केंद्रातील चार लाख रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु
Recruitment process for vacancies in the Center
केंद्रातील चार लाख रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु
गेल्या १ मार्चपर्यंत केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये विविध प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची सुमारे सात लाख पदे रिक्त होती. त्यापैकी सुमारे चार लाख पदे भरण्यासाठी सध्या भरती प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती सरकारतर्फे गुरुवारी राज्यसभेत देण्यात आली. एकूण सहा लाख ८३ हजार ८२३ रिक्त पदांपैकी पाच लाख ७४ हजार २८९ पदे ‘क’ वर्गातील, ८९,६३८ ‘ब’ वर्गातील व १९, ८९६ ‘अ’ वर्गातील आहेत असे कार्मिक विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांनी लेखी उत्तरात सांगितले. विविध खात्यांनी त्यांच्याकडील रिक्त पदांच्या दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) यंदाच्या आर्थिक वर्षात एक लाख पाच हजार ३३८ पदे भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
रेल्वे खात्यात नव्याने रिक्त झालेल्या व पुढील दोन वर्षात रिक्त होणाऱ्या वर्ग ‘क’ आणि श्रेणी – १ च्या एक लाख २७ हजार ५७३ पदांसाठी रेल्वे भरती मंडळांनी एकत्रित अधिसूचना २०१७-१८ मध्ये जरी केल्या तसेच याच वर्ग व श्रेणीतील आणखी एक लाख ५६ हजार १३८ पदांसाठी वर्ष २०१८-१९ मध्ये पाच एकत्रित भरती अधिसूचना काढण्यात आल्या. टपाल खात्यानेही ‘एसएससी’ खेरीज अन्य मार्गांनी भरण्याच्या १९,५२२ रिक्त पदांसाठी जाहिराती देऊन परीक्षा घेतल्या. अशा प्रकारे चार लाख आठ हजार ५९१ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे, असेही जितेंद्र सिंग यांनी सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ते म्हणाले की, भरती प्रक्रियेला लागणारा वेळ कमी करण्यासाठी देशात ठराविक केंद्रांवर संगणकांवर ऑनलाईन लेखी परीक्षा घेण्यात येत आहेत. अराजपत्रित पदांवरील भरतीसाठी उमेदवारांच्या तोंडी मुलाखती जानेवारी २०१६ पासून बंद केल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना, पार्श्वभूमी तपासणीच्या अधीन राहून हंगामी नियुक्तीपत्रे दिली जात आहेत.
सोर्स : लोकमत