RTE लॉटरी, प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी आणि प्रवेशाचे वेळापत्रक बद्दल महत्वाचा अपडेट – RTE lottery result 2025
rte lottery result 2025 - 2026
सध्या RTE प्रवेशाचे वारे महाराष्ट्रात सुरु आहे. आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा या साठी पालकांची धावपळ सुरु आहे. या अंर्तगत, शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत रविवारी संपली. या मुदतीत ३ लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले असून, आता अर्ज प्रवेशासाठी सोडत काढण्यात येणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठीची मुदत संपली आहे. या प्रक्रियेत साधारणपणे दरवर्षीइतकेच अर्ज आले आहेत. आता प्रवेशासाठीची सोडत काढून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी आणि प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. या बद्दल पूर्ण माहिती आम्ही येथे महाभरतीवर प्रकाशित करत राहू.
RTE संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार रविवारी सायंकाळपर्यंत ३ लाख ३ हजार १३८ अर्ज दाखल झाले होते. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतो. यंदा राज्यभरातील ७ हजार ८६३ शाळांमध्ये प्रवेशासाठी १ लाख ९ हजार १११ जागा उपलब्ध आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी १४ ते २७ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच पुन्हा मुुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. आरटीई प्रवेश प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठीची मुदत संपली आहे. या प्रक्रियेत साधारणपणे दरवर्षीइतकेच अर्ज आले आहेत. आता प्रवेशासाठीची सोडत काढून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी आणि प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.