RTE प्रवेश २०२०-२०२१- पालकांनी काळजी करू नये


RTE Admission 2020 – 2021 –  RTE प्रवेशाची पहिली सोडत काही दिवसांपूर्वी निघाली. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होणे अपेक्षित होते. परंतु लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया ठप्प झाली. परिणामी प्रवेशाचा पुढील टप्पा कधी पुर्ण होणार आणि विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित कधी होणार, अशा संभ्रमात सध्या पालक आहेत.

या प्रवेश प्रक्रियांत पुढील पॉल कधी उचलले जाणार असा प्रश्न पालकांना पडला आहे. सध्या लॉकडाऊन मुळे सर्व प्रक्रिया थांबल्या आहेत. त्यामुळे सध्या पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशाची चिंता सतावत आहे.

तसेच सध्या राउंड १ झाला असला तरी पुढील राउंड कधी होणार आणि त्याची सोडत कधी राहील इत्यादी प्रश्न सध्या पालकांना सतावत आहेत. परंतु प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालकांनी सांगितले आहे कि, पालकांनी काळजी करू नये, लॉक डाऊन नंतर प्रवेश प्रक्रिया  सुरळीतपणे सुरु होणार आहे.

25 टक्के आरक्षणानुसार प्रवेशाची सद्यस्थिती :
जिल्हा : शाळा : राखीव जागा : आलेले अर्ज : पहिल्या सोडतीत निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

  • पुणे : 972 : 16,949 : 62,919 : 16,617
  • नगर : 396 : 3,541 : 7,065 : 3,382
  • औरंगाबाद : 584 : 5,073 : 16,587 : 4,914
  • नाशिक : 447 : 5,557 : 17,630 : 5,307

 

“”पालकांनी आरटीई 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाबाबत निश्‍चित रहावे. लॉकडाऊन संपल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरळीत होणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही आरोग्याच्या दृष्टीने आवश्‍यक ती काळजी घेऊनच प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरू करण्यात येईल.”
– दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण विभाग1 Comment
  1. Shubhagi says

    Rte 1st la kiti age complete pahije?

Leave A Reply

Your email address will not be published.