JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांची ४६१ पदांची भरती सुरु,त्वरित करा अर्ज! – RTO AMVI Bharti 2026

Maharashtra RTO AMVI Bharti 2026 -मित्रानो, एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे,  स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मित्रानो, काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) द्वारे गट-क (Group C) संवर्गांतर्गत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजेच AMVI (Assistant Motor Vehicle Inspector) ४६१ पदासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या द्वारे पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी संधी प्राप्त झाली आहे. तेही RTO सारख्या रुबाबदार विभागात. आरटीओ (RTO) विभागात सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ४६१ जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ जून २०२६ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२६ (रात्री २३:५९ पर्यंत) आहे. इच्छुक उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन किंवा खाली दिलेल्या लिंक वरून पूर्ण जाहिराती आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. चला तर या बद्दल पूर्ण माहिती बघूया.  तसेच या भरती परीक्षेबद्दल पूर्ण माहिती आणि सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे.  RTO AMVI Bharti 2026

मित्रांनो, सर्व प्रथम आता या भरती साठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रते बद्दल पूर्ण माहिती बघूया. तर, या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची पात्रता निकष निश्चित करण्यात आले असून, सहायक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरीता अर्हता खालीलप्रमाणे राहील:-

(१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) किंवा महाराष्ट्र शासनाने एस.एस.सी. च्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता, आणि

(२) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) विषयातील किमान ३ वर्षाची पदविका वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

(३) स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) विषयातील मान्यता प्राप्त विदयापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेले वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता धारण केलेले उमेदवार देखील या पदासाठी पात्र राहतील. वयोमर्यादेचा विचार केला तर उमेदवाराचे वय किमान १९ वर्षे असावे आणि खुल्या प्रवर्गासाठी (General) परीक्षा शुल्क ₹५४४, तर आरक्षित प्रवर्गासाठी ₹३४४ फी आकारली जाणार आहे.

एमपीएससी AMVI २०२६ ची निवड प्रक्रिया प्रामुख्याने दोन टप्प्यांत पार पडेल – पूर्व परीक्षा (Prelims) आणि मुख्य परीक्षा (Mains). या वर्षीची पूर्व परीक्षा २७ सप्टेंबर २०२६ रोजी ऑनलाईन पद्धतीने संगणकावर (Computer-Based Test – CBT) घेतली जाणार आहे, ज्यामध्ये १०० गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना ३०० गुणांच्या मुख्य परीक्षेला बसावे लागेल, जी पूर्णपणे तांत्रिक (Technical) घटकांवर आधारित असेल. याशिवाय उमेदवारांना शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीच्या निकषांची देखील पूर्तता करावी लागेल. यशस्वी उमेदवारांना नियमांनुसार आकर्षक वेतन श्रेणी (S-14: ₹३८,६०० ते ₹१,२२,८०० + भत्ते) आणि आरटीओ विभागातील मानाची वर्दी मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.

या भरती संदर्भातील सविस्तर अभ्यासक्रम, शैक्षणिक पात्रता आणि परीक्षेच्या संपूर्ण रचनेबद्दल अधिक सखोल माहिती मिळवण्यासाठी तुम्ही हा MPSC AMVI २०२६ जाहिरात विश्लेषण व्हिडिओ पाहू शकता, ज्यामध्ये पात्रतेपासून ते अर्ज करण्याच्या रणनीतीपर्यंत सर्व मुद्दे सोप्या भाषेत स्पष्ट केले आहेत.

MPSC RTO AMVI 2026  Notification Highlights

Names Details
Conducting BodyMaharashtra Public Service Commission (MPSC)
Exam NameMPSC RTO Recruitment 2026
PostsRTO, AMVI, ASO, PSI, State Tax Inspector
DepartmentMaharashtra Transport Department
Total Vacancies461 Vacancies
Selection ProcessPrelims, Mains, Interview
Job TypeState Government Job
Application ModeOnline Application Forms
Official Websitempsc.gov.in

 

MPSC RTO AMVI Previous Year Cut Off (2024) 

CategoryCutoff Marks
General70–75
OBC65–70
SC55–60
ST45–50

MPSC RTO AMVI 2026 Preparation Tips

  • अभ्यासाचे प्रमाण: 60% Technical + 40% General Studies
  • मागील 5 वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवा
  • Mechanical/Automobile विषयातील सूत्रे व डायग्रामचा सराव करा
  • Marathi Language वर लक्ष द्या
  • नियमित Mock Tests द्या
  • चुकांची वही (Mistake Notebook) तयार ठेवा

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For mpsc.gov.in Group C Bharti  2026

📑 PDF जाहिरात  https://lnk.ua/DE2pZU65A
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/ocFTc
✅ अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड