पुणे विद्यापीठ परीक्षा: हॉलतिकीट उपलब्ध; मॉक टेस्टही होणार

Pune University Admit Card

Pune University Admit Card : पुणे विद्यापीठ पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी सज्ज झाले आहे.

Pune University Admit Card : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जोरदार तयारी केली असून, साधारण अडीच लाख विद्यार्थ्यांच्या ‘प्रोफाइल’मध्ये हॉलतिकीट उपलब्ध करून दिले आहे. त्याचप्रमाणे एमसीक्यू परीक्षा पद्धतीची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी दोन सराव परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यापीठाकडून अंतिम वर्षाची परीक्षा एमसीक्यू (बहुपर्यायी स्वरूपाची), एक तास वेळाची आणि ५० गुणांची घेतली जाणार आहे. बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी विद्यापीठाकडून समिती नेमण्यात आली आहे. प्रत्येक विषयाचे प्रश्नसंच तयार करण्यात येणार आहेत. त्यातील ६० प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारले जातील. विद्यार्थ्यांना एमसीक्यू परीक्षा पद्धतीचा अंदाज येण्यासाठी सराव चाचणी दिली जाणार आहे. साधारण परीक्षेच्या आठवडाभरापूर्वी ही चाचणी होईल. दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोफाइलमध्ये दिलेले हॉलतिकीट डाउनलोड करता येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

‘अंतिम वर्षाच्या ऑनलाइन पद्धतीच्या परीक्षांसाठी अतिशय सोपी आणि सुरक्षित पद्धत आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर ओटीपी येईल. हा ओटीपी व हॉलतिकीटच्या साह्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल,’ असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.

‘सराव चाचणी घेण्यात येणार’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षांच्या परीक्षा देतांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतली आहे. विद्यार्थ्यांना एमसीक्यू परीक्षा पद्धतीचा अंदाज येण्यासाठी सराव चाचणी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी कोणताही मानसिक तणाव न घेता परीक्षा द्यावी.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Pooja Laxman Honmane says

    Hall ticket download

  2. Mali Rohini Manohar says

    What is the link for the Hall ticket download

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड