा भ्रमनिरास झाल्याने सत्तेशिवाय जगण्याची वेळ आल्याने विरोधक हवालदिल झाले आहेत. त्यांच्या कोणत्याही आरोपाला भीक घालणार नाही.
Sangli PTB Bharti: सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची(Sangli Zilla Prathamik Shikshak Sahakari Bank Bharti) ८ डिसेंबर रोजी होणारी लिपिक पदाची नोकरभरती परीक्षा स्थगित करावी, भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबवावी, असे आदेश सहकार आयुक्त यांनी दिले आहेत. सत्ताधारी गटाने लपून-छपून भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न बैंक बचाव कृती समितीने हाणून पाडला असल्याचा आरोप बैंक बचाव कृती समितीचे नेते उत्तम जाधव, बँकेचे संचालक कृष्णा पोळ व सचिन खरमाटे यांनी केला आहे. या भरती (Sangli PTB Bharti )संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Sangli Zilla Prathamik Shikshak Sahakari Bank Bharti
याबाबत बैंक बचाव कृती समितीच्यावतीने सहकार सचिव यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सहकार सचिव यांनी सहकार आयुक्त यांना दिले होते. त्यानुसार केलेल्या चौकशीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. ज्या बँकेत नोकरभरती करायची आहे, त्या बँकेच्या नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पारदर्शी नाही, अशा स्वरूपाचे निष्कर्ष निघाल्याने सहकार आयुक्त यांनी या भरतीसंदर्भातील ८ डिसेंबररोजी होणारी भरती परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश, ती जाहिरात देणाऱ्या सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक को ऑपरेटिव्ह असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. तसेच बँकेचे मुख्यालय असलेल्या जिल्ह्यातील ज्यादा खपाच्या वर्तमानपत्रात जाहिरात देऊन नोकरभरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याचे आदेश सहकार आयुक्त यांनी दिले आहेत.
गुन्हे दाखल करू :
जाधव, बजबळे याबाबत उत्तम जाधव म्हणाले, सत्ताधारी गटाने आकृतिबंधाचा नियम डावलून सोलापूर येथील एजन्सीमार्फत आपल्याच नातेवाईकांची भरती करण्याचा प्रयत्न केला आहे. जर पुन्हा असा प्रयत्न झाल्यास दोषींवर गुन्हे दाखल करू, तसेच यापूर्वी आठ ते दहा जणांची बेकायदेशीरपणे झालेली भरतीही रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शशिकांत बजबळे यांनी दिली.
Table of Contents