Saksham- सक्षम पोर्टल देणार लाखो रोजगार संधी
सरकारद्वारे सक्षम (Saksham Yuva) एका पोर्टलची सुरवात सरकारने केली आहे. ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार संधी मिळणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून एमएसएमई कंपन्यांसोबत कामगारांचा सरळ संपर्क करून दिला जाईल. यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे आणि प्रत्येक व्यक्ती मोठ्या कंपनीसोबत जोडले जातील. त्यामुळे सर्व युवकांना रोजगाराच्या लाखो संधी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
सरकार द्वारे या पोर्टलची सुरवात मागील महिन्यात केली आहे आणि आता याची सुरवात पायलट प्रोजेक्टच्या आधारावर केली गेली आहे. सध्या काही जिल्ह्यात या वेबसाईटची सुरवात केली आहे आणि हळूहळू याचा विस्तार केला जाईल. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही प्रकाशित करूच.