Samaj Kalyan Swadhar Yojana
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी समाजकल्याण आयुक्तालयाने मुदत वाढवून ३१ डिसेंबरपर्यंत केली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर होती. पोर्टलवरील तांत्रिक अडचणी, काही महाविद्यालयांचे निकाल उशिरा लागणे तसेच विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आलेल्या मागण्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रियेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला होता. तसेच काही विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत उपलब्ध न झाल्याने ते मुदतीत अर्ज करू शकले नव्हते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनांनी समाजकल्याण आयुक्तालयाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर एकूण ८ हजार ९० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
स्वाधार योजना ही जिल्हा व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या पारंपरिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. मात्र या योजनेसाठी काही अटी असून अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला होता, परंतु जागा उपलब्ध नसल्याने त्यांना प्रवेश मिळाला नाही, अशाच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
यंदा या योजनेसाठी ३ हजार ९३७ विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज केले असून, मागील वर्षी लाभ घेतलेल्या ४ हजार १५३ विद्यार्थ्यांनी नूतनीकरणासाठी अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे एकूण अर्जांची संख्या ८ हजार ९० झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक ३८ हजार रुपये, तर जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांची स्वाधार शिष्यवृत्ती दिली जाते. या रकमेतून निर्वाह भत्त्याची कपात करण्यात येते, तर उर्वरित रक्कम भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीअंतर्गत भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्याकरिता दिली जाते.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















