वयोमर्यादेची अडचण आलेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये संधी

Recruitment of Teacher will be done by end of April


Maharashtra Shikshak Bharti 2020  – Pavitra Portal Shikshka Bharti 2020 – Maharashtra Shikshak Bharti Updates for 2020 are declared here. The updates & Details about Shishak Bharti will be updated on this page. As per the latest News Shikshka Bharti is on hold due to Corona effect. But Large number candidates are waiting for this Shikshka Bharti Online registrations process 2020.

वयोमर्यादेची अडचण आलेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये संधी

९ सप्टेंबर २०२० अपडेट – पवित्र संकेतस्थळाद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीसाठी खासगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी वयोमर्यादा लागू करण्यात आलेली होती. त्यामुळे वय जास्त असलेल्या अनेक उमेदवारांना मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत. मात्र, आता महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम भरून देण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम निश्चित न केलेल्या, आता नव्याने प्राधान्यक्रम देणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या समांतर आरक्षणाची (उदा. महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ) नोंद एकदाच करता येईल. त्यामुळे समांतर आरक्षणामध्ये दुरुस्ती करता येणार नसल्याने उमेदवारांनी समांतर आरक्षणविषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. जून २०१९ मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम निश्चित केलेल्या उमेदवारांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांना लॉगिन उपलब्ध होणार नसल्याची माहिती शिक्षण विभागाने पवित्र संके तस्थळाद्वारे दिली आहे.


२५ ऑगस्ट २०२० अपडेट – शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीसाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार पवित्र संके तस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरती करण्यासाठी प्राधान्यक्रम भरून निश्चित करण्याची संधी दिली असून, येत्या ३१ ऑगस्टपर्यंत संबंधित उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम नोंदवता येणार असल्याचे पवित्र पोर्टलवर स्पष्ट करण्यात आले.

पवित्र संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनांनुसार, ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्याने काही उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता आलेले नाहीत. मात्र आता खाजगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण श्रेणी आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देता येणार आहेत. अकरावी, बारावीत ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत. परंतु असे उमेदवारांना पदव्युतर पदवीला किमान द्वितीय श्रेणी असेल आणि त्याची नोंद पवित्र संकेतस्थळावर केली असल्यास त्यांना प्राधान्यक्रम देता येणार आहेत. नववी, दहावी या गटातील माध्यमिक पदासाठी पदवीस्तरावर उत्तीर्ण; पण ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्याने प्राधान्यक्रम देता न आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देता येतील. वयाच्या नियमामुळे प्राधान्यक्रम देऊ न शकलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम नोंद केल्यानंतर भरता येतील. उमेदवारांना समांतर आरक्षणाची नोंद एकदाच करता येणार आहे. जून २०१९ पूर्वी मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम निश्चित के लेल्या उमेदवारांनी नव्याने प्राधान्यक्रम देण्याची गरज नाही. त्यांना लॉगिन उपलब्ध होणार नसल्याची सूचना पवित्र संके तस्थळावर देण्यात आली आहे.

दरम्यान पवित्र संकेतस्थळावर प्रशासकीय सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र भरती प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. आता तरी शिक्षण विभागाने तातडीने भरती प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही करावी अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आली आहे.

Shikshka Bharti 2020
Shikshka Bharti 2020

करोनाच्या लॉकडाऊनचा परिणाम मुलाखतीशिवाय शिक्षक भरती प्रक्रियेवर झाला आहे.आता ही प्रक्रिया एप्रिलनंतर होईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठीचे पवित्र पोर्टल रद्द करावे व शाळांना शिक्षक भरतीचे स्वातंत्र्य द्यावे, असा आग्रह राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शासनाकडे धरला आहे. प्रलंबित प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे.

As you know, Shikshak Bharti 2020 is expected for 10,001 Posts in all the districts of Maharashtra. All the vacancies are classified by different management authorities. We have given all the distribution of Vacancies by their Management.

Shikshak Bharti 2020 – 2021 Vacancy Details 

ManagementNo. of SansthaGrand Total
Zilla Parishad Schools 255152
Municipal Corporation Schools 11563
Nagar Palika Schools 52261
Private Aided – Primary125261
Private Aided – Secondary6123764
TOTAL10,001

 

Maharashtra Shikshak Bharti 2020 Details 

Department Name
Education Department, Maharashtra
Recruitment Name
Teachers Recruitment
Name of PostsShikshak (Teacher)
Total Vacancies10,001
Application ModeOnline
Official Websitemaharashtra.gov.in

Eligibility Criteria For Maha Shikshak Bharti

Educational QualificationD.Ed / B.Ed
Age Limit18 to 43 Years

Vacancy Details

Shikshak (Teacher)10,001

 

Shikshak Bharti 2020 – राज्यात पवित्र पोर्टल मार्फत गेल्या तीन वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. दहा वर्षानंतर होत असलेल्या या भरती प्रक्रियेची डीटीएड, बीएड पदविका, पदवीधारक बेरोजगारांना प्रतीक्षा आहे. मात्र, विविध टप्प्यावर ही प्रक्रिया अडखळली. त्यात आता करोनाच्या प्रादुर्भावाने केलेल्या लॉकडाऊनमुळे ही भरती थांबवण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर म्हटले आहे. त्यात असे म्हटले आहे की, मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पद भरती करोनामुळे सध्या बंद असून, ३१ मार्च दरम्यान परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल. शिक्षक भरती प्रक्रियेत तत्कालीन सरकारने राज्यातल्या २४ हजार जागा भरण्यात येतील असे सांगितले होते. प्रत्यक्षात पाच हजार ते सहा हजार जागाच भरण्याची प्रक्रिया झाली. त्यामध्येही शासकीय पातळीवरच्या संस्थांमधीलच शिक्षक भरती प्रक्रिया झाली. खासगी संस्थांवरील भरतीची प्रक्रिया कधी आणि केव्हा होणार, असा प्रश्‍न अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना पडला आहे. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६० हजारपेक्षा अधिक आहे तर, अभियोग्यता चाचणी यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दीड लाखांपेक्षा अधिक आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी भरतीची प्रक्रिया होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अशा करण्यात आल्या सूचना

पवित्र प्रणाली मार्फत मुलाखतीशिवाय पदभरतीच्या नऊ ऑगस्टच्या प्रसिद्ध केलेल्या यादीनंतर विषयनिहाय, प्रवर्गनिहाय रिक्त राहिलेली पदे, गैरहजर उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे, उमेदवार अपात्र ठरल्यामुळे रिक्त राहिलेल्या पदासाठीची निवड प्रक्रिया प्रथम करण्यात येणार आहे. ही कार्यवाही मुलाखतीसाठीची यादी जाहीर करण्यापूर्वी करण्यात येणार आहे. मुलाखतीसह पद भरतीमध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या उमेदवारांना ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत, त्यांना एमईपीएसच्या नियमानुसार खासगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम द्यावयाचे आहेत.

ज्या उमेदवारांना यापूर्वी अकरावी, बारावीच्या गटांसाठी ५० टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत, परंतु असे उमेदवार पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असतील त्यांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम घेण्यात येणार आहेत.

नववी, दहावी या गटातील पदासाठी पदवी स्तरावर उत्तीर्ण परंतु ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत, अशा उमेदवाराकडून मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत. खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आली होती. त्यामुळे कमाल वय या कारणास्तव ज्या उमेदवारांना मुलाखतीसह पद भरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत, त्यांना महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१मधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे.

काळजीपूर्वक नोंद गरजेची

या उमेदवारांनी यापूर्वी मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले नाहीत व आता नव्याने मुलाखतीसह पदांचे प्राधान्यक्रम देणार आहेत, त्यांना त्यांच्या समांतर आरक्षणाची नोंद एकदाच करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकदा माहिती सेव्ह केल्यानंतर पुन्हा समांतर आरक्षण दुरुस्त करण्याची सुविधा दिली नसल्याने अशा उमेदवारांनी समांतर आरक्षण विषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करावी. एकदा माहिती नोंद करून सेव्ह करून येणाऱ्या फॉर्मसमोर ओकेवर क्लिक केल्यानंतर पुन्हा माहितीमध्ये बदल करता येणार नाही. ज्या उमेदवारांनी यापूर्वी जून २०१९मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत, त्यांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही.



13 Comments
  1. Priyanka yogesh jagtap says

    Pavitra portal shikshak bharticha form kothe bharaycha ani kasa??

    1. MahaBharti says

      Sadhyna Navin arj prakriya suru vhychi aahe, suru zalyavr aamhi Update prakashit karuch…

      Thanks.. Keep Visiting http://www.MahaBharti.in

  2. Mira pawar says

    Keva form application date yenar

  3. Nalini deshmukh says

    Sir ded jhale le parat application karu shaktil ka tet pass napass at nahi na fakt ded ..bed ch pahije ka sir please mala sanga sir

  4. Megharaj says

    When will be next TET exam will be held .plz guide us and reply should b given us..and how can govt arrange the tet ?reply plz

  5. रायबा गावंडा says

    अहो 71/ आहेत तरी घरीच बसलो आहोत हिंदी माध्यमातून

  6. Rupali says

    D.ed zhale ahe tari tet avashyak ahe ka.plz tell me

  7. रामचंद्र सूर्याजी मालुसारे says

    Bped भर्ती आहे का

  8. Virdhaval nandu shinde says

    Sir mala CTET la 53 Mark ahe mi pavitra portla form bharu shakto ka

  9. Ujwala pawar says

    I have completed my post graduation in commerce can i apply for this post.

  10. Sonali says

    Tet pass napas sagle pavitr portal vr form bharu shaktat ka

  11. अमोल सुखदेव जाधव says

    सर मला ctet ला 81 मार्क आहेत

  12. Supriya patil says

    Tet pass asel tarch ha form bharaycha aahe ka sir please sanga

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड