दहावी पास झालेल्यांसाठी ६,८९१ पदांची भरती – परीक्षा, मुलाखत शिवाय थेट रेल्वेत नोकरी – Railway Bharti 2021 10th Pass

Railway Bharti 2021 10th Pass

Railway Bharti 2021 10th Pass – Indian Railway Bharti for SSC, 10th Pass Candidates advertisement is published. As per this new advertisements candidates can directly apply for this recruitment process. This is direct Recruitment for 10th Pass Candidates. This Rail Bharti is the golden opportunity for the candidates. More Details & Application process details are given below.

सध्या तरुणांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. प्राप्त माहिती नुसार, रेल्वे रिक्रूटमेंट सेलने अप्रेंटिसच्या विविध विभागासाठी एकूण ६ हजार ८९१ पदांसाठी नोकर भरती काढली आहे. ज्यात वेगवेगळ्या ट्रेड्सच्या जागा भरल्या जाणार आहेत.

लिंक उपलब्ध – 10 वी उत्तीर्णांना संधी – पूर्व रेल्वे अंतर्गत 3,366 पदांची भरती सुरु

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या पदांसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराकडे कुठल्याही मान्यता प्राप्त बोर्डाच्या शाळेतून १० वी पास प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. त्याचसोबत उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील ITI  प्रमाणपत्र असावं. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी १०० रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावं लागणार आहे. या पदांसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचे वय १५ ते २४ या वयोगटातील हवे. योग्य उमेदवाराला कुठल्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही.

उमेदवाराची निवड १० वी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या निवडीची मेरिट लिस्ट लावली जाईल. रेल्वे अप्रेंटिस भरती २०२१ च्या माध्यमातून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत विविध ट्रेड्ससाठी ४३२ जागा भरल्या जातील. तर ईस्टर्न रेल्वेत ३ हजार ३६६ तर उत्तर रेल्वेत ३ हजार ९३ जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. सर्व भरती ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. ज्यात ४३२ पदांसाठी १० ऑक्टोबर, ३ हजार ९३ पदांसाठी २० ऑक्टोबर २०२१, तर ३ हजार ३६६ पदांसाठी ३ नोव्हेंबर २०२१ या अंतिम तारखेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी रेल्वे भरतीच्या अधिक माहितीसाठी apprenticeshipindia.org या वेबसाईटवर भेट देऊन जाहिरात पाहू शकता आणि ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. निवडलेल्या उमेदवाराला अप्रेंटिसशिपच्या काळात सॅलरी, स्टाइपेंड देण्यात येईल. उमेदवार अन्य माहितीसाठी नोटिफिकेशन पाहू शकतात. त्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करावं.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड