BEd प्रवेशात विक्रमी नोंदणी, लाखो उमेदवारांनी भरले अर्ज, पूर्ण माहिती बघा! – Record Enrollment in B.Ed Admissions!

Record Enrollment in B.Ed Admissions!

सध्या राज्यात BEd नोंदणी सुरु होती. याला पूर्ण महाराष्ट्रातून भरपूर उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील बीएड (सामान्य व विशेष), बीएड-एमएड, एमएड आणि एमपीएड या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्राशी संबंधित पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेस विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यंदा बीएड अभ्यासक्रमासाठी १ लाख १६ हजार ५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले असून, मागील पाच वर्षांतील ही सर्वाधिक नोंदणी आहे. बीएड अभ्यासक्रम आणि प्रवेश आता राष्ट्रीय स्तरावर, राज्य CET चे पैसे मिळणार परत.

Record Enrollment in B.Ed Admissions!

विद्यार्थ्यांना मिळाली संधी
या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी होती. मात्र, काही विद्यार्थ्यांचे अर्ज अर्धवट राहिल्याने आणि अनेकांनी शुल्क न भरल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ५ मार्चपर्यंत संधी दिली होती. या संधीचा फायदा घेत अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रियेची पूर्तता केली आहे. २४ मार्च रोजी बीएड प्रवेश परीक्षा होणार आहे, तर इतर अभ्यासक्रमांसाठी १९ व २८ मार्च रोजी परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बीएड-एमएड आणि एमएड प्रवेशासाठीही चांगला प्रतिसाद
बीएड-एमएड अभ्यासक्रमासाठी १ हजार १३० विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून, गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या काही प्रमाणात वाढली आहे. एमएड अभ्यासक्रमासाठी यंदा ३ हजार ८०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, जी मागील वर्षीपेक्षा ९०० अधिक आहे.

एमपीएड प्रवेश प्रक्रियेत घट
शारीरिक शिक्षणाशी संबंधित एमपीएड अभ्यासक्रमासाठी यंदा २ हजार ३८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले, मात्र ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत किंचित घटली आहे. तरीही, या परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्याने प्रवेशासाठी मोठी चुरस निर्माण होणार आहे.

अभ्यासक्रमानुसार अर्ज नोंदणी (२०२५-२६ साठी)

  • बीएड – १,१६,५००
  • बीएड-एमएड – १,१३०
  • एमएड – ३,८००
  • एमपीएड – २,३८४

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड