अग्निशामक विभागात प्रशिक्षित जवानांची भरती करण्याची मागणी! – Ratnagiri Fire Department Bharti
Ratnagiri Fire department Bharti
शहरात टोलेजंग इमारती वाढत आहेत; मात्र रस्ते अरूंद आहेत. अशा ठिकाणी आग किंवा अन्य दुर्घटना घडल्यास तिथे अग्निशामक वाहने आणि जवान पोहोचणे कठीण जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरात प्रशिक्षित जवानांची तत्काळ भरती करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल (Ratnagiri Fire Department Bharti), असा इशारा भाजपच्या नगरसेवकांनी आज नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला. भाजपचे माजी नगरसेवक राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, समीर तिवरेकर, माजी स्वीकृत नगरसेवक उमेश कुळकर्णी, माजी नगरसेविका प्रणाली रायकर, सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर, माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी आज नगरपालिकेच्या उपमुख्याधिकारी चाळके यांची भेट घेतली आणि या संदर्भातील निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिकेच्या अग्निशमन दलात प्रशिक्षित जवान फारच कमी आहेत. शहरात मोठमोठ्या इमारती विकसित होत आहेत. अशावेळी अग्निशमन जवानांची संख्या कमी असणे धोकादायक आहे. त्यामुळे येथे प्रशिक्षित जवानांची भरती न केल्यास आंदोलन केले जाईल. रत्नागिरी नगरपालिकेची अग्निशमन दलाची इमारत पूर्ण झाली आहे. दोन अद्ययावत अग्निशामक आणि दोन अग्निशामक बुलेट उपलब्ध आहेत. इतकी सर्व यंत्रणा असतानाही केवळ दोन जवान कार्यरत आहेत. त्याचबरोबर एकच अग्निशामक चालक कायमस्वरूपी आहे. ही परिस्थिती विकसित होत जाणाऱ्या शहराला धोकादायक असल्याचे उपमुख्याधिकाऱ्यांना भाजप माजी नगरसेवकांनी सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अपेक्षित निर्णय न झाल्यास आंदोलन
रत्नागिरी शहरातील एखाद्या इमारतीत आग लागण्याची दुर्घटना घडल्यास आणि अग्निशामक चालक आयत्यावेळी उपलब्ध न झाल्यास मोठा अनर्थ घडण्याची भीती आहे. अशावेळी तातडीने अग्निशामक जवान भरती करावी. पुढील पंधरा दिवसात या संदर्भात अपेक्षित निर्णय न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.