महापालिकेत अग्निशमन विभागातील २९ पदांसाठी ९ डिसेंबरला परीक्षा | Sambhaji Nagar Agnishaman Bharti 2023
Sambhaji Nagar Agnishaman Bharti 2023
Sambhaji Nagar Agnishaman Bharti 2023
Sambhaji Nagar Agnishaman Bharti 2023: The permanent staff in the Municipal Corporation has been greatly reduced. The number of employees on contract system started increasing rapidly. The company which was given the responsibility for the recruitment process was reluctant for the past few months. The company promised to conduct the examination on December 9 for 29 posts in the fire department out of 123. The company has not informed when the exam will be conducted for the remaining 94 posts. So more than 8000 unemployed candidates are eyeing the date of the company.
महापालिकेत कायमस्वरूपी कर्मचारी अत्यंत कमी झाले आहेत. कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. भरती प्रक्रियेसाठी ज्या कंपनीला जबाबदारी देण्यात आली, ती कंपनीच मागील काही महिन्यांपासून टाळाटाळ करीत होती. १२३ पैकी अग्निशमन विभागातील २९ पदांसाठी ९ डिसेंबरला परीक्षा घेण्याचे आश्वासन कंपनीने दिले. उर्वरित ९४ पदांसाठी परीक्षा कधी घेणार, हे कंपनीने कळविले नाही. त्यामुळे ८ हजारांहून अधिक बेरोजगार उमेदवारांच्या नजरा कंपनीच्या तारखेकडे लागल्या आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
२९ पदे : उर्वरित ९४ पदांसाठी मात्र ‘तारीख पे तारीख’
मागील तीन दशकांत महापालिकेने रिक्त पदेच भरली नाहीत. त्यामुळे कायमस्वरूपी कर्मचारी झपाट्याने निवृत्त होत आहेत. काही विभागांचा डोलारा निवृत्त अधिकारीच सांभाळत आहेत. अनुभवी अधिकाऱ्यांच्या हाताखाली नवीन कर्मचाऱ्यांना काम करण्याची संधीच मिळाली नाही. मागील दोन वर्षांपासून भरतीसाठी मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्यात अत्यंत महत्त्वाची १२३ पदे भरली जातील, असे निश्चित केले.
भरती प्रक्रियेसाठी शासननियुक्त आयबीपीएस कंपनीची नेमणूक केली. विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले. साडेआठ हजार अर्ज कंपनीकडे आले. मात्र, कंपनी परीक्षा कधी घेणार, हे निश्चित करीत नव्हती
त्यामुळे बेरोजगार महापालिकेचे उंबरठे झिजवत होते.
दरम्यान, कंपनीने अग्निशमन विभागातील ९ अधिकारी, २० कर्मचारी भरतीसाठी तारीख निश्चित केली. ९ डिसेंबर रोजी शहरात २९ पदांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. गुणवत्ता यादी महापालिकेकडे सोपविण्यात येईल. उर्वरित ९४ पदांसाठी कंपनीने अद्याप तारीख निश्चित केली नाही. नवीन वर्षात ही परीक्षा होईल, असे गृहीत धरले जात आहे. २९ पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा कोणत्या केंद्रांवर राहील, विद्यार्थ्यांना हॉलतिकीट कधी देणार इ. मुद्द्यांचा तपशील कंपनीने महापालिकेला कळविला नाही.