RTE प्रवेशांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!
RTE Admission 2020-2021
RTE Admission 2020-2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्यामुळे आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला खीळ बसली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ३१ आॅगस्टपर्यंत मुदत देऊनही आरटीईअंतर्गत अपेक्षित प्रवेश होऊ न शकल्याने आता प्रवेशनिश्चितीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ म्हणजे आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यंदा प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज मागवून १७ मार्च रोजी लॉटरी काढण्यात आली. दरम्यान, राज्यात आरटीईच्या ९,३३१ शाळांमध्ये एकूण १ लाख १५ हजार ४६० जागा असून, त्यापैकी आतापर्यंत केवळ ५३,६८७ जागांवर प्रवेश निश्चित होऊ शकले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थी-पालकांसह मूळ गावी स्थलांतरित झाल्यामुळे प्रवेशनिश्चितीसाठी ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुदतवाढीचा निर्णय घेतल्याची महिती आरटीई समन्वयकांनी दिली. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मात्र, यामुळे प्रवेशासाठी आणखी ताटकळत बसावे लागेल.
असे होतील प्रवेश
शाळांनी दिलेल्या तारखांनुसार शाळेत गर्दी होणार नाही, याची काळजी घेऊन पालकांनी विद्यार्थ्यांची प्रवेशनिश्चिती करायची आहे. प्रत्यक्ष शाळेत जाणे शक्य नसल्यास आवश्यक कागदपत्रे व्हॉट्सअॅप आणि ई-मेलद्वारे शाळांना पाठवून तात्पुरते प्रवेश घेण्याची मुभा आहे. ज्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली नाही, त्या पालकांशी संपर्क साधून प्रवेशनिश्चिती करण्यास सांगण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने 31 ऑगस्ट ही मुदत निश्चित केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये शाळा मिळाली आहे, त्यांच्या पालकांना या तारखेपर्यंत शाळेत प्रवेश घ्यायचा आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी यासंबंधी म्हटले आहे, की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रीया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत 17 मार्च रोजी काढण्यात आली असून, ज्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत लॉटरी लागली आहे. त्यांनी दिनांक 31 ऑगस्टपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे.
“प्रवेशासाठी निश्चित केलेल्या मुदतीनंतर लॉटरी लागलेल्या कोणत्याही बालकास प्रवेश दिला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. 31 ऑगस्टनंतर वेटिंग लिस्ट मधील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करू नये. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे, त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रति घेऊन संबंधित शाळेत 31 ऑगस्टपूर्वी जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा,” असे जगताप म्हणाले.
पालकांना शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे शक्य नसल्यास ई-मेलद्वारे, कागदपत्रे शाळेस पाठवून तसेच दूरध्वनीद्वारे शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करुन पालकांनी प्रवेश निश्चित करावा. तसेच शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे, त्यातील शाळेत प्रवेशासाठी अद्याप न आलेल्या बालकांच्या पालकांना दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे संपर्क करुन त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही मुदतीत पूर्ण करण्यात यावी, असे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
RTE Admission 2020 – 2021 – आपणास माहीतच आहे शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार शाळांमध्ये 25 टक्के प्रवेशासाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मार्गदर्शक सूचना काढल्या आहेत. आताच प्राप्त बातमी नुसार दोन ते तीन दिवसांत आरटीई प्रवेशाला राज्यात सुरुवात होणार आहे. निवड झालेल्या राज्यातील 1 लाख 920 विद्यार्थ्यांपैकी 17 मार्चला काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये 75 हजार 465 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाचे संदेश पाठविण्यात आले होते.
राज्यभरात फेब्रुवारी महिन्यापासून आरटीईसाठी नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. प्रवेशासाठी राज्यातून 1 लाख 920 पाल्यांची निवड केली. तरीही 75 हजार 465 पाल्य प्रतीक्षा यादीत आहेत. नागपूरमधून 6 हजार 784 जागांसाठी 31 हजार 44 पालकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 6 हजार 685 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 17 मार्चला सोडत निघाल्यावर 21 मार्चपासून देशभरात टाळेबंदी जाहीर झाली. तेव्हापासून आरटीईच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे सोडतीत नाव आलेल्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
दुसरीकडे सीबीएसई आणि काही नामवंत खासगी इंग्रजी शाळांमार्फत पालकांना संदेश पाठवून प्रवेशाचा हप्ता भरण्याची सूचना केली आहे. या प्रकाराने नेमका कुठे प्रवेश घ्यायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे पालक दुहेरी पेचात आहे. आज, राज्य सरकारने यावर निर्णय घेत, सूचना जाहीर केल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.
प्रवेश प्रतिबंध हटल्यावरच
राज्यात आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मात्र, राज्यातील ज्या शहरांतील वस्त्या कोरोनामुळे प्रभावित झाल्या आहेत, त्या क्षेत्रातील शाळांमध्ये प्रतिबंद हटल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नसल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
१७ मे २०२० – RTE प्रवेशाची पहिली सोडत काही दिवसांपूर्वी निघाली. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होणे अपेक्षित होते. परंतु लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया ठप्प झाली. परिणामी प्रवेशाचा पुढील टप्पा कधी पुर्ण होणार आणि विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित कधी होणार, अशा संभ्रमात सध्या पालक आहेत.
या प्रवेश प्रक्रियांत पुढील पॉल कधी उचलले जाणार असा प्रश्न पालकांना पडला आहे. सध्या लॉकडाऊन मुळे सर्व प्रक्रिया थांबल्या आहेत. त्यामुळे सध्या पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशाची चिंता सतावत आहे.
तसेच सध्या राउंड १ झाला असला तरी पुढील राउंड कधी होणार आणि त्याची सोडत कधी राहील इत्यादी प्रश्न सध्या पालकांना सतावत आहेत. परंतु प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालकांनी सांगितले आहे कि, पालकांनी काळजी करू नये, लॉक डाऊन नंतर प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे सुरु होणार आहे.
25 टक्के आरक्षणानुसार प्रवेशाची सद्यस्थिती :
जिल्हा : शाळा : राखीव जागा : आलेले अर्ज : पहिल्या सोडतीत निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
- पुणे : 972 : 16,949 : 62,919 : 16,617
- नगर : 396 : 3,541 : 7,065 : 3,382
- औरंगाबाद : 584 : 5,073 : 16,587 : 4,914
- नाशिक : 447 : 5,557 : 17,630 : 5,307
“”पालकांनी आरटीई 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाबाबत निश्चित रहावे. लॉकडाऊन संपल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरळीत होणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेऊनच प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरू करण्यात येईल.”
– दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण विभाग
How to apply RTE online application admission?
माजा मुलाचा कागज़ पत्र पडतालनी च्या वेलेस फार्म बाद केला, नम्बर लगलेला होता, तरी पण, कागज़ पूर्ण खरे होते,
2021 – 2022 sathi online form kadhi start honar plz reply
सध्याचा पत्ता शाळेपासून लांब असल्याकारणाने माझ्या मुलाचा ज्युनियर केजीचा RTE फॉर्मच रिजेक्ट केला. आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यास या कायद्यानुसार बालकांना सक्तीचे शिक्षण कसे देणार? करोणामुळे ज्यांच्या नोकऱ्या गेल्यात त्यांच्या बालकांनी आता कसं शिकायचं? सरकारने याबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.
Rte 1st la kiti age complete pahije?