सफाई कामगार भरतीत मोठा घोळ! महापालिकेचा गोंधळ उघडकीस – Safai Karmchari Bharti 2024
Safai Karmchari Bharti 2024
Safai Karmchari Bharti 2024
बेळगाव महानगरपालिकेत सफाई कामगारांच्या भरती प्रक्रियेत गोंधळ उडाला आहे. १०० सफाई कामगारांच्या भरती प्रक्रियेत, आधीच सेवेत असलेल्या १५ कामगारांची नावे निवड यादीत पुन्हा समाविष्ट झाली आहेत. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातील त्रुटी उघड झाल्या आहेत, आणि भरती प्रक्रिया आणखी लांबणीवर पडली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे आणि पर्यावरण विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी यांच्यावर या भरती प्रक्रियेतील कागदपत्रांची पडताळणी जबाबदारी होती. मात्र, पडताळणी प्रक्रियेत उशीर झाला आणि आधीच भरती झालेल्या १५ कामगारांची पुन्हा निवड करण्यात आली. यामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महापालिकेत २०२३ साली १५५ सफाई कामगारांची भरती करण्यात आली होती, मात्र त्यातील एका कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्याने १ जानेवारी २०२४ रोजी १५४ कामगारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यानंतर १०० आणि १३४ सफाई कामगारांची भरती करण्याची योजना होती, परंतु ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही.
सफाई कामगार हितरक्षण समिती आणि अर्जदारांनी सप्टेंबरमध्ये या अनियमिततेवर आंदोलन केले. त्यानंतर पडताळणी प्रक्रिया सुरु झाली, मात्र तीही त्रुटीपूर्ण ठरली. १५५ जणांच्या यादीतून काहींनी पुन्हा अर्ज दाखल करून १०० कामगारांच्या भरतीतही सहभाग घेतला. परिणामी, आधीच भरती झालेल्या १५ जणांची नावे नव्या यादीत दिसून आली. आता महापालिकेच्या प्रशासन विभागाने ही यादी आरोग्य व पर्यावरण विभागाकडे परत पाठवली असून, त्या १५ जणांची नावे वगळून नव्या अर्जदारांना संधी देण्याचे निर्देश दिले आहेत.
Safai Karmchari Bharti 2024 – राजस्थान स्वायत्त सरकारी विभागाने सफाई कर्मचारी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रियाही आज, ४ मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2024 आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट lsg.urban.rajasthan.gov.in किंवा SSO पोर्टल sso.rajasthan.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की अर्ज फक्त SSO पोर्टल किंवा विभागाच्या वेबसाइटवरूनच करावा लागेल.तसेचया भरती अंतर्गत , राजस्थानमधील 186 शहरी संस्थांमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या एकूण 24,797 पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी कोणती पात्रता मागितली आहे आणि कोणत्या वयापर्यंत उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात इत्यादी माहिती खाली दिलेली आहे.
कोण अर्ज करू शकतो?
विभागाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, सफाई कर्मचारी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संबंधित पदावर काम करण्याचा अनुभव असावा. अधिसूचनेनुसार, उमेदवार राज्यातील कोणत्याही शहरी संस्था केंद्रात किंवा राज्यातील कोणत्याही विभागात साफसफाईची कामे करण्यास सक्षम असावा आणि सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले किमान 1 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र असावे.
वय किती असावे?
उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. तर राज्यातील ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- अधिकृत वेबसाइट lsg.urban.rajasthan.gov.in किंवा SSO पोर्टल sso.rajasthan.gov.in ला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावरील सफाई कर्मचारी भर्ती 2024 अर्ज लिंकवर क्लिक करा.
- आता एक नवीन विंडो उघडेल, जिथे तुम्हाला तुमचे लॉगिन तपशील प्रविष्ट करावे लागतील.
- त्यानंतर लॉग इन करा आणि अर्ज भरा आणि आवश्यक आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- यानंतर ऑनलाइन अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
सफाई कर्मचारी पदांसाठी अर्जदारांची निवड लॉटरी प्रक्रियेद्वारे केली जाईल. लॉटरी प्रक्रियेत पदांच्या 3 पट उमेदवारांना बोलावले जाईल. लॉटरीत नाव आल्यानंतर तीन महिने प्रॅक्टिकल असेल आणि त्यानंतर पोस्टिंग होईल.यासंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पाहता येईल.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.