४० हजार रुपये वेतन – नागपूर विद्यापीठ भरणार ९० कंत्राटी प्राध्यापक!! | RTMNU Nagpur Bharti 2025
RTMNU Nagpur Recruitment 2025
RTMNU Nagpur Bharti 2025
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पुन्हा कंत्राटी प्राध्यापकांच्या भरतीकडे वाटचाल करीत आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ९० पेक्षा अधिक कंत्राटी प्राध्यापकांची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. मंजूर झालेल्या ९२ नियमित प्राध्यापकांच्या जागा भरण्यास विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरल्याने ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. विद्यापीठात पस्तीसहून अधिक विभाग आणि तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. यापैकी बऱ्याच विभागांमध्ये तासिका तत्त्वावर कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. महत्त्वाचे म्हणजे, बऱ्याच विभागांमध्ये दहा ते पंधरा प्राध्यापक कंत्राटी म्हणून काम करताना दिसून येतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय आणि बॅरि. एस. के. वानखेडे शिक्षण महाविद्यालयात सर्वाधिक कंत्राटी प्राध्यापकांचा समावेश आहे. इतरही महाविद्यालयांत स्थिती सारखीच आहे. सत्रांत परीक्षा पद्धतीने दोन सत्रांसाठी प्राध्यापकांना नियुक्त करण्यात येते. या प्राध्यापकांना तासिकेप्रमाणेच वेतनही दिले जाते. मात्र, तासिका संपताच प्राध्यापक विभाग सोडून निघून जातात. विद्यापीठामध्ये ९२ प्राध्यापकांची पदे मंजूर झाली होती. मात्र, मधल्या काळात दिवंगत कुलगुरू डॉ. चौधरी निलंबित झाल्याने पदभरती रखडली. तर पुढे एलआयटी विद्यापीठामधून वेगळी झाल्याने प्राध्यापक भरतीच्या बिंदुनामावलीचा प्रश्न उपस्थित झाला. मात्र, वर्षभरापासून नियमित प्राध्यापकांची पदभरती करण्यास विद्यापीठ अकार्यक्षम ठरले. त्यामुळे पुन्हा एकदा कंत्राटी प्राध्यापकांची पदे भरण्याची वेळ आली आहे. कंत्राटी प्राध्यापकांना पूर्णवेळ काम आणि सहायक प्राध्यापकांचा दर्जा देण्यात येणार आहे. यामुळे प्राध्यापकांची विभाग आणि महाविद्यालयाप्रति जबाबदारी निश्चित करण्यात येईल. यासाठी त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याला ४० हजार रुपये वेतन दिले जाणार असल्याची माहिती आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
RTMNU Nagpur Bharti 2025
RTMNU Nagpur Bharti 2025: Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Applications are invited from candidates who are eligible according to the post vacancies of “Project Associate”. There are a total of 02 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can apply to the given mentioned address or through the online link before the last date. The last date for submission of application is 25th of June 2025. Interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 25th of June 2025. For more details on RTMNU Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत “प्रकल्प सहयोगी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०२५ आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख २५ जून २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा /मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, भौतिकशास्त्र विभाग, आरटी.एम. नागपूर विद्यापीठ परिसर, नागपूर-४४००३३
- मुलाखतीची तारीख – २५ जून २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://nagpuruniversity.ac.in/
How To Apply For RTMNU Nagpur Application 2025
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For RTMNU Nagpur Notification 2025
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता उपस्थित राहावे
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- मुलाखतीची तारीख २५ जून २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nagpuruniversity.ac.in Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/sFZgs |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://nagpuruniversity.ac.in/ |
Table of Contents
Walk-in Interviews
I want job on social work faculty base
I want Job on MSW base
मला जॉब ची फार गरज आहे