2022 वर्षाच्या RTE प्रवेशांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
RTE Exam Time Table
RTE Admission 2022 Provisional Timetable
RTE Exam Time Table : The re-examination of RTE schools in the state will start from December 28. The inspection will continue till January 17, after which the schools and admission places available in the state for RTE admissions will be announced. Further details are as follows:-
येत्या २८ डिसेंबरपासून राज्यातील ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळांची पुनर्तपासणी सुरू होणार आहे. १७ जानेवारी पर्यंत तपासणी सुरू राहणार असून, त्यानंतर ‘आरटीई’ प्रवेशांसाठी राज्यात उपलब्ध शाळा आणि प्रवेशांच्या जागा जाहीर करण्यात येतील. ‘शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत (RTE) देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांचे २०२२-२३ या वर्षासाठीचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने गुरुवारी जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार २८ डिसेंबर ते नऊ मे दरम्यान ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
१ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान, पालकांना ‘आरटीई’ प्रवेशांसाठी अर्ज करता येणार आहेत. आठ किंवा नऊ मार्चला ‘आरटीई’ प्रवेशांची सोडत निघणार असून, त्यानंतर प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होईल, असे संभाव्य वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे. ‘आरटीई’च्या सोडतीत नाव लागलेल्या पालकांना १० मार्च ते ३१ मार्च दरम्यान शाळांमध्ये जाऊन मूळ कागदपत्रे सादर करून प्रवेशनिश्चिती करता येईल. एक एप्रिलपासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशफेऱ्या सुरू होणार आहेत.
The education department intends to complete the RTE admission process in May, given this year’s possible schedule. However, considering the RTE admission process for the academic year 2021-22, the question has arisen as to whether it will be completed within the probable time frame announced by the education department. Like last year, RTE admissions will be announced only once and the selection list and waiting list will be the same as the number of vacancies in schools, the education department said.
RTE Admission 2022 Provisional Timetable
- प्रवेशांच्या जागांची पुनर्तपासणी – २८ डिसेंबर २०२१ ते १७ जानेवारी २०२२
- ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत – 1 फेब्रुवारी २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२२
- आरटीई प्रवेशांसाठी सोडत – आठ किंवा नऊ मार्च २०२२
- प्रवेश निश्चित करण्याची मुदत – १० मार्च ते ३१ मार्च २०२२
- प्रतीक्षा यादीतील पहिली प्रवेश फेरी – 1 एप्रिल ते ७ एप्रिल २०२२
- प्रतीक्षा यादीतील दुसरी प्रवेश फेरी – ११ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२
- प्रतीक्षा यादीतील तिसरी प्रवेश फेरी – २५ एप्रिल ते २९ एप्रिल २०२२
- प्रतीक्षा यादीतील चौथी प्रवेश फेरी – 2 मे ते ९ मे २०२२
आरटीई अंतर्गत देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. २८ डिसेंबर पासून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करत आहोत. राज्यातील पालकांनी याची नोंद घ्यावी.
– वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री.
RTE Exam Time Table : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील ९ हजार ३९३ शाळांमधील ९६ हजार ३८८ जागांच्या प्रवेशाचे वेळापत्रक येत्या दोन ते तीन दिवसांत प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र तयार ठेवावीत, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यातही शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आरटीई प्रवेशाच्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित होते. यंदा कोरोनामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी आरटीईच्या प्रवेश क्षमतेत घट झाल्याचे दिसून येत आहे. सध्या ९ हजार ३९३ शाळांनी नोंदणी केली असली तरी सुमारे ५० शाळांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. त्यामुळे आरटीईच्या एकूण जागांमध्ये वाढ होऊ शकते.
राज्यात आरटीईचे सर्वाधिक प्रवेश पुणे जिल्ह्यात होतात. मागील वर्षी जिल्ह्यात आरटीईच्या १६ हजार ९५० जागांवर उपलब्ध होत्या. यंदा जिल्ह्यातील जागांची संख्या १४ हजार ५२३ झाली आहे. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेश क्षमतेत घट झाली आहे. जिल्ह्यातील ९६९ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करून पूर्ण करावी, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू असून ऑनलाइन अर्ज भरून त्याची चाचणी घेतली जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
Table of Contents