Sandarbh Seva Rugnalaya Jobs Bharti – संदर्भ सेवा रुग्णालयाच्या कारभार हाकणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील ‘अर्थ’पूर्ण संबंध फिस्कटल्याची चर्चा असून, ऐन मार्चमध्येच प्रशासनातील प्रमुख अधिकारी रजेवर गेले आहेत. त्यांचा प्रभार स्वीकारण्यास एकही अधिकारी धजावत नसल्याने आठवडाभरापासून हे पद रिक्तच आहे. पुरवठादारांच्या बिलांसह आमचे वेतन रखडल्याची ओरड नियमित कर्मचाऱ्यांकडून सुरू झाली असून, तोंडावर रुग्णालयात ‘शिमगा’ सुरू गुढीपाडव्याच्या झाल्याचे पाहायला मिळत आहे. हृदयविकार, कर्करोग आणि किडनी विकारांवर उपचार घेण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या रुग्णांसाठी हे रुग्णालय वरदान ठरले आहे. अलीकडेच चांगल्या कामगिरीसाठी रुग्णालयाला पुरस्कार मिळाला आहे. मरणासन्न कॅथलॅबमुळे अनेक रुग्णांनी ही हेळसांड अनुभवली. सरकारने साडेदहा कोटी रुपयांची नवीन कॅथलॅब देऊन दोन महिने उलटले.परंतु, प्रशासकीय उदासीनतेमुळे अजून ती कार्यान्वित होऊ न शकल्याने रुग्णांची फरफट सुरूच आहे. दुसरीकडे घामाला वेळेवर दाम मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्येही अस्वस्थता आहे.

तब्बल चार महिने वेतनाशिवाय काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा गेल्या महिन्यात कडेलोट झाला. त्यांनी केलेल्या कामबंद आंदोलनाचा फटका रुग्णसेवेला बसू लागताच, त्यांना दोन महिन्यांचे वेतन मिळाले. आता हीच वेळ नियमित कर्मचाऱ्यांवर आली आहे. दरमहा सहा – सात तारखेपर्यंत वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन होते. परंतु, त्यानंतरचा आठवडा उलटूनही वेतन न झाल्याने परिचारिका, लॅब टेक्निशियन्स, लिपिकवर्गीय घटकांसह रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















