JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘कॅरी ऑन’ वादात ७५१ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दिलासा; उच्च न्यायालयाची परीक्षेला बसण्याची परवानगी | Pune University Exam Time Table

Pune University Update

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या तृतीय आणि चतुर्थ वर्षांच्या मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या परीक्षांसाठी ७५१ विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने सोमवारी या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची अंतरिम परवानगी दिली. मात्र, ‘कॅरी ऑन’ पद्धतीच्या वैधतेचा अंतिम निर्णय प्रलंबित याचिकेवरील निकालावर अवलंबून राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

राज्य सरकारने १० फेब्रुवारी २०२५ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आणि त्याअनुषंगाने विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकाद्वारे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ‘कॅरी ऑन’ धोरण पुन्हा लागू करण्यात आले होते. या धोरणानुसार मागील वर्षातील काही विषय प्रलंबित असतानाही विद्यार्थ्यांना विशिष्ट अटींवर पुढील शैक्षणिक वर्षात तात्पुरता प्रवेश देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, या निर्णयामुळे शैक्षणिक गुणवत्ता घसरत असल्याचा दावा करत काही याचिकाकर्त्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांनी यापूर्वी काही विद्यार्थ्यांना सशर्त दिलासा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी वकील पूजा थोरात यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती. न्या. गौतम अंखड आणि न्या. संदेश पाटील यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा देण्यात आला.

विद्यार्थ्यांनी २०१५ च्या धोरणानुसार उच्च वर्गात तात्पुरते प्रवेश घेतल्यानंतर मागील विषय उत्तीर्ण केल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच ‘कॅरी ऑन’ पद्धतीच्या वैधतेसंदर्भातील अंतिम सुनावणी प्रलंबित असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या भूमिकेतून न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने विद्यापीठाला २० मेपासून सुरू होणाऱ्या तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या परीक्षांसाठी संबंधित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारून त्यांना परीक्षेला बसू द्यावे, असे निर्देश दिले आहेत.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Pune University Exam Time Table Update

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हिवाळी सत्राच्या परीक्षांतील २८ आणि २९ जानेवारी रोजीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या दोन दिवशीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी या बाबतची माहिती दिली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी अपघाती निधन झाले.त्यामुळे राज्य सरकारने बुधवारी शासकीय सुटी जाहीर केली. परिणामी, विद्यापीठाकडून विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील बुधवारच्या (२८ जानेवारी) दुपारच्या सत्रातील परीक्षांच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार या सत्रातीलपरीक्षांचे पुर्नआयोजन करण्यात येणार असून, त्याचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी (२९ जानेवारी) अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने बारामती तालुक्यातील बहुतेक शिक्षण संस्था बंद राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातून बारामतीकडे जनसमुदाय येणार असल्याची बाब लक्षात घेऊन विद्यापीठाच्या गुरुवारी दिवसभरातील दोन्ही त्रातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. संबंधित दोन्ही सत्रांतील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे फेरआयोजन करण्यात येणार आहे. त्याचे वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.


Pune University Exam Time Table Update

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने सर्व आकृषी विद्यापीठांना परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १ ते ३ डिसेंबर या कालावधीतील परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच बदललेल्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी याबाबतची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.

राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून येत्या दोन डिसेंबर रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या आधी एक दिवस व मतदानानंतर एक दिवस निवडणुकीच्या कामामध्ये कर्मचारी व महाविद्यालये यांना इतर कामे करणे शक्य होत नाही. त्यामुळे एक ते तीन डिसेंबर हा कालावधी वगळून परीक्षा घ्याव्यात, अशा सूचना राज्याचे शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सर्व अकृषी विद्यापीठांना दिल्या आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परिपत्रक प्रसिद्ध करून १ डिसेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीतील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
बदललेल्या वेळापत्रकानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रथम वर्ष एलएलएम अभ्यासक्रमाचा ३ डिसेंबर रोजीचा पेपर १२ डिसेंबर रोजी घेतला जाणार आहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमाचा १ डिसेंबरचा पेपर ४ डिसेंबरला व २ डिसेंबरचा पेपर ५ डिसेंबरला घेण्यात येणार आहे. प्रथम वर्ष इंजिनियरिंग २०१९ पॅटर्नचा ३ डिसेंबरचा पेपर १३ डिसेंबरला घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे कला शाखेचे मराठी, फ्रेंच, जर्मनी व उर्दू या भाषेचे तीन डिसेंबर रोजी होणारे पेपर आता ७डिसेंबरला घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड