सहकार आयुक्तालय विभाग अंतर्गत ७५१ पदांची भरती सुरु होणार! – Sahkar Ayuktalay Bharti 2023
Sahkar Ayuktalay Bharti 2023
Sahkar Ayuktalay Bharti 2023 – Sahkar Ayuktalay Pune Bharti 2023 process will begin soon for 751 vacancies. The Update & details information about this recruitment will be declared soon. On Mahabharti you will get all latest news about Sahkar Ayuktalay Bharti 2023, so keep visiting us. Recruitment of 751 posts under Cooperative Commissionerate will be done soon, out of which 448 posts of clerks and typists will be recruited through Maharashtra Public Service Commission. The Commissionerate informed that the recruitment process will be completed before August 15, 2023.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्वसानिमित्त राज्य सरकारने रिक्त जागांपैकी 75 हजार पदांची भरती विविध विभागांत करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सहकार आयुक्तालयांतर्गत 751 पदांची भरती लवकरच केली जाणार असून, त्यापैकी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक व टंकलेखकांची मिळून 448 पदांची भरती होईल. 15 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती आयुक्तालयातून देण्यात आली. शासनाच्या 30 सप्टेंबर 2022 च्या निर्णयानुसार ज्या विभागाचा आकृतिबंध (स्टाफिंग पॅटर्न) मंजूर आहे, अशा विभागातील रिक्त जागांपैकी शंभर टक्के तर उर्वरित विभागांपैकी 80 टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे. सहकार विभागातील लिपिक व टंकलेखक पदांची मिळून 366 पदे आणि लेखापरीक्षकांची 82 मिळून एकूण 448 पदांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
त्यामध्ये सहकार आयुक्तालयात 26, मुंबई- 36, कोकण -25, पुणे -38, कोल्हापूर -30, औरंगाबाद -33, नाशिक- 66, लातूर- 36, अमरावती- 33, नागपूर- 43 लिपिकांच्या तर लेखापरीक्षकांमध्ये मुंबईतील 29, पुणे -17, कोल्हापूर- 9, औरंगाबाद -19, नाशिकमधील 8 पदांचा समावेश आहे. त्याबाबत राज्यातील सर्व विभागीय सह निबंधकांनी त्यांच्याकडील प्रशासन व लेखापरीक्षकांची सरळसेवा बिंदूनामावलीनुसार आरक्षणानुसार पदे निश्चित करावीत आणि त्यानुसारचे मागणीपत्र सहकार आयुक्तालयात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसारचा प्रस्ताव आयुक्तालयाने शासनास 15 डिसेंबर 2022 रोजी पाठविला आणि शासनाने तो आयोगास दिला. त्यानंतर पहिली पूर्वपरीक्षा झाली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गट ‘क’ संवर्गातील 303 पदे
सहकार विभागातील गट ‘क’ संवर्गातील 303 पदांच्या भरतीसाठी आयुक्तालयाने टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसबरोबर करार केला असून 15 ऑगस्टपूर्वी ही नोकरभरती प्रक्रिया पूर्ण होईल. या पदांमध्ये उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, सहकार अधिकारी श्रेणी एक व सहकार अधिकारी श्रेणी दोन, वरिष्ठ लिपिक, सहायक सहकार अधिकारी, लघुटंकलेखक आणि लेखापरीक्षक श्रेणी दोन या पदांचा समावेश आहे. गट ‘क’ संवर्गातील पदांमध्ये सहकार आयुक्तालय मुख्यालयात 29, पुणे -23, कोल्हापूर -26, अमरावती -36, औरंगाबाद -24, नाशिक -40, कोकण -27, मुंबई- 23, लातूर -30, नागपूर- 38 आणि लेखापरीक्षकांची 7 पदे नाशिक जिल्ह्यासाठी भरण्यात येतील. त्यासाठी ऑनलाइन पध्दतीने परीक्षा होणार असून, त्याची प्रक्रिया पूर्ण होताच कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.