पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर!!
Pune University Exam
Pune University Entrance Exam Dates
Pune University Exam : Dates Of Pune University Entrance Exams Announced. The admission exam application start of various departments. The online will held between 21st to 24th of July 2022. Further details are as follows:-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील विविध विभागांची प्रवेश परीक्षेची अर्ज प्रक्रीया सुरू झाली आहे. या प्रवेश परीक्षांच्या तारखाही आता विद्यापीठाने जाहीर केल्या असून, २१ ते २४ जुलै दरम्यान या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या किंवा शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातील विविध विभागांची प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे.
- पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- बहुपर्यायी पद्धतीतील ही परीक्षा १०० गुणांची असून, ऑनलाइन पद्धतीने परीक्षा पार पडेल. प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरवात झाली आहे.
- पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवीसाठी हे अर्ज मागविण्यात येत आहे.
- दोन तासाची ही परीक्षा १०० गुणांची असेल.
- विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेश परीक्षेसंबंधीची अधिक माहिती देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या तारखा –
- – अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – १२ जुलै
- – विलंब शुल्कासहीत – १७ जुलै
- – परीक्षेचा कालावधी – २१ ते २४ जुलै
अधिकृत वेबसाईट – campus.unipune.ac.in
Pune University Second Semester Exam
Pune University Exam: Pune University has started preparations for the second session examinations. Prior to that, the results of the first session will be announced in the next 15 days. After that, the process of filling online application for the second session examination will be started. These written exams will start around 10th June. Further details are as follows:-
करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबतच राज्यातील इतर विद्यापीठांच्या द्वितीय सत्रांच्या परीक्षा लेखी पद्धतीने होत आहेत. त्या अनुषंगाने पुणे विद्यापीठाने द्वितीय सत्र परीक्षांची तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी, प्रथम सत्राच्या परीक्षांचा निकाल येत्या १५ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर द्वितीय सत्राच्या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. या परीक्षा लेखी पद्धतीने १० जूनच्या आसपास सुरू होतील.
- करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबतच राज्यातील इतर विद्यापीठांच्या द्वितीय सत्रांच्या परीक्षा लेखी पद्धतीने होत आहेत.
- त्या अनुषंगाने पुणे विद्यापीठाने द्वितीय सत्र परीक्षांची तयारी सुरू केली आहे.
- तत्पूर्वी, प्रथम सत्राच्या परीक्षांचा निकाल येत्या १५ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.
- त्यानंतर द्वितीय सत्राच्या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
- या परीक्षा लेखी पद्धतीने १० जूनच्या आसपास सुरू होतील.
- पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण किंवा संशोधनासाठी परीक्षा लवकर होऊन, निकाल जाहीर होण्याची आवश्यकता असते.
- त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पहिल्या टप्प्यांत पार पडतील आणि त्यांचे निकालही तातडीने जाहीर करण्याचा प्रयत्न होणार आहे.
- त्यानंतर प्रथम, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील.
- परीक्षा सुरू होण्याला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने, विद्यार्थ्यांनी आता परीक्षांची तयारी करण्याचे आवाहन पुणे विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
सरकारच्या आदेशानंतर जादा १५ मिनिटे मिळणार
A decision was taken at a meeting between Higher and Technical Education Minister Uday Samant and the state’s vice-chancellor to give an extra 15 minutes for the university’s session exams to be held in writing due to reduced incidence of corona. Therefore, this year students will get 15 minutes to solve the paper. However, the university administration has not received any documents in this regard. The decision will be taken by the university administration after receiving notice of this decision.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षांचा निकाल येत्या १५ दिवसांत जाहीर करण्यात येईल. परीक्षांचे निकाल जाहीर झाल्याबरोबरच द्वितीय सत्राच्या लेखी परीक्षांसाठी अर्ज भरणे सुरू होईल. साधारण १० जूनच्या आसपास द्वितीय सत्राच्या परीक्षा सुरू होतील. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करावे.
– डॉ. महेश काकडे,
संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
Pune University Final Year Exams Details
Pune University Exam : Despite the order of the Minister of Higher and Technical Education to conduct the actual examination, the examinations for the diploma courses were conducted online this year. However, sources in the department informed that Pune University has decided to conduct the first session examination of the academic year 2021-22 at the actual examination centers. Further details are as follows:-
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी प्रत्यक्ष परीक्षा घेण्याचा आदेश देऊनही पदविका अभ्यासक्रमांसाठी यंदा ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, पुणे विद्यापीठाने मात्र शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या सत्र परीक्षा प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती या विभागातील सूत्रांनी दिली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी प्रत्यक्ष परीक्षा घेण्याचा आदेश देऊनही पदविका अभ्यासक्रमांसाठी यंदा ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, पुणे विद्यापीठाने मात्र शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या सत्र परीक्षा प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती या विभागातील सूत्रांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या परीक्षांपैकी सर्व अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर होणार आहेत. पहिल्या वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेतल्या जाणार आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने ओएमआर शीटच्या माध्यमातून किंवा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय झाल्यास, त्या महाविद्यालयांमधील कॉम्प्युटर लॅबमध्ये घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने परीक्षा झाल्या, तरी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवरच द्याव्या लागणार आहेत. बॅकलॉगच्या परीक्षा मात्र ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, याबाबत अद्याप नियोजन सुरू असल्याचे सांगितले.
A committee was constituted by the university to plan the examination. The committee consisted of four deans and controllers of examinations. The committee has prepared a report on how the examinations should be conducted and will soon be approved by the university authorities. In times of disaster like Corona, online exams were only taken as an option. These exams have caused many problems. Therefore, despite the opposition of the students, the university is positive about taking the exam offline, the sources said.
ATKT Exams – Pune University Exam : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग आणि श्रेणी सुधारसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ८ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी तीन दिवस विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (माॅक टेस्ट) घेतली जाणार आहे.
पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या. त्यानंतर बॅकलॉग व श्रेणी सुधार करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू केले. अंतिम वर्षाच्या परीक्षेत विषयांचे प्रश्नसंच काढण्यापासून ते ऑनलाइन पद्धतीतील त्रुटींमुळे परीक्षेमध्ये अडचणी आल्या होत्या. या अडचणी बॅकलॉकच्या परीक्षेमध्ये येऊ नये, यासाठी विद्यापीठाने सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. बॅकलॅगच्या परीक्षेत सुमारे २ हजार २०० विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. सुमारे अडीच ते पावणेतीन लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
परीक्षा विभागाने काही दिवसांपूर्वी या परीक्षा संदर्भात परिपत्रक काढून ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीमध्ये परीक्षा होईल आणि मुख्य परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीचा सराव करण्यासाठी परीक्षा घेतली जाईल, असेही परिपत्रकात नमूद केले होते केले होते. मात्र, या वेळापत्रकात काहीसा बदल होत आहे.
३ ते ६ डिसेंबर या कालावधीत सराव परीक्षा होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे व्यवस्थित लॉगिन होते का? त्यांचा ई-मेल आयडी बरोबर आहे की चूक आदी गोष्टींची पडताळणी होणार आहे. यातून ज्या त्रुटी समोर येतील, त्या त्रुटी ७ डिसेंबरपर्यंत दूर करून ८ ते २३ डिसेंबर या कालावधीत परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती परीक्षा विभागाने दिली आहे.
सोर्स : सकाळ
Pune University Exam : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्ष वगळता, इतर वर्षातील बॅकलॉग विषयांसाठी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून, त्यानुसार ही परीक्षा ३ ते १६ डिसेंबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. याच कालावधीत श्रेणीसुधार आणि बहि:स्थ अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा व बॅकलॉगसह अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षा केवळ ऑनलाइन माध्यमातून सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत घेण्यत येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा टॅब यापैकी कुठलीही सुविधा ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी उपलब्ध नाही, त्यांनी आपपल्या महाविद्यालयात किंवा जवळच्या महाविद्यालयात जाऊन, त्या महाविद्यालयांकडे उपलब्ध संगणक कक्षातील सुविधा वापरून संबंधित विषयांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा द्यावी, असेही विद्यापीठाकडून महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जातील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.
एप्रिलमध्ये होऊ न शकलेल्या बॅकलॉग विषयाच्या प्रात्यक्षिक, मौखिक, प्रोजेक्ट, सेमिनार व अन्य महाविद्यालयातील स्तरावरील परीक्षांचे आयोजन करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांसह करावेत. महाविद्यालयातील शिक्षकांनी त्यांच्या बीसीयूडी लॉगइनमधून सर्व संबंधित विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाच्या लिंकचा उपयोग करून ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदवावेत, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केले आहे.
Table of Contents